सीएट टायर्सतर्फे मिशेलिनचा कॅम्सो या ऑफ-हायवे टायर्स ब्रँडचे संपादन!
सीएट ही आरपीजी कंपनी आणि मिशेलिन या टायर्स क्षेत्रातील जागतिक आघाडीच्या कंपनीने आज भागिदारी केल्याचे जाहीर केले आहे. याअंतर्गात सीएटद्वारे कॅम्लो ब्रँडचा ऑफ-हायवे बांधकाम उपकरण व्यवसाय आणि मिशेलिनचा टायर व ट्रॅक्स व्यवसायाचे पूर्ण रोखीत संपादन केले जाणार असून, या व्यवहाराचे मूल्य अंदाजे २२५ दशलक्ष डॉलर्स असेल. या व्यवहारामध्ये कॅलेंडर वर्ष २०२३ मधील २१३ दशलक्ष उत्पन्न व कॅम्सो ब्रँडची जागतिक जबाबदारी व अत्याधुनिक उत्पादन व्यवसायांचा समावेश आहे.
कॅम्सो हा बांधकाम उपकरण टायर आणि ट्रॅक्स क्षेत्रातील प्रीमियम ब्रँड असून, ईयू व उत्तर अमेरिकी आफ्टर मार्केट आणि ओई क्षेत्रात या कंपनीने दमदार इक्विटी व स्थान तयार केले आहे. तीन वर्षांच्या लायन्ससिंग कालावधीनंतर कॅम्सो ब्रँड सीएटला कायमस्वरूपी दिला जाणार आहे. यामुळे हाय मार्जिन ऑफ- हायवे टायर्स (ओएचटी) आणि ट्रॅक्स क्षेत्रात सीएटची उत्पादन श्रेणी विस्तारेल. त्यामध्ये शेती उपकरणांसाठी लागणारे टायर्स व ट्रॅक्स, हार्वेस्टर टायर्स व ट्रॅक्स, पॉवर स्पोर्ट्स ट्रॅक्स, मटेरियल हाताळणी टायर्स यांचा समावेश असेल. मिशेलिन कॉम्पॅक्ट लाइन बायस टायर्स व बांधकाम ट्रॅक्सशी संबंधित कामातून बाहेर पडेल.
हे संपादन सीएटच्या हाय मार्जिन ओएचटी क्षेत्रात आघाडीची कंपनी बनण्याच्या महत्त्वाकांक्षेच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. गेल्या दशकभरात सीएटद्वारे ओएचटी व्यवसाय उभारणीवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, त्यात ९०० उत्पादनांचा समावेश आहे. कंपनीद्वारे शेती क्षेत्राच्या रेंजविषयक ८४ टक्के गरजा पुरवल्या जातात. कॅम्सोमुळे सीएटला ट्रॅक्स व बांधकाम टायर्समधील उत्पादन श्रेणी विस्तारणे शक्य होईल. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, यामुळे सीएटला ४० आंतरराष्ट्रीय ओईएम व प्रीमियम इंटरनॅशनल ओएचटी वितरकांसह जागतिक ग्राहकवर्गापर्यंत पोहोचणे शक्य होईल. सीएटमुळे कॅम्सोला शेती उपकरणांसाठी लागणाऱ्या टायर्ससारख्या क्षेत्रात विस्तार करता येईल. दोन्ही ब्रँड्स आपापले स्थान व क्षमतांच्या बाबतीत एकमेकांना पूरक आहेत.
कितीही पैसे कमावले, तरीही ‘या’ राज्यात नाही भरावा लागत आयकर! वाचा… कोणते आहे हे करमुक्त राज्य!
सीएट आणि मिशेलिन हे ब्रँड्स ग्राहक, पुरवठादार व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी संपूर्ण समन्वयासह आणि सफाईदार पद्धतीने स्थित्यंतर करण्यासाठी बांधील आहेत. संपादित करण्यात आलेल्या उत्पादन सुविधा श्रीलंका येथे कार्यरत आहेत. या व्यवहारासाठी संबंधित नियामक मान्यता मिळणे बाकी आहे.
आरपीजी एंटरप्राइजचे उपाध्यक्ष अनंत गोएंका म्हणाले आहे की, ‘या संपादनाचा सीएटवर लक्षणीय धोरणात्मक परिणाम होणार हे, कारण त्यामुळे कंपनीचा जागतिक पातळीवर आघाडीची कंपनी बनण्याकडे प्रवास होणार आहे. कॅम्सो हा ऑफ-हायवे टायर बाजारपेठेतील आघाडीचा ब्रँड असून, कित्येक वर्षांच्या गुंतवणुकीतून दर्जेदार उत्पादने व गुणवत्तापूर्ण उत्पादन सुविधा घडवून, मिशेलिनच्या मार्गदर्शनाखाली तो उभारण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, आम्हाला कॅम्सो आणि सीएटदरम्यान समान संस्कृती दिसून आली असून, ते कामाच्या टीक्यूएम पद्धतीमुळे शक्य झाले आहे.’
सीएटचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अर्णब बॅनर्जी म्हणाले आहे की, ‘कॅम्सो ब्रँड हा सीएटच्या ऑफ-हायवे टायर व्यवसायाच्या विकास धोरणांशी सुसंगत असून, पर्यायाने आमचे मार्जिन प्रोफाइल उंचावण्यास मदत होईल. बहुतेक सर्व प्रीमियम ग्राहक उपलब्ध होणे आणि पात्र जागतिक कर्मचारी वर्ग ही आमच्यासाठी या संपादनाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. आम्हाला सीएट आणि कॅम्सो या दोन्ही ब्रँडदरम्यान अनुकूलता दिसून आली आहे. आम्हाला विश्वास आहे, की त्यांच्या एकमेकांसाठी पूरक क्षमता व स्थानामुळे दोन्ही कंपन्यांना चांगला लाभ होईल.’
मिशेलिनच्या बियाँड रोड बिझनेस लाइनचे वरिष्ठ उपाध्यक्ष नूर बुहासून म्हणाल्या आहे की, ‘लहान आकाराच्या बांधकाम उपकरण व्यवसायासाठी लागणारे बायस टायर्स आणि ट्रॅक्सचा आमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी सीएट ही अतिशय योग्य निवड आहे, असे मिशेलिनला वाटते. आमच्या दोन्ही कंपन्या हे स्थित्यंतर कर्मचारी व व्यावसायिक सलगतेसाठी सहजपणे घडवून आणण्यासाठी बांधील आहेत. यातून मिशेलिनने आपल्या समूहाच्या शाश्वत विकास धोरणाशी सुसंगत बियाँड रोड व्यवसायाला नवा आकार देण्याचे काम सुरू ठेवण्याचे ठरवले आहे.’