Budget 2024 : यंदा स्वस्त होणार इलेक्ट्रिक कार आणि स्कूटर्स?
भारताचे बजेट सादर होण्यास आता फक्त एक दिवस उरला आहे. देशाच्या अर्थमंत्री उद्या म्हणजेच २३ जुलैला देशाचे बजेट सादर करणार आहेत. मोदी सरकाच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच बजेट असल्यामुळे, हा केंद्रिय सरकारसाठीच नव्हे तर देशासाठी सुद्धा महत्वाचा असणार आहे. या बजेट मध्ये अनेक महत्वपूर्ण क्षेत्रांवर मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. यातीलच एक म्हणजे ऑटोमोबाइल क्षेत्र.
ऑटोमोबाइल क्षेत्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेतील एक महत्वाचे क्षेत्र असून, देशातील अनेक लोकांसाठी हे उत्पन्नाचे एक प्रमुख स्रोत आहे. याच बाबींकडे बघता अनेक तज्ञांनी सरकारजवळ काही महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. जर या मागण्या सरकारने पूर्ण केल्या तर निश्चितच सामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे. चला या मागण्यांबद्दल आपण जाणून घेऊया.
ईव्हीवरील जीएसटीमध्ये कपात किंवा सबसिडीत वाढ इलेक्ट्रिक कारसाठी लागणाऱ्या चार्जिंग इन्फ्रस्ट्रक्चर सुविधांचा विकास
ईव्ही बॅटरी उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी
रिसर्च अँड डेवलपमेंट (R&D) धोरणांसाठी प्रोत्साहन
इलेक्ट्रिक वाहनांच्या कस्टम ड्युटी आणि करांमध्ये कपात. तसेच कच्च्या मालाच्या किंमती कमी करण्यासाठी उपाययोजना करणे.
Make In India मूव्हमेंटच्या अंतर्गत ऑटॉमोटिव उत्पादन वाढवणे. कौशल्य विकास उपक्रमात गुंतवणूक करणे.
ईव्हीच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अनेक पावले उचलत आहे, ज्यामुळे या वाहनांची किंमत कमी होतील अशी अपेक्षा आहे. यात जीएसटीमध्ये कपात, सबसिडीमध्ये वाढ आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासासाठी गुंतवणूक समाविष्ट असू शकते.
मात्र, अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा होतील, हे अद्याप निश्चित नाही. 23 जुलै 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणाऱ्या अर्थसंकल्पाची सर्वसामान्य जनतेला प्रतीक्षा करावी लागणार आहे.