Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Startup India: ‘स्टार्टअप इंडिया’ची १० वर्षे; ३३ हजारांहून अधिक स्टार्टअप्ससह महाराष्ट्र देशात नंबर वन!

कृत्रिम बुद्धिमता, सेमीकंडक्टर, हरित तंत्रज्ञान, ड्रोन, इलेवट्रिक वाहन आणि आरोग्य तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये पुढील काही वर्षात महाराष्ट्रातील स्टार्टअप्सची संख्या आणि गुंतवणूक आणखी वाढण्याची शक्यता आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 31, 2026 | 01:34 PM
Startup India: ‘स्टार्टअप इंडिया’ची १० वर्षे; ३३ हजारांहून अधिक स्टार्टअप्ससह महाराष्ट्र देशात नंबर वन!
Follow Us
Follow Us:
  • १६ जानेवारी २०१६ रोजी सुरू केलेल्या ‘स्टार्टअप इंडिया’ उपक्रमाला दहा वर्षे पूर्ण
  • जानेवारी २०२६ अखेर देशात २ लाख १२ हजारांहून अधिक मान्यताप्राप्त स्टार्टअप्स
  • माहिती तंत्रज्ञान (IT), फिनटेक, हेल्थटेक, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), हरित ऊर्जा, कृषी आणि उत्पादन
 

Startup India 10 Years:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ जानेवारी २०१६ रोजी सुरू केलेल्या ‘स्टार्टअप इंडिया’ उपक्रमाला दहा वर्षे पूर्ण होत असताना भारतातील स्टार्टअप परिसंस्थेने मोठी झेप घेतली आहे. जानेवारी २०२६ अखेर देशात २ लाख १२ हजारांहून अधिक मान्यताप्राप्त स्टार्टअप्स कार्यरत असून, राज्यनिहाय आकडेवारीत महाराष्ट्राने ३३ हजार ८७२ स्टार्टअप्ससह देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. माहिती तंत्रज्ञान, फिनटेक, हेल्थटेक, शिक्षण, कृषी, उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि हरित ऊर्जा अशा विविध क्षेत्रांत महाराष्ट्रातील स्टार्टअप्स उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.

महाराष्ट्रानंतर कर्नाटकमध्ये २० हजार २८७, उत्तर प्रदेशमध्ये १९ हजार ६८१. दिल्लीमध्ये १९ हजार ३७४ आणि तामिळनाडूमध्ये १७ हजार १७९ मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आहेत. त्यापाठोपाठ हरियाणा, गुजरात, तेलंगणा, केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा क्रमांक लागतो. या आकडेवारीवरून देशातील उद्योजकतेचा वेग वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Share Market Today: शेअर बाजारात तेजीची शक्यता! ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी निवडले टॉप स्टॉक्स

महाराष्ट्राने स्टार्टअप क्षेत्रात देशात प्रथम क्रमांक मिळवणे ही राज्यातील सक्षम औद्योगिक पायाभूत सुविधा, कुषाल मनुष्यबळ आणि नवकल्पनांना मिळणाऱ्या पाठबळाची पावती आहे, विशेषतः मुंबई आणि पुणे ही शहरे उद्योग, संशोधन संस्था, गुंतवणूकदार आणि उद्योजक यांना जोडणारे मजबूत केंद्र म्हणून विकसित होत आहेत. जागतिक स्तरावर स्पर्धात्मक स्टार्टअप्स उभे करण्यासाठी उद्योग, शैक्षणिक संस्था आणि शासन यांच्यातील समन्वय आणखी बळकट करणे गरजेचे आहे.

– संजय किर्लोस्कर, अध्यक्ष, एमसीसीआयए

महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक अपेक्षित

गेल्या दशकात भारताने जगातील सर्वात मोतवा स्टार्टअप परिसंस्थांमध्ये स्थान मिळवले असून, तंत्रज्ञानाधारित उद्योगांच्या वाढीत महाराष्ट्राची भूमिका सर्वाधिक महत्वाची ठरत आहे, तज्ज्ञांच्या मते, कृत्रिम बुद्धिमता, सेमीकंडक्टर, हरित तंत्रज्ञान, ड्रोन, इलेवट्रिक वाहन आणि आरोग्य तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये पुढील काही वर्षात महाराष्ट्रातील स्टार्टअप्सची संख्या आणि गुंतवणूक आणखी वाढण्याची शक्यता आहे.

NTT DATA चे ADAPTIS लॉन्च! भारतीय व्यवसायांसाठी स्मार्ट पेमेंट्स आणि कॉमर्सचा नवा अध्याय

पुणे ठरतेय पॉवरहाऊस पुणे हे महाराष्ट्रातील स्टार्टअप

परिसंस्थेचे प्रमुख केंद्र म्हणून वेगाने उदयास येत आहे. माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), बायोटेक, एडटेक, फिनटेक आणि डीप-टेक क्षेत्रातील शेकडो स्टार्टअप्स पुण्यात कार्यरत आहेत. आयटी पार्क, संशोधन संस्था, अभियांत्रिकी महाविद्यालये, स्टार्टअप इन्क्युबेशन आणि गुंतवणूकदारांचे जाळे यामुळे नवउद्योजकांसाठी पुणे आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

मुंबई, पुणे, नागपूर प्रमुख केंद्रे

महाराष्ट्रात विशेषतः मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि ठाणे ही शहरे स्टार्टअप्सची प्रमुख केंद्रे बनली आहेत. पुण्यात माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, कृत्रिम बुद्धिमता, सॉफ्टवेअर, डीप-टेक, एडटेक आणि बायोटेक क्षेत्रातील अनेक नवउद्योग वेगाने विकसित होत आहेत. उच्च शिक्षण संस्था, संशोधन केंद्रे, गुंतवणूकदारांची उपलब्धता आणि उद्योगस्नेही वातावरण यामुळे राज्यातील स्टार्टअप परिसंस्था अधिक मजबूत होत आहे.

 

Web Title: Business news maharashtra ranks first in startup india 10 years data mumbai pune hub

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 01:32 PM

Topics:  

  • Business News
  • maharashtra
  • Nagpur
  • pune news

संबंधित बातम्या

Baramati News : बारामतीच्या शाळांसाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय! पुणे जिल्ह्यातील 600 ZP शाळा होणार ‘मॉडेल स्कूल’
1

Baramati News : बारामतीच्या शाळांसाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय! पुणे जिल्ह्यातील 600 ZP शाळा होणार ‘मॉडेल स्कूल’

पुण्यात भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; पाषाण-बावधन रस्त्यावरील धक्कादायक घटना
2

पुण्यात भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; पाषाण-बावधन रस्त्यावरील धक्कादायक घटना

पुण्यात ‘ग्लोबल स्कॉलर्स’चा एकलव्य इंडिया फाऊंडेशनकडून सत्कार; तब्बल 25 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेणार
3

पुण्यात ‘ग्लोबल स्कॉलर्स’चा एकलव्य इंडिया फाऊंडेशनकडून सत्कार; तब्बल 25 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेणार

संतोष पंडितवर गुन्हा, मग आमदार गायकवाडांवर का नाही? कोथरूड पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक
4

संतोष पंडितवर गुन्हा, मग आमदार गायकवाडांवर का नाही? कोथरूड पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.