Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beer Crisis : बिअरप्रेमींसाठी मोठी बातमी! Bira 91 बिअर बंद होणार? कंपनीवर मोठं कायदेशीर संकट, प्रकरण काय?

Beer Crisis : भारतात तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला बिअर ब्रँड Bira 91 आणि त्याची मूळ कंपनी बी९ बेवरेजेस सध्या मोठ्या संकटात सापडली आहे. कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई आणि चौकशी सुरू झाल्याने बिराच्या अडचणीत वाढ झाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 31, 2026 | 01:30 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • बिअरप्रेमींसाठी मोठी बातमी!
  • Bira 91 बिअर बंद होणार?
  • कंपनीवर ओढवले मोठे कायदेशीर संकट
Beer Crisis : तुम्हीही बिअरप्रेमी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. बिअरप्रेमींचे आपले स्वतःचे असे आवडीचा ब्रँड असतात. जर तुमचा आवडीचा ब्रँड ‘Bira 91’ हा असेल तर ही बातमी तुम्हाला धक्का देऊन जाईल. कारण या कंपनीच्या अडचणी पुन्हा एकदा वाढत असल्याचे दिसत आहे. ‘Bira 91’ ची मूळ कंपनी, ‘बी९ बेवरेजेस लिमिटेड’ला, काचेच्या बाटल्या बनवणारी कंपनी ‘हिंदुस्तान नॅशनल ग्लास अँड इंडस्ट्रीज लिमिटेड’ (HNGIL) कडून डिफॉल्ट नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमुळे आता तुमचा हा ब्रँड बंद होतोय की काय असा प्रश्न पडतोय? नेमकं सगळं प्रकरण काय? आणि या सगळ्या प्रकरणाचा काय परिणाम होणार आहे? ( Beer Crisis ) 

India Petrol Export To Russia : रशियावर का आली अशी वेळ? भारताकडे मागतोय पेट्रोल! काय नेमकं कारण?

प्रकरण काय आहे?

‘Bira 91’ ची मूळ कंपनी, ‘बी९ बेवरेजेस लिमिटेडसाठी ‘हिंदुस्तान नॅशनल ग्लास अँड इंडस्ट्रीज लिमिटेड’ HNGIL कंपनी काचेच्या बाटल्या बनवते. पण HNGIL कडून डिफॉल्ट नोटीस बजावण्यात आली आहे. HNGIL ने अंदाजे ११.७७ कोटी रुपयांची कथित थकबाकी मागितली असून, पैसे न दिल्यास कंपनीला NCLT मध्ये नेण्याची तयारी करत आहे.

HNGIL चा दावा आहे की, B9 Beverages ने त्यांनी तयार केलेल्या कस्टमाइज्ड काचेच्या बाटल्यांचे पैसे दिलेले नाहीत. हे प्रकरण ५१ लाखांहून अधिक ६५० मिली क्षमतेच्या एम्बर ग्लासच्या बाटल्यांशी संबंधित आहे. या बाटल्या Bira 91 च्या गरजा आणि ब्रँडिंगनुसार तयार करण्यात आल्या होत्या. HNGIL च्या म्हणण्यानुसार, Bira 91 बेवरेजेसने या बाटल्या उचलून नेल्याही नाहीत आणि त्यांचे पैसेही दिले नाहीत. परिणामी, या बाटल्या कंपनीच्या विविध कारखान्यांमध्ये पडून आहेत.

बाटल्यांची किंमत आणि स्टोरेज खर्चचाही समावेश

आपल्या नोटीसमध्ये, HNGILने बाटल्यांच्या किमतीसाठी अंदाजे ₹७.०३ कोटी आणि स्टोरेजच्या खर्चासाठी अंदाजे ₹१.१२ कोटी यांची मागणी केली आहे. करारानुसार व्याज देखील जोडण्यात आले आहे. कंपनीच्या खात्यातील अंदाजे ₹१३.७२ लाखची क्रेडिट बॅलंस को एडजस्ट केल्यानंतर, एकूण दावा अंदाजे ₹१.१७७ कोटी आहे.

HNGIL चे म्हणणे आहे की, या बाटल्या विशेषतः ‘Bira 91’ साठी तयार करण्यात आल्या होत्या, ज्यामुळे त्या दुसऱ्या खरेदीदाराला विकणे कठीण झाले आहे. कंपनीच्या मते, यामुळे त्यांच्या वर्किंग कॅपिटलमध्ये देखील अडचण निर्माण झाली आहे आणि स्टोरेजचा खर्च वाढला आहे.

