Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmer News: दृष्टिहीन शेतकऱ्याने पिकवला दहा एकर कांदा, सटाण्यातील डॉ. कांतीलाल दुबे यांची प्रेरणादायी कहाणी

नाशिक जिल्ह्यातील सटाण्यातील डॉ. कांतीलाल दुबे यांनी जन्मतः अंधत्व असतानाही जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कांदा शेतीत उल्लेखनीय यश मिळवले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 21, 2026 | 12:40 PM
दृष्टिहीन शेतकऱ्याने पिकवला दहा एकर कांदा, सटाण्यातील डॉ. कांतीलाल दुबे यांची प्रेरणादायी कहाणी

दृष्टिहीन शेतकऱ्याने पिकवला दहा एकर कांदा, सटाण्यातील डॉ. कांतीलाल दुबे यांची प्रेरणादायी कहाणी

Follow Us
Follow Us:
  • अंधत्वावर मात करत कांदा शेतीत यश
  • सटाण्यातील डॉ. कांतीलाल दुबे यांची प्रेरणादायी कहाणी
  • अडचणींवर मात करत यशाला गवसणी
सटाणा (वा.) : नाशिक जिल्हा म्हटलं की कांद्याचं माहेरघर अशी ओळख सहजपणे समोर येते. बागलाण, कळवण, देवळा या तालुक्यांतील शेतकरी नवनवीन प्रयोग करत उत्पादन वाढवत आहेत. मात्र या साऱ्यांमध्ये सटाण्यातील एका अंध शेतकऱ्याची कहाणी वेगळी ठरते. कारण ती केवळ शेतीतील यशाची नाही, तर जिद्द, आत्मविश्वास आणि अंतरदृष्टीची आहे.

जन्मतःच अंधत्व असतानाही डॉ. कांतीलाल डूबे यांनी परिस्थितीला शरण न जाता तिच्याशी दोन हात केले. कुटुंबाचा आधार, स्वतःची जिद्द आणि शेतीविषयक अभ्यास यांच्या बळावर त्यांनी १० एकर जमिनीवर कांदा उत्पादनात उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यांनी भाऊ शरद दुबे यांच्या माध्यमातून स्वतः रोपे तयार करून जानेवारीत लागवड केली आणि अवघ्या साडेतीन महिन्यांत काढणीपर्यंतचा टप्पा गाठला. हे त्यांच्या नियोजनशक्तीचे उत्तम उदाहरण आहे.

Nashik News: अंत्यसंस्कार ‘इव्हेंट’ नव्हे, परंपरेचा सन्मान: राजस्थानात तरुणांकडून जागृती

पुणे फुरसुंगी या बानाची कांद्याची लागवड त्यांनी तीन एकरांवर केली. या क्षेत्रातून मिळालेला कांदा केवळ प्रमाणात नव्हे, तर गुणवत्तेतही उठून दिसणारा आहे- आकर्षक रंग, चांगला आकार आणि सरासरी ३०० ग्रॅमपेक्षा अधिक वजन. सुमारे १२ ट्रॉली उत्पादनाचा त्यांचा अंदाज आहे, जो कोणत्याही प्रगत शेतकऱ्यासाठी प्रेरणादायी ठरेल. डॉ. डूबे यांची कथा तरुणाईसाठीही प्रेरणादायी आहे. आज अनेक युवक शेतीकडे वळत असताना त्यांच्यासमोर आदर्श उभा करणारी ही गोष्ट आहे की शेती ही केवळ परंपरा नाही, तर विज्ञान, नियोजन आणि नवकल्पनांची सांगड घालणारा व्यवसाय आहे. त्यांचा संदेश स्पष्ट आहे की, बाजारभावाच्या चढ-उतारांवर विचार करत बसण्यापेक्षा गुणवत्तापूर्ण उत्पादनावर भर द्या. जिद्द, सातत्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतीतही विक्रमी यश मिळवता येते. अंधत्वावर मात करत त्यांनी दाखवून दिले आहे की, खरा प्रकाश डोळ्यांत नसून मनात आणि कृतीत असतो.

आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर

डॉ. डूबे व त्यांचे भाऊ शरद दुबे यांच्या यशामागे केवळ मेहनत नाही, तर शास्त्रीय दृष्टिकोनही आहे. वेळेवर मशागत, संतुलित सात व्यवस्थापन, योग्य पाणीपुरवठा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या गोष्टी त्यांनी पाळल्या. हवामानाची साथ आणि योग्य वेळी झालेला पाऊस यामुळे उत्पादनात आणखी भर पडली. त्यानी तयार कादा विक्री न करता साठवण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून योग्य बाजारभाव मिळू शकेल. आजच्या बदलत्या शेती व्यवस्थेत बाजारपेठेचा अभ्यास आणि नियोजन हे तितकेच महत्त्वाचे झाले आहे. पिपळगाव, उमराणे, देवळा, कळवण या बाजार समित्यांबरोबरच दक्षिण भारतातील चेन्नई बाजारपेठेतही त्यांच्या कांद्याला मोठी मागणी आहे, व्यापारी स्वतः पुढे येऊन खरेदी करतात, ही त्यांच्या उत्पादनाच्या गुणवत्तेची पावतीच आहे.

Nashik Weather : शेतकरी चिंतेत! उन्हाच्या चटक्यानंतर ढगाळ वातावरण, तापमानाचा पारा ४० वरून ३५ अंशावर

Web Title: Blind farmer kantilal dubey onion farming success satana nashik news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 12:38 PM

Topics:  

  • farmer
  • Nashik

संबंधित बातम्या

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
1

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Yavatmal News: कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचे संकट! अनावश्यक व वारंवार कीटकनाशकांची फवारणी केल्यास शेताचे होऊ शकते नुकसान
2

Yavatmal News: कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचे संकट! अनावश्यक व वारंवार कीटकनाशकांची फवारणी केल्यास शेताचे होऊ शकते नुकसान

Varun Dhawan Farm: भात शेती करताना दिसला वरुण धवन; स्वतःच्या शेतात राबतानाचे फोटो व्हायरल, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
3

Varun Dhawan Farm: भात शेती करताना दिसला वरुण धवन; स्वतःच्या शेतात राबतानाचे फोटो व्हायरल, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा उद्या नाशिक दौरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार
4

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा उद्या नाशिक दौरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.