Danone India चा मोठा विक्रम! २०,९११ आरोग्य तज्ञांच्या प्रतिज्ञेसह अॅनिमियाविरोधात ‘Iron Up’ मोहीम
Danone India Sets a Major Record: डॅनोन इंडियाने देशभरातील २०,९११ आरोग्यसेवा तज्ञांच्या प्रतिज्ञांसह आयर्न डेफिशियन्सी अॅनिमियाचे (लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रक्तक्षय) निर्मूलन करण्यासाठी एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यामधून अॅनिमियाबद्दल जनजागृती करणे, वेळेत निदान करण्यास प्रेरित करणे आणि लोहाची कमतरता दूर करण्यासाठी प्रभावी पोषणविषयक हस्तक्षेपांना चालना देणे याप्रती डॅनोनचे सामूहिक प्रयत्न दिसून येतात. या उपक्रमामधून सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याचा दर्जा सुधारण्यासाठी एकत्रित कृतीचे महत्त्व निदर्शनास येते.
नोव्हेंबर २०२५ मध्ये डॅनोन इंडियाने देशभरातील आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया (आयडीए) रोखण्यासाठी आणि त्याचे वेळेत निदान करण्यासाठी देशव्यापी उपक्रम ‘आयर्न अप!’ सुरू केला. या उपक्रमाचा भाग म्हणून डॅनोनने आयडीए प्लेज कॅम्पेन राबवली. या मोहिमेच्या माध्यमातून भारतातील आरोग्यसेवा तज्ञांना जनजागृती करणे, वेळेवर निदान सुधारणे आणि प्रतिबंधात्मक पोषणास प्रेरित करणे याप्रती कटिबद्ध होण्याचे आवाहन करण्यात आले. या सामूहिक प्रयत्नाचा वैद्यकीय समुदायामध्ये संघटित चळवळ निर्माण करण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे कुटुंबांना दररोज लोहाच्या कमतरतेवर लक्ष देऊन त्याबाबत कृती करण्यास मदत होईल.
आयर्न अप मोहिमेअंतर्गत शैक्षणिक उपक्रम आणि प्रत्यक्ष उपक्रमांद्वारे भारतातील बालरोगतज्ञ, सामान्य चिकित्सक आणि इतर आरोग्य तज्ञांना सहभागी करून घेण्यात आले. वैद्यकीय समुदायाला प्रेरित करत डॅनोन इंडियाचा लोहाच्या कमतरतेबद्दल जागरूकता वाढवण्याचा आणि विशेषतः आजार होण्याचा धोका असलेल्या व्यक्तींमध्ये जीवनाचा दर्जा सुधारण्याचा मनसुबा आहे. आपल्या विज्ञान-आधारित पोषण दृष्टिकोनाचा भाग म्हणून डॅनोन इंडिया आयर्नबायोटिक्स सारखी प्रगत उत्पादने विकसित करत आहे. या उत्पादनांमध्ये लोहाचे शोषण करणारे आणि पोटाचे आरोग्य सुधारणारे आवश्यक पोषक घटक आहेत, ज्यासह आयर्न कमतरतेच्या समस्येचे आणि अॅनिमियाचे निराकरण करण्याप्रती कंपनीची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे.
या महत्त्वपूर्ण टप्प्याबाबत मत व्यक्त करत डॅनोन इंडियाच्या मार्केटिंग डायरेक्टर श्रीमती प्रियंका वर्मा म्हणाल्या, ”आम्हाला या प्रभावी उपक्रमासाठी एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून सन्मानित करण्यात येण्याचा अत्यंत अभिमान वाटतो. २०,९११ आरोग्य सेवा तज्ञांनी घेतलेल्या या प्रतिज्ञेमधून लाखो व्यक्तींना होणाऱ्या अॅनिमियाविरुद्ध लढण्यासाठी वैद्यकीय समुदायाची सामूहिक कटिबद्धता दिसून येते. हा निरंतर आणि समुदायावर आधारित दृष्टिकोन भारतातील अनेक व्यक्तींच्या आरोग्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणेल. यामधून सामूहिक कृतीची क्षमता दिसून येते, जेथे आरोग्यसेवा तज्ञ, समुदाय आणि संस्था अर्थपूर्ण बदल घडवण्यासाठी एकत्र येतात. आम्हाला या चळवळीला पाठबळ देताना अभिमान वाटतो, जी देशाचा पोषणाचा पाया मजबूत करण्यासह पुराव्यावर आधारित आणि सर्वसमावेशक सार्वजनिक आरोग्य नवनिर्मितीमध्ये भारताला जागतिक स्तरावर आघाडीवर घेऊन जाते.”
आयर्न अप उपक्रमासह, डॅनोन इंडियाने बिहारमध्ये स्वस्थ माता स्वस्थ बालक हा वर्षभर चालणारा उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम मातांचे पोषण सुधारण्यासाठी, जनजागृती वाढवण्यासाठी आणि माता व बालक या दोघांच्या आरोग्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. हा उपक्रम गर्भवती महिला आणि लहान मुलांमधील लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या अॅनिमियाविरुद्ध लढण्याच्या डॅनोनच्या विशेष प्रयत्नांचा भाग आहे.
एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून मिळालेली ही मान्यता कुपोषण आणि सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता दूर करण्यासाठी डॅनोन इंडियाने सुरू केलेल्या निरंतर प्रयत्नांमधील महत्त्वाचे पाऊल आहे. कंपनी आरोग्यदायी भविष्य घडवण्यासाठी आरोग्यसेवा भागधारक, धोरणकर्ते आणि समुदायांसोबत सहयोग करण्याप्रती कटिबद्ध आहे.