किती दिवसांची मुदत ?

HNGIL ने दिवाळखोरी आणि नादारी संहितेच्या कलम ८ अंतर्गत ही मागणी नोटीस पाठवली आहे. एनसीएलटीमध्ये कॉर्पोरेट दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी ही एक अनिवार्य कायदेशीर प्रक्रिया आहे. नियमांनुसार, नोटीस मिळाल्यानंतर B9 Beverages ला प्रतिसाद देण्यासाठी १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत, कंपनी कथित थकबाकी भरू शकते किंवा कोणत्याही पूर्व-अस्तित्वात असलेल्या वादाचा पुरावा सादर करू शकते. असे न झाल्यास, HNGIL कलम ९ अंतर्गत NCLT कडे दाद मागू शकते.

Bira 91 वर किती कर्ज?

Bira 91 ची मूळ कंपनी आधीच आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, B9 Beverages चे उत्पादन सप्टेंबर २०२५ पासून बंद आहे आणि कंपनीवर अंदाजे ₹१,००० कोटींचे कर्ज असल्याचा अंदाज आहे. जुलै २०२६ मध्ये, Bira 91 चे संस्थापक अंकुर जैन यांनी कंपनीच्या संचालक मंडळाचा आणि सर्व कार्यकारी पदांचा राजीनामा दिला. कंपनीच्या दीर्घकाळ चाललेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले.

Bira 91 बंद होणार?

सध्या हे सांगणे कठीण आणि घाईचं ठरेल. HNGIL ने केवळ डिफॉल्ट डिमांड नोटीस पाठवली आहे. जर B9 Beverages ने १० दिवसांच्या आत पैसे भरले किंवा वैध पूर्व-अस्तित्वात असलेला वाद उपस्थित केला, तर NCLT ची कार्यवाही थांबवली जाऊ शकते. याचा अर्थ असा की, बिरा ९१ सध्या आणखी एका मोठ्या कायदेशीर आणि आर्थिक आव्हानाचा सामना करत आहे. येत्या काही दिवसांत, कंपनी ₹११.७७ कोटींचा हा दावा अदा करते, वाद मिटवते, की प्रकरण एनसीएलटीपर्यंत जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Reliance Group Share Crash : मुकेश अंबानी यांच्या ‘या’ कंपनीच्या शेअरमध्ये मोठा भूकंप! 9 रुपयांच्या खाली घसरला भाव

Web Title: Beer crisis bira 91 facing legal trouble know details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • beer
  • Business News

संबंधित बातम्या

Reliance Group Share Crash : मुकेश अंबानी यांच्या ‘या’ कंपनीच्या शेअरमध्ये मोठा भूकंप! 9 रुपयांच्या खाली घसरला भाव
1

Reliance Group Share Crash : मुकेश अंबानी यांच्या ‘या’ कंपनीच्या शेअरमध्ये मोठा भूकंप! 9 रुपयांच्या खाली घसरला भाव

Union Budget 2027-28 Preparation Begins: बजेट 2027 साठी सरकारची लगबग सुरू! करांपासून महागाईपर्यंत ‘या’ मोठ्या बदलांची शक्यता
2

Union Budget 2027-28 Preparation Begins: बजेट 2027 साठी सरकारची लगबग सुरू! करांपासून महागाईपर्यंत ‘या’ मोठ्या बदलांची शक्यता

Success Story : एका रीलने नशीब बदललं… युट्यूबवरून शिकून सुरू केला व्यवसाय! महिन्याला होते 25 लाखांची कमाई
3

Success Story : एका रीलने नशीब बदललं… युट्यूबवरून शिकून सुरू केला व्यवसाय! महिन्याला होते 25 लाखांची कमाई

Ghee Sale Ban : पनीरनंतर आता तूप ‘टार्गेट’वर, झाली कठोर कारवाई, ‘या’ राज्यात थेट 1 वर्षाची बंदी
4

Ghee Sale Ban : पनीरनंतर आता तूप ‘टार्गेट’वर, झाली कठोर कारवाई, ‘या’ राज्यात थेट 1 वर्षाची बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.