इलॉन मस्क आता केकियस मॅक्सिमस नावाने ओळखले जाणार, वाचा...नेमकं का बदलले नाव?
जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि एक्स, टेस्लासारख्या कंपन्यांचे प्रमुख इलॉन मस्क हे नेहमीच चर्चेत असतात. अशातच आता आणखी एका मुद्द्यावरून ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ते नेहमी समाज माध्यमांवर अशा काही गोष्टी करत असतात, ज्यामुळे त्यांची समाजमाध्यमांवर बरीच चर्चा होत असते. आता देखील असाच एक मुद्दा त्यांचा चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे हा मुद्दा ऐकून जगभरातील लोकांना धक्का बसला आहे.
नेमके का बदलले नाव
जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क यांनी आपले नाव बदलले आहे. त्यांनी आपले हे नाव कागदोपत्री बदलले, नसले तरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मस्क मात्र, त्यांनी आपले नाव बदलून “केकियस मॅक्सिमस” असे केले आहे. त्यांनी आपला प्रोफाईल पिक्चरदेखील बदलला असून, त्याजागी ‘पेप द फ्रॉग’ मीमचा फोटो लावला आहे. यामध्ये पेप द फ्रॉगने योद्ध्याचे कपडे घातले असून, त्याच्या हातात गेम जॉयस्टिक दिसत आहे. तुमच्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की, मस्क यांनी आपले नाव का बदलले आणि या नवीन नावाचा नेमका अर्थ काय? हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत.
2025 हे वर्ष शेअर बाजारासाठी कसे राहील? कशी राहील बाजाराची चाल? वाचा… तज्ज्ञ काय सांगतात
Kekius Maximus will soon reach level 80 in hardcore PoE pic.twitter.com/Cg5ttuqjvX
— Kekius Maximus (@elonmusk) December 31, 2024
काय आहे “केकियस मॅक्सिमस” या नवीन नावाचा अर्थ
इलॉन मस्क यांनी एक्सवर आपल्या नावाऐवजी “केकियस मॅक्सिमस” नाव ठेवले आहे. “केकियस मॅक्सिमस” हे एक क्रिप्टोकरन्सी टोकन आहे, जे एथीरियम आणि सोलानावर आधारित आहे. विशेष म्हणजे, इलॉन मस्क यांनी आपले नाव “केकियस मॅक्सिमस” ठेवल्यानंतर या टोकनला अचानक गती मिळाली अन् अवघ्या 24 तासात त्याचे मूल्य 500 टक्के वाढले आहे. या क्रिप्टोकरन्सी टोकनेचे मूल्य सुमारे 30 लाख रुपयांपर्यंत वाढले आहे. दरम्यान, इलॉन मस्क यांनी यापूर्वी Dogecoin बाबत असेच केले होते. त्यावेळीही या करन्सीचे मूल्य अनेक पटीने वाढले होते.
मीमकॉइन्स म्हणजे काय?
“केकियस मॅक्सिमस” एक मीमकॉइन असून, क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये एक मोठे नाव म्हणून उदयास आले आहे. मीमकॉइन ही एक क्रिप्टोकरन्सी आहे, जी इंटरनेटवर चालू असलेल्या ट्रेंड किंवा मीम्सपासून प्रेरित आहे. गेल्या काही दिवसांत यासंबंधीच्या हालचाली वाढल्या असून, ते गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत. त्याचे ट्रेडिंग व्हॉल्यूम 2,734,948 डॉलरपर्यंत वाढले, हे दर्शविते की, गुंतवणूकदार त्यात रस घेत आहेत. 27 डिसेंबर रोजी हा सर्वोच्च पातळीवर पोहोचला. आता इलॉन मस्क यांच्या कृत्याने त्यात मोठी उडी पाहायला मिळत आहे.