
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Vandana Shah Fee: बॉलिवूडमधील Actor, Actress आणि नामांकित उद्योगपतींच्या घटस्फोटाची प्रकरणे हाताळणाऱ्या, प्रसिद्ध वकील वंदना शाह सध्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. मात्र, यावेळी त्यांच्याविषयीच्या या चर्चांचे कारण एखादे विशिष्ट प्रकरण नसून, त्यांची प्रचंड फी हे आहे. त्यांनी नुकतेच उघड केले की, केवळ ४५ मिनिटांच्या कन्सल्टेशनसाठी बरीच मोठी रक्कम आकारतात. काय आहे ती रक्कम ? आणि नेमका कसा आहे प्रवास जाणून घेऊयात.
The Crore Club या पॉडकास्टमध्ये वंदना शाह यांनी खुलासा केला. स्वतःच आपल्या व्यावसायिक फी आणि कमाईशी संबंधित तपशील उघड केले. त्यांची फी किती प्रचंड आहे हे समजल्यावर सोशल मीडियावरील लोक थक्क झाले आहेत. प्रत्येकाच्या मनात केवळ एकच प्रश्न घोळत आहे: नक्की, एका वकिलाचा सल्ला इतका महागडा कसा असू शकतो? चला तर मग, यामागील कारणे जाणून घेऊया.
वंदना शाह यांच्यासाठी ज्या आज कोट्यवधी रुपयांची फी आकारतात हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. या पॉडकास्ट दरम्यान त्यांनी खुलासा केला की, त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केवळ ₹७५० च्या एका अत्यंत साध्या रकमेपासून झाली होती; म्हणजेच, त्यांच्या पहिल्याच सल्लामसलतीची फी अवघी ₹७५० इतकी होती. याच पॉडकास्टमध्ये वंदना शाह यांनी हे देखील सांगितले की, त्यांच्या आयुष्यातील कठीण टप्पे आणि त्यासोबतच त्यांचे स्वतःचे वैयक्तिक अनुभव यांनीच अखेरीस त्यांना ‘कौटुंबिक आणि घटस्फोट कायद्या’च्या क्षेत्राकडे वळवले. त्यानंतर, जसजसे त्यांचे काम पुढे सरकत गेले, तसतसे त्यांना हळूहळू हाय-प्रोफाईल खटले मिळू लागले आणि एक ‘सेलिब्रिटी घटस्फोट वकील’ म्हणून त्यांची ओळख – प्रतिष्ठा आकार घेऊ लागली.
वंदना शाह यांनी खुलासा केला की, सुरुवातीच्या काळात त्यांनी प्रसारमाध्यम क्षेत्रातील एका जोडप्याचा घटस्फोटाचा खटला हाती घेतला होता, ज्यासाठी त्यांना अंदाजे ₹३५,००० इतकी रक्कम मिळाली होती. मात्र, जेव्हा एका बॉलिवूड जोडप्याचा खटला त्यांच्याकडे आला, तेव्हा त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने मोठे परिवर्तन घडले. त्या ‘हाय-प्रोफाईल’ खटल्यानंतर, त्यांच्या फीमध्ये प्रचंड वाढ झाली ती जवळपास दहा पटीने वाढली आणि ₹३५,००० वरून थेट लाखांच्या घरात पोहोचली.
एका पॉडकास्ट दरम्यान, आजच्या काळात त्या किती फी आकारतात असे विचारले असता, त्यांनी सांगितले की सरासरी, ४५ मिनिटांच्या सल्लामसलतीसाठी त्या सुमारे ₹६०,००० इतकी फी घेतात. याचा अर्थ असा की, एखादी व्यक्ती केवळ सल्ला घेण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे गेली, तरीही त्यांना मोठी रक्कम मोजावी लागू शकते. पण त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, खटल्याचे स्वरूप आणि संबंधित क्लायंट यानुसार त्यांच्या फीमध्ये बदल होत असतो.