'या' मुख्यमंत्र्याच्या कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल; वर्षभरात पाडला पैशांचा पाऊस
2024 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी काहीसे चढ-उतारांनी भरलेले राहिले. मात्र, असे असले तरी मागील २०२४ हे वर्ष काही शेअर्ससाठी उत्तम राहिले आहे. काही शेअर्स यावर्षी जोरदार कामगिरी केली आहे. यातील एक शेअर देशातील एका आघाडीच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कंपनीचा आहे. हेरिटेज फूड्स लिमिटेड असे या शेअरचे नाव आहे. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना एका वर्षात 50 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे.
कोण आहेत हेरिटेज फूड्स लिमिटेडचे मालक
एन चंद्राबाबू नायडू हे हेरिटेज फूड्स लिमिटेडचे संस्थापक आहेत. मात्र, सध्या कंपनीची संपूर्ण जबाबदारी भुवनेश्वरी नारा यांच्याकडे आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी भुवनेश्वरी नारा या कंपनीच्या सह-संस्थापक, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. चंद्राबाबू नायडू हे सध्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. यासोबतच ते देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री देखील आहेत. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या अहवालानुसार, चंद्राबाबू नायडू यांची एकूण संपत्ती 931 कोटी रुपये इतकी आहे.
Elon Musk : एलॉन मस्क यांनी बदललं स्वत:चं नावं; आता ‘या’ नावाने ओळखले जाणार
शेअर्समध्ये झालाीये मोठी वाढ
हेरिटेज फूड्स लिमिटेडच्या समभागांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. या शेअरने एका वर्षात 50 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. जर आपण एका वर्षाच्या रिटर्नबद्दल बोललो तर ते 59 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. याशिवाय 5 वर्षांचा परतावा हा 161 टक्क्यांहून अधिक आहे. मंगळवारी म्हणजेच 31 डिसेंबर 2024 रोजी देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली आहे. हेरिटेज फूड्स लिमिटेडचे शेअर्स मंगळवारी 0.30 टक्क्यांच्या वाढीसह 484.15 रुपयांवर व्यवहार करत होते.
निवडणुकीनंतर रॉकेट बनला होता हा शेअर
2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी समोर आले. चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या पक्षाला या निवडणुकीत चांगल्या जागा मिळाल्या. याशिवाय राज्यात विधानसभा निवडणुकीतही टीडीपीला चांगल्या जागा मिळाल्या. त्यामुळे निवडणुक निकालानंतर चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर कंपनीचे शेअर्स रॉकेट झाले होते. 23 मे रोजी कंपनीच्या शेअरची किंमत 354.50 रुपये होती. यानंतर लोकसभा निवडणुकीचे निकाल आले. त्यामुळे 23 मे रोजी असलेल्या या शेअरची 354.50 रुपये ही किंमत 10 जूनपर्यंत तो 695 रुपयांवर पोहोचली आहे.
हेरिटेज फूड्स लिमिटेडची मूलभूत तत्त्वे
मंगळवारी शेअर बाजारात हेरिटेज फूड्स लिमिटेडचे मार्केट कॅप 4,505 कोटी रुपये नोंदवले गेले. तर स्टॉक पीई 25.8 आहे. तर, स्टॉकचा ROCE 16.2 टक्के आहे. ROE बद्दल बोलायचे तर ते 13.3 टक्के आहे. शेअरचे पुस्तकी मूल्य 96.1 रुपये आहे. हेरिटेज फूड्स लिमिटेडच्या सार्वकालिक उच्चांकाबद्दल बोलायचे झाले तर, तो 728 आणि सर्वकालीन, तर निच्चांकी किंमत 288 रुपये नोंदवली गेली आहे.