फोटो सौजन्य: iStock
पूर्वी अनेक जण आपल्या रिटायरमेंट लाइफचा एवढा विचार करत नव्हते. आजची बचत उद्याच्या रिटायरमेंटला कामी येईल असे म्हणत लोकं फक्त पैश्याची बचत करीत होते. पण आज ही स्थिती बदलली आहे. आज नुकतेच कमवायला लागलेला तरुण सुद्धा आपल्या रिटायरमेंटची प्लॅनिंग करताना दिसत आहे. रिटायरमेंटची प्लॅनिंग जितक्या लवकर करता येईल तितके चांगले.
आपण अनेकदा ऐकतो की पैसा साठवला की तो संपतो आणि गुंतवला तर वाढतो. त्यामुळेच योग्य योजनांमध्ये केलेली चांगली गुंतवणूक तुम्हाला रिटायरमेंटच्या काळात खंभीर साथ देऊ शकते. अनेक आर्थिक सल्लागार त्यांच्या क्लाएंट्सना शिफारस करतात की तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षापासून तुमच्या रिटायरमेंटचे नियोजन सुरू करावे. याद्वारे, तुम्ही एक मोठा रिटायरमेंट फंड तयार करू शकाल. यामुळे म्हतारपणात तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.
रिटायरमेंटनंतर तुमच्या गरजा काय असतील आणि तुमची जीवनशैली कशी असेल हे सर्वप्रथम तुम्ही ठरवले पाहिजे. तसेच तुम्हाला किती मोठा रिटायरमेंट फंड हवा आहे हे देखील समजून घेणे महत्वाचे आहे. मग त्यानुसार तुम्ही बचत सुरू करावी. यासाठी तुम्ही म्युच्युअल फंडात SIP करू शकता. तसेच PPF आणि NPS सारख्या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता.
पुढील आठवड्यात ७ IPO होतील ओपन, तर ६ IPOची लिस्टिंग; गुंतवणुकीसाठी तुमचा कळ कुणाकडे?
भविष्यात महागाई किती वाढू शकते याचा विचार करून तुम्ही तुमची गुंतवणूक केली पाहिजे. सध्या भारतातील महागाई ५ टक्क्यांच्या आसपास आहे. पण, 1974 मध्ये हा दर 28 टक्क्यांच्या पुढे गेला होता. त्यामुळे ज्या योजनांमध्ये जास्त परतावा मिळण्यास वाव आहे अशा योजनांमध्ये गुंतवणूक करावी. महागाईचा दीर्घकाळात तुमच्या आर्थिक परिस्थितीवर सर्वाधिक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही याकडे जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे.
रिटायरमेंटसाठी गुंतवणूक करताना रिस्क मॅनेजमेंटवरही लक्ष द्या. तुम्ही तुमची संपूर्ण बचत एकाच योजनेत गुंतवू नका. वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांमध्ये तुमचे पैसे गुंतवा. जसे की स्टॉक मार्केटमध्ये काही पैसे गुंतवा. तुम्ही म्युच्युअल फंडात SIP देखील करू शकता. तसेच काही पैसे सरकारी योजनांमध्येही गुंतवू शकता. हे तुम्हाला खात्रीशीर परतावा देईल. सोने किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे हाही एक चांगला पर्याय असू शकतो. गुंतवणुकीसाठी तुम्ही आर्थिक सल्लागाराचा सल्लाही घेऊ शकता.