फोटो सौजन्य: iStock
ओयो म्हंटलं की अनेकांना आठवते ते बेस्ट हॉटेलिंग सर्व्हिस आन राहण्याची उत्तम सोया. पण एकीकडे ओयोची चांगली प्रतिमा जरी असली तरी दुसरीकडे लोकांचा असा देखील समज आहे की ओयोचा वापर मुख्यतः न विवाहित जोडपे जास्त करत असतात. हाच समज दूर करण्यासाठी ओयो ब्रँडने एक जाहिरात देखील बनवली होती, जिथे त्यांनी ओयो मधील रूम्स फक्त जोडप्यांसाठीच नव्हे तर कुटुंबासाठी देखील एक उत्तम पर्याय आहे, असे दाखवले होते. शेवटी, आता प्रेमी युगलांसाठी ओयोने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. काय आहे हा निर्णय, चला जाणून घेऊया?
हॉटेल आणि ट्रॅव्हल बुकिंग कंपनी ओयोने आपल्या ग्राहकांसाठी एक नवा नियम तयार केला आहे. आतापासून, अविवाहित जोडप्यांना ओयोमध्ये चेक-इन करण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचे कंपनीने सांगितले आहे. या निर्णयानंतर अनेक जणांनी कंपनीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
अनिल कपूर बनले कम्युनिटी मॅट्रिमोनीचे ब्रँड ॲम्बेसेडर; चार विशिष्ट समुदायांसाठी मोहिमेची सुरुवात
Oyo ने पार्टनर हॉटेल्ससाठी नवीन चेक-इन पॉलिसी सुरू केली आहे, जी या वर्षापासून लागू होईल. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अविवाहित जोडप्यांना ओयो हॉटेलच्या खोल्यांमध्ये चेक-इन करण्याची परवानगी दिली जाणार नाही. कंपनीने याची सुरुवात मेरठपासून केली असून त्यासाठी नवा नियम बनवला आहे. जो प्रेमी युगल वेळ घालवण्यासाठी ओयो हॉटेल्सकडे वळतात त्यांच्यासाठी ही बातमी नक्कीच चांगली नाही.
सुधारित पॉलिसीअंतर्गत, सर्व जोडप्यांना चेक-इनच्या वेळी त्यांच्या नातेसंबंधाचा वैध पुरावा सादर करण्यास सांगितले जाईल. यामध्ये ऑनलाइन बुकिंग देखील समाविष्ट आहे. OYO ने मेरठमधील आपल्या भागीदार हॉटेलांना याची त्वरित अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
HDFC आणि SBI च्या लाखो खातेधारकांसाठी आनंदाची बातमी; मुदत ठेवींवरील व्याजात झालीये इतकी वाढ!
खरंतर, काही शहरांतील रहिवाशांनी अविवाहित जोडप्यांना OYO हॉटेलमध्ये चेक-इन करण्याची परवानगी न देण्यासाठी याचिका दाखल केली आहे. हे पाहता ओयोने आपल्या धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने म्हटले आहे की OYO ने आपल्या भागीदार हॉटेलांना स्थानिक सामाजिक संवेदनशीलता लक्षात घेऊन त्यांच्या विवेकबुद्धीनुसार जोडप्यांची बुकिंग नाकारण्याचा अधिकार दिला आहे.
बिझनेस स्टँडर्डच्या बातमीनुसार, इतर शहरांतील लोकांनीही ओयोला अविवाहित जोडप्यांना हॉटेल्समध्ये चेक-इन करण्यापासून रोखण्यासाठी एक धोरण बनवण्याची आणि त्याची कठोर अंमलबजावणी करण्याचा मार्ग तयार करण्याची विनंती केली आहे.