शेअर बाजारातील खराब कामगिरीमुळे Mutual Fund मधील गुंतवलेला पैसा सुद्धा डुबणार?
शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोकादायक मानले जाते, तर दुसरीकडे लोकं SIP म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित मानतात. परंतु, आता शेअर बाजारातील तीव्र घसरणीचा परिणाम एसआयपी गुंतवणूकदारांवरही दिसून येत आहे. शेअर बाजारातील घसरणीदरम्यान, गेल्या तीन महिन्यांत म्युच्युअल फंडांमध्येही सुमारे १० ते १५ टक्के घट झाली आहे. अशा परिस्थितीत, काही काळापूर्वी एसआयपीमध्ये गुंतवणूक करून ज्यांना फायदा मिळत होता त्यांचा पोर्टफोलिओ आता लालेलाल झाला आहे.
शेअर बाजारातील तीव्र घसरणीमुळे एसआयपी गुंतवणूकदारांना काळजी वाटणे स्वाभाविक आहे, परंतु हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की एसआयपी ही दीर्घकालीन रणनीती आहे. जर तुम्ही तुमचा एसआयपी किमान ५-७ वर्षे टिकवून ठेवला तर तुम्हाला चांगले परतावे मिळण्याची शक्यता आहे. आज शेअर बाजार घसरला आहे, त्यामुळे एसआयपी नकारात्मक झाली आहे, परंतु कालांतराने जेव्हा शेअर बाजार वाढेल तेव्हा तुमचा पोर्टफोलिओ पुन्हा ग्रीन होईल.
सध्याच्या बाजार परिस्थितीत संयम राखणे महत्त्वाचे आहे असे तज्ञांचे मत आहे. आर्थिक सल्लागार म्हणतात की जर तुम्ही एसआयपीद्वारे नियमितपणे गुंतवणूक करत असाल तर तुम्ही तुमची गुंतवणूक सुरू ठेवावी. दुसरीकडे, जर एखादा गुंतवणूकदार आर्थिक ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करत असेल तर त्याने सावधगिरी बाळगली पाहिजे आणि योजना बनवली पाहिजे.
ईटीच्या अहवालानुसार, गेल्या ६ महिन्यांत या इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये १५ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. गेल्या ६ महिन्यांत कोणत्या म्युच्युअल फंड किती टक्क्याने घसरला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया.
भारतीय शेअर बाजाराच्या घसरणीमागे अनेक प्रमुख कारणे आहेत. याचे पहिले कारण म्हणजे देशाच्या बाजारपेठेतून परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढले आहेत. याशिवाय, निफ्टी आणि सेन्सेक्स गेल्या काही काळापासून घसरणीचा सामना करत आहेत. त्याच वेळी, अमेरिकेतील वाढत्या व्याजदर आणि ट्रम्पच्या टॅरिफ धमकीसारख्या जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांच्या मनोबलावर परिणाम होत आहे. याशिवाय, महागाई आणि घटता विकास दर देखील बाजाराच्या स्थिरतेला आव्हान देत आहेत.