Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Rupee In Nepal : भारतीय नोटांसंदर्भात मोठा निर्णय! 100, 200 अन् 500 रुपयांच्या नोटांची नेपाळमध्ये अधिकृत एन्ट्री

नेपाळ सरकारने भारतीय पर्यटकांना आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आता नेपाळमध्ये १०० रुपयांच्या नोटांसोबतच २०० आणि ५०० रुपयांच्या भारतीय नोटांच्या वापराला कायदेशीर मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे नेपाळमध्ये प्रवास करणाऱ्या भारतीय पर्यटकांचा व्यवहार आणि चलनाची अडचण दूर होणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 26, 2026 | 03:30 PM
(फोटो सौजन्य: Chatgpt)

(फोटो सौजन्य: Chatgpt)

Follow Us
Follow Us:
  • भारतीय नोटांसंदर्भात मोठा निर्णय!
  • नेपाळच्या राष्ट्रीय बँकेची नोटीस जारी
  • 200, 500 रुपयांच्या नोटांची नेपाळमध्ये अधिकृत एन्ट्री
Nepal Indian Currency Decision: नेपाळमध्ये बालेन शाह यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक मोठे आणि कठीण निर्णय घेण्यात आले. या निर्णयांवर जागतिक स्तरावर चर्चा झाली. या सगळ्यात, नेपाळने आता भारतीय रुपयाबाबत एक मोठे पाऊल उचलले आहे. नेमका कोणता निर्णय घेतला? आणि या निर्णयाचा नेमका काय परिणाम होणार आहे?

IT कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! Layoffs नंतर कसा असेल अप्रेजल ट्रेन्ड? बदलतंय सॅलरी स्ट्रक्चर? जाणून घ्या नोकऱ्यांचं गणित

भारतीय चलनाबाबत काय निर्णय?

खरं तर, नेपाळने भारतीय आणि नेपाळी नागरिकांना २०० आणि ५०० रुपयांच्या भारतीय चलनी नोटा देशात आणण्याची किंवा बाहेर नेण्याची परवानगी दिली आहे. ही परवानगी ९ नोव्हेंबर २०१६ रोजी किंवा त्यानंतर जारी केलेल्या, एकूण २५,००० रुपयांपर्यंतच्या नोटांना लागू होते. याचा अर्थ असा की, बालेन शाह सरकारच्या काळात आता २०० आणि ५०० रुपयांच्या भारतीय चलनी नोटा स्वीकारल्या जातील.

नेपाळच्या राष्ट्रीय बँकेची नोटीस जारी

नेपाळ राष्ट्र बँकेने गुरुवारी या संदर्भात एक नोटीस जारी केली. या नोटीसमध्ये म्हटले आहे की, “९ नोव्हेंबर २०१६ पूर्वी जारी केलेल्या ₹५०० आणि ₹१,००० च्या भारतीय चलनी नोटांवर नेपाळमध्ये अजूनही बंदी आहे. पण विद्यमान नियमांनुसार, नेपाळी किंवा भारतीय नागरिक ९ नोव्हेंबर २०१६ नंतर जारी केलेल्या ₹२०० आणि ₹५०० च्या भारतीय चलनी नोटा, प्रति व्यक्ती ₹२५,००० च्या मर्यादेपर्यंत नेपाळमध्ये आणू किंवा नेपाळबाहेर नेऊ शकतात.”
याआधी नेपाळमध्ये भारताची फक्त 100 रुपयांची नोट वापरली जात होती. यापेक्षा मोठ्या नोटा नेपाळमध्ये नेण्यास परवानगी नव्हती. पण आता भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांतील नागरिक नेपाळमध्ये भारतीय 100, 200 आणि 500 ​​रुपयांच्या नोटा खरेदी करू शकतात. लक्षात ठेवा 200 आणि 500 ​​च्या नोटा 2016 पासूनच्या असाव्यात.

2026 च्या सुरुवातीला नेपाळच्या नॅशनल बँकेने या संदर्भात एक माहिती दिली होती. 11 फेब्रुवारी रोजी सेंट्रल बँक ऑफ नेपाळने 2016 नंतर जारी करण्यात आलेल्या भारतातील 200 आणि 500 ​​रुपयांच्या नोटांबाबत नोटीस जारी केली होती. आता बँकेने पुन्हा एकदा त्याच आदेशाची पुनरावृत्ती केली आणि अंमलबजावणीची पद्धत स्पष्ट केली.

भारतीय रुपये फक्त भारतातूनच आणता येईल

नवीन नियमांची माहिती देताना, NRB चे प्रवक्ते गुरू प्रसाद पौडेल यांनी शनिवारी सांगितले की, नेपाळी नागरिक भारताव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशातून भारतीय चलन नेपाळमध्ये आणू शकत नाहीत. त्याचप्रमाणे, ते नेपाळमधून भारतीय चलन भारताव्यतिरिक्त इतर कोणत्याही तिसऱ्या देशात घेऊन जाऊ शकत नाहीत.
NRB चे प्रवक्ते गुरू प्रसाद पौडेल यांनी स्पष्ट केलं की, या नवीन तरतुदीमुळे नेपाळला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांना आणि भारतासोबत व्यापार व व्यवसायात गुंतलेल्या नेपाळी नागरिकांना सोयीस्कर होईल.

Diet Coke Price Hike: मिडल ईस्टच्या युद्धाचा डाएट कोकवरही परिणाम? भारतात दर वाढले, नेमकं दरामागील गणित काय?

Web Title: Big news indian currency nepal allows 200 500 indian rupee for tourists marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Business News
  • Indian currency
  • Marathi News
  • nepal
  • Nepal News

संबंधित बातम्या

Nagpur News :स्वातंत्र्यापूर्वीच्या कागदपत्रांना सर्वोच्च महत्त्व; उच्च न्यायालयाचा निकाल ;आदिवासीदाव्याचा मार्ग सुकर
1

Nagpur News :स्वातंत्र्यापूर्वीच्या कागदपत्रांना सर्वोच्च महत्त्व; उच्च न्यायालयाचा निकाल ;आदिवासीदाव्याचा मार्ग सुकर

Simple Tips to Improve Digestion: ‘या’ 3 डाळींमुळे होतो गॅसचा त्रास? खाताना घ्या काळजी!
2

Simple Tips to Improve Digestion: ‘या’ 3 डाळींमुळे होतो गॅसचा त्रास? खाताना घ्या काळजी!

Nagpur Crime : पोलिसांनी उधळला कट ;३ कोटींच्या खंडणीसाठी संचालकाला खोट्या गुन्ह्यात अडकिवण्याचा डाव
3

Nagpur Crime : पोलिसांनी उधळला कट ;३ कोटींच्या खंडणीसाठी संचालकाला खोट्या गुन्ह्यात अडकिवण्याचा डाव

Mawra Hocane Welcomes Baby Boy: ‘सनम तेरी कसम’ फेम सरू झाली आई! लग्नाच्या दीड वर्षांनी घरी आलं गोंडस बाळ
4

Mawra Hocane Welcomes Baby Boy: ‘सनम तेरी कसम’ फेम सरू झाली आई! लग्नाच्या दीड वर्षांनी घरी आलं गोंडस बाळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.