इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची (डावीकडे) आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल ग्रोसी (उजवीकडे) (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन या चर्चेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, इराण न्याय आणि समान करारासाठी तयार आहे. परंतु त्यांनी हेही स्पष्ट केले की, अमेरिकेच्या दबावाला इराण बळी पडणार नाही. अराघची यांनी असेही संकेत दिले की, अमेरिकेने इराणवर कोणताही दबाव न आणता प्रामाणिकपणे चर्चा केली आणि इराणने देखील अणु कराराबाबत तडजोड करण्यास सहमती दिली तर त्यांच्यावर असलेले संयुक्त राष्ट्रांचे निर्बंध हटवण्यात येतील असे राफेल ग्रोस यांनी म्हटले आहे.
अराघची यांनी सांगितले की, त्यांनी IAEA च्या प्रमुखांशी गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या इस्रायल-इराण युद्धावरही चर्चा झाली. या युद्धानंतर अमेरिकेने देखील इराणवरील कारवई थांबवली होती. परंतु अलीकडच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा इराणवर नियंत्रणाचे सत्र सुरु केले आहे. नुकतेच अमेरिकेने कॅरेबियन समुद्रात जगातील सर्वात मोठा विमानवाहू युद्धपोत USS Gerald R. Ford तैनात केले आहे. तसेच इतरही काही युद्धनौका तैनात करण्यात आल्या आहे. यामुळे अमेरिका (America) इराण तणाव वाढत चालला आहे.
याचे वेळी IAEA प्रमुख ग्रॉसी यांनी इराणला त्यांच्या युरेनियमचा साठा ६०% नेला असल्याचा इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, ही टक्केवारी अण्वस्त्र बनवण्याच्या पातळीच्या जवळ पोहचली आहे. त्यांच्या मते इराणने यावर नियंत्रण आणासले पाहिजे. त्यांना कोणताही अणुशस्त्रे तयार करु शकत नाही.
याच वेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी अमेरिकेला गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या मते, इराणला केवळ युरेनियमचा साठा समृद्ध करण्यापासून थांबवणे पुरसे नाही, तर त्याच्या सृद्धीककरणासाठी लागणारी यंत्रणा, पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत.
Joined by nuclear experts, I will meet @rafaelmgrossi on Mon for deep technical discussion. Also meeting @badralbusaidi ahead of diplomacy with U.S. on Tues. I am in Geneva with real ideas to achieve a fair and equitable deal.
What is not on the table: submission before threats — Seyed Abbas Araghchi (@araghchi) February 16, 2026






