अंत्यसंस्कार ‘इव्हेंट’ नव्हे, परंपरेचा सन्मान: राजस्थानात तरुणांकडून जागृती
आजच्या पिढीला हे विधीवत संस्कार अवगत नाहीत, त्यामुळे काही इव्हेंट कंपन्या पुढे येऊ लागल्या आहेत.
त्यातून अंत्यविधी हिंदू अंत्यसंस्कार विधीशी संबंधित परंपरा आणि चालीरीतीचे पालन तेवढ्या भावनिक पद्धतीने होताना दिसत नाही. त्यामुळे तरुण जागृत होताना दिसत आहे, अंत्यसंस्कार हा एक पवित्र धार्मिक विची आहे.
तो एखादा व्यावसायिक उपक्रम किवा ‘इव्हेंट मैनेजमेंट’ कंपन्यानी व्यवस्थापित करावी अशी एखादी उत्सवी घटना नव्हे. या धारेणेतून आजचा तरुण पुढे येऊन याचे प्रशिक्षण घेत आहे.
या पावित्र्याचे जतन करण्यासाठी ते या संपूर्ण प्रक्रियेची वैयक्तिक जबाबदारी स्वीकारत आहेत.
हिंदू धर्मात मृत्यूपश्चात होणारा अंत्तासंस्कार हा सोळा संस्कारांपैकी अखेरचा संस्कार मानला जाती, हा विधी मृतदेहाचे अग्नी, जल, पृथ्वी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांमध्ये विलीनीकरण करण्यासाठी तसेब आल्ल्याच्या मुक्तीचा मार्ग सुलभ करण्यासाठी केला जातो. अंत्यविधी साधारणपणे मृत्यूनंतर २४ तासांच्या आत मृतदेहाचे दहन (अग्निदाह) करून पार पाडला जातो. तिथे मंत्रोच्चारांच्या गजरात मृत व्यक्तीच्या थोरल्या मुलाच्या हस्ते वितेला अग्नी दिला जातो. त्यानंतर अरवीचे पाण्यात विसर्जन केले जाते आणि पुढील तेरा दिवस शोक पाळला जातो, तसेच शुद्धीकरण विधींचे आचरण केले जाते.
अनेक तरुण आता अंत्यसंस्कार पारंपरिक आणि सन्मानपूर्वक पद्धतीने पार पाडण्याचे प्रशिक्षण घेत आहेत, जेणेकरून एखाद्या प्रिय व्यक्तीच्या निधनानंतर हे सबंधित कुटुंबाना भावनिक आणि प्रक्रियात्मक आधार देऊ शकतील.
युवक-युवतींना अंत्ययात्रेशी संबंधित आवश्यक विधी, पार्थिवाचे आदरपूर्वक अंत्यसंस्कारासाठी सिद्धीकरण आणि दहनविधीच्या योग्य कार्यपद्धतींबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. या उपक्रमाचा उद्देश असा आहे की, शोककुल कुटुंबाना केवळ तांत्रिक मदतच नव्हे, तर भावनिक आधारही उपलब्ध करून द्यावा.
अनेक स्वयंसेवी संस्थाही या तरुणाना है प्रशिक्षण देत आहेत, या तरुणानी अत्ययात्रेदरम्यान आवश्यक असलेल्या लहान असो वा मोठी प्रत्येक सेवेमध्ये साहाय्य करावे हा त्यामागील उद्देश आहे.






