वेलिंग्टनमध्ये भारत जिंकणार? (फोटो- सोशल मिडिया )
क्राइस्टचर्च येथे खेळले गेलेले पहिले दोन्ही सामने जिंकून भारताने सिरीजमध्ये 2-0 आघाडी घेतली आहे. बजहार्टचा संघ तिसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ या मैदानावरील पराभवाचा इतिहास बदलून सिरीज जिंकण्यासाठी खेळणार आहे. वेलिंग्टनच्या या मैदानावर भारतीय संघाचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील रेकॉर्ड फारसा चांगला राहिलेला नाही. तर यजमान न्यूझीलंडचा संघ पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये Vaibhav Suryvanshi वरून रणकंदन? बॅटिंग ऑर्डरच्या मुद्द्यावर मॅनेजमेंट टार्गेट?
वेलिंग्टनच्या या मैदानावर भारतीय संघाचा रेकॉर्ड इतका चांगला नाही आहे. त्यामुळे उद्याचा सामना भारतासाठी महत्वाचा असणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून, फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही ठिकाणी चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभव पत्करावा लागल्याने यजमान न्यूझीलंडचा संघ बॅकफूटवर गेला आहे. पाच सामन्यांच्या सिरीजमध्ये आव्हान जिवंत ठेवण्यासाठी कीवी संघाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाने वेलिंग्टनच्या या मैदानावर आपला पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना २००९ साली खेळला होता. या मैदानावर भारतीय संघाचा आतापर्यंतचा इतिहास फारसा चांगला नाहीये. या मैदानावर एकूण ३ टी-२० सामने भारताने खेळले आहेत. त्यामध्ये 2 सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर एक सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे अद्याप भारताला या मैदानावर एकही सामना जिंकता आलेला नाही.
भारत: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मयंक यादव, अर्शदीप सिंग.
न्यूझीलंड: फिन ऍलन, टिम सेफर्ट, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेवन जेकब्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, ऍडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन.
Ans: भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिसरा सामना वेलिंग्टनमध्ये होणार आहे.
Ans: वेलिंग्टनमध्ये भारत संघाला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही.






