WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये आलं भन्नाट फीचर... नवीन मेंबर्सही वाचू शकतील ग्रुपमधील जुने चॅट्स, कसं? जाणून घ्या
मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये रोल आऊट करण्यात आलेले नवीन फीचर ग्रुपच्या ॲडमिन आणि मेंबर्सना नवीन जोडण्यात आलेल्या युजर्ससोबत जुने चॅट्स शेअर करण्याचा ऑप्शन देतो. त्यामुळे ग्रुप मधील अॅडमिन किंवा मेंबर्सना नवीन जोडलेल्या युजरसोबत स्क्रीनशॉट किंवा जुने मेसेज फॉरवर्ड करण्याची गरज पडत नाही. व्हाट्सअॅपने माहिती दिली आहे की हे फीचर पूर्णपणे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड आहे. हे फीचर पर्सन किंवा ग्रुप मेसेजप्रमाणे प्राइवेसी स्टेंडर्ड फॉलो करतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
ग्रुपमध्ये जेव्हा एखादा नवीन युजर जोडला जातो तेव्हा अॅडमिन आणि ग्रुप मेंबर्सना शेअर रिसेंट मेसेज असा एक ऑप्शन दिसतो. या ऑप्शनद्वारे यूजर्स 25, 50, 75 आणि 100 मेसेज शेअर करू शकणार आहे. या फीचरच्या मदतीने अलीकडील मेसेज युजरसोबत शेअर केले जाऊ शकतात. लक्षात ठेवा की ग्रुप ॲडमिन किंवा ग्रुपमधील मेंबर नव्या युजर्स सोबत पूर्ण चॅट हिस्ट्री शेअर करू शकत नाही.
कंपनीने हे फीचर क्लिअरिटी आणि ट्रांसपेरेंसी वाढवण्यासाठी डिझाईन केले आहेत. शेअर करण्यात आलेले चॅट्स ग्रुपमध्ये एका वेगळ्या सेक्शनमध्ये दिसणार आहेत. यामध्ये चॅट्सची तारीख आणि पाठवणाऱ्या युजरचे नाव देखील समाविष्ट असेल. चॅट मेसेज शेअर करण्याची नोटिफिकेशन सर्व युजर्स मिळणार आहेत. ज्यामुळे सर्व युजर्स शेअर करण्यात आलेले जुने चॅट्स पाहू शकणार आहेत.
मेसेज सेंड करण्याचा पर्याय ऑटोमॅटिक नाही. जेव्हा जेव्हा नवीन यूजर ग्रुपमध्ये जोडला जाईल, तेव्हा इतर युजर्सना मॅन्युअली या फीचरचा वापर करावा लागेल. ग्रुप अॅडमिनना सर्व मेंबरसाठी हे फीचर अक्षम करण्याचा अधिकार आहे. तथापि, अॅडमिन कधीही हे वैशिष्ट्य वापरू शकतात. व्हाट्सअॅपचं असं म्हणणं आहे की, ग्रुप मेसेज हिस्ट्री फीचर टप्प्याटप्प्याने रिलीज केले जात आहे. अशी शक्यता आहे की येणारे काही दिवसात हे फीचर सर्व युजरसाठी उपलब्ध होईल.






