'या' सरकारी कंपन्यांचे शेअर वधारणार; गुंतवणुकीसाठी ब्रोकरेजने जारी केलीये लक्ष्य किंमत
शेअर मार्केटमधील अनेक शेअर्स गुंतवणूकदारांना अल्पावधीत करोडपती बनवत आहेत. यापैकी असे शेअर्स देखील आहेत ज्यांची किंमत एक रुपयापेक्षा कमी होती. आज देखील या शेअर्सची किंमत फारशी नाही. असाच एक स्टॉक सध्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवत आहे. या शेअर्सने गुंतवणूकदारांना फारच कमी वेळात जबरदस्त परतावा दिला आहे. विशेष म्हणजे, बऱ्याच कालावधीपासून हा शेअर 2 टक्क्यांच्या वरचे सर्किट अनुभवत आहे.
14 महिन्यांत शेअर 24.41 रुपयांवर
गुंतवणूकदारांना मालामाल बनवणाऱ्या या मल्टीबॅगर स्टॉकचे नाव बिट्स लिमिटेड असे आहे. या मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदांना एका वर्षात 2300 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. एवढेच नाही तर या शेअरने 14 महिन्यांत गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. 14 महिन्यांपूर्वी त्याच्या शेअरची किंमत केवळ 35 पैसे होती. जी सध्या 24.41 रुपयांपर्यंत वाढली आहे.
(फोटो सौजन्य – iStock)
दोन महिन्यांत गुंतवणूकदारांना मिळाला दुप्पट परतावा
बिट्स लिमिटेड या मल्टीबॅगर स्टॉकने दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत जबरदस्त परतावा दिला आहे. 18 सप्टेंबर या शेअरची किंमत 12.32 रुपये होती. जी सध्या दुपटीने अर्थात 24.41 रुपये झाली आहे. अशा परिस्थितीत दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांना दिलेली रक्कम दुप्पट झाली आहे.
हे देखील वाचा – कधीकाळी भारताची शान होती ‘ही’ विमान कंपनी; आज झालीये बर्बाद… वाचा.. तिची खडतर कहाणी!
6 महिन्यांत 700 टक्क्यांहून अधिक परतावा
बिट्स लिमिटेड या शेअरने 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. हा परतावा 200, 300 टक्के नाही तर 700 टक्क्यांहून अधिक आहे. म्हणजेच 6 महिन्यांत गुंतवणूक 7 पटीने वाढली आहे. 6 महिन्यांपूर्वी या शेअरची किंमत 2.95 रुपये होती. अशा परिस्थितीत, तेव्हापासून आतापर्यंत सुमारे 727 टक्के परतावा या शेअरने दिला आहे. म्हणजेच तुम्ही या शेअरमध्ये ६ महिन्यापुर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आज 8 लाख रुपयांहून अधिक पैसे झाले असते.
1 लाखाचे झाले 70 लाख रुपये
सप्टेंबर 2023 मध्ये या शेअरची किंमत केवळ 35 पैसे इतकी होती. तेव्हापासून या 14 महिन्यांत बिट्स लिमिटेडच्या शेअरने सुमारे 6874 टक्के परतावा दिला आहे. जर तुम्ही त्यावेळी त्यामध्ये 1 लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले असते तर आज त्यांची किंमत सुमारे 70 लाख रुपये इतकी झाली असती. जर तुम्ही या कंपनीचे 1.5 लाख रुपये किमतीचे शेअर्स 14 महिन्यांपूर्वी विकत घेतले असते तर त्या 1.5 लाख रुपयांची किंमत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असती. म्हणजे 1.5 लाख रुपये गुंतवून तुम्ही 14 महिन्यांत करोडपती झाला असतात.
कंपनी काय करते?
बिट्स लिमिटेड कंपनीचे मार्केट कॅप 273 कोटी रुपये इतके आहे. हे देशात आणि परदेशात अनेक प्रकारच्या शैक्षणिक सेवा प्रदान करते. यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक सॉफ्टवेअर, व्यवसाय व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रांचा समावेश आहे. कंपनीची ही सेवा केंद्रे, संस्था, महाविद्यालये, विद्यापीठे इ. यामध्ये दूरस्थ शिक्षण कार्यक्रमांचाही समावेश होतो. कंपनी कॉर्पोरेट व्यवस्थापन प्रशिक्षण देखील प्रदान करते.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)