Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Destroyed Cash : 5 लाखांच्या नोटा किड्यांनी कुरतडल्या, बँकेनेही बदलण्यास दिला नकार? नेमका काय आहे नियम?

Destroyed Cash : एका दुर्दैवी घटनेत एका शेतकऱ्याने वर्षभर अहोरात्र कष्ट करून कमावलेली पुंजी घरच्यांपासून लपवून ठेवली होती. मात्र, बँकेत ठेवण्याऐवजी घरात लपवून ठेवलेल्या तब्बल ५ लाख रुपयांच्या नोटा किड्यांनी/वाळवीने कुरतडून नष्ट केल्या आहेत.बँकेनेही नोटा बदलण्यास नकार दिला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 12, 2026 | 01:25 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • 5 लाखांच्या नोटा किड्यांनी कुरतडल्या
  • बँकेने बदलण्यास दिला नकार?
  • नेमका काय आहे नियम?
Destroyed Cash : व्यक्ती आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी बरेच कष्ट करतो. या कष्टामागे बराच काळा लोटला जातो. एक एक रुपया कष्टाने कमावलेला असतो. त्यातला एकही रुपया जरी गमावला तरी ते मनाकडे चणचण वाटून जाते. पण विनाकारण लाखो रुपये वाया घालवणे हे त्याहूनही अधिक विनाशकारी आहे. अशीच एक धक्कादयाक घटना राजस्थानमधून समोर आली आहे. राजस्थानच्या बालोत्रा ​​जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला ५ लाख रुपयांचे ( Destroyed Cash ) नुकसान झालं आहे, यासगळ्यात त्याला मोठा धक्का बसला आहे. नेमकं काय घडलं त्याच्यासोबत आणि बँकेकडून कोणत्या गोष्टी स्पष्ट करण्यात आल्यात? सविस्तर जाणून घेऊयात.

N Chandrasekaran Resigns : टाटा समूहात मोठी खळबळ! एन. चंद्रशेखरन यांचा Tata Sons च्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा; नेमकं कारण काय?

वाळवीने पैशांचा केला सत्यानाश

ही घटना पाचपद्राजवळील नेवाई गावात घडली. शेतकरी असलेल्या मंगिलाल मेघवाल यांचे ५ लाख रुपये वाळवीने खाऊन टाकले. मंगिलाल यांची चूक ही होती की, त्यांनी बँकेत पैसे ठेवण्याऐवजी ते एका पेटीत लपवून स्वतःजवळ ठेवले होते. मंगिलाल यांना वर्षभरापूर्वी जमिनीचा एक तुकडा विकून ५ लाख रुपये मिळवले होते. चोरीच्या भीतीने आणि आपली मुले ते पैसे उधळतील या काळजीपोटी, त्यांनी ते पैसे घरी ठेवण्याऐवजी शेतात लपवण्याचा निर्णय घेतला आणि हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरली.

कोणालाच मिळाला नाही पैसा

मंगिलालने ते पैसे एका प्लास्टिकच्या पिशवीत भरले आणि आपल्या शेतातील एका खड्ड्यात लपवून ठेवले. त्याने ते कुठे लपवले आहे हे आपल्या पत्नीला किंवा मुलांना सांगितलं नाही. काही महिन्यांनंतर, जेव्हा त्याला त्या पैशांची गरज भासली तेव्हा त्याने ते पैसे काढायचा निर्णय घेतला. पण, त्याने ते पैसे नेमके कुठे पुरले होते, ती जागा त्याला आठवत नव्हती. आपल्या १० बिघांच्या शेतात सर्वत्र शोधूनही त्याला ते पैसे सापडले नाहीत.

वाईट अवस्थेत नोटा

शेवटी त्याने आपल्या कुटुंबाला लपवलेल्या पैशांबद्दलचे सत्य सांगितले. सुरुवातीला घरच्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, पण खूप शोधाशोध केल्यानंतर ते पैसे सापडले. जवळपास वर्षभरानंतर, पावसाळ्यात, शेतात रोकड असलेली एक खराब झालेली पिशवी सापडली. जेव्हा कुटुंबाने ती उघडली, तेव्हा त्यांना आढळले की नोटांच्या बंडलाला वाळवी लागली होती. बहुतेक ५०० रुपयांच्या नोटा खूप खराब झाल्या होत्या आणि त्यांचे तुकडे तुकडे झाले होते.

बँकेने काय भूमिका मांडली?

कुटुंबातील सदस्यांनी खराब झालेल्या नोटा गोळा केल्या आणि आपले काही पैसे तरी परत मिळतील या आशेने ते पाचपद्रा येथील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गेले. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, नोटांची अवस्था इतकी वाईट होती की बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्या बदलून देण्यास नकार दिला. कुटुंबातील सदस्य एसबीआयच्या मुख्य शाखेतही गेले, पण तिथेही नोटा बदलून मिळाल्या नाहीत.

फाटलेल्या नोटा बदलून मिळू शकतात का?

RBI च्या नोट परतावा नियमांनुसार, वाळवी लागलेल्या किंवा फाटलेल्या नोटा बदलून मिळू शकतात. मात्र, अनुक्रमांक, गांधीजींचे चित्र आणि गव्हर्नरची सही यांसारखी महत्त्वाची वैशिष्ट्ये शाबूत आणि ओळखण्यायोग्य असतील, तर बँक त्या बदलून देण्यास नकार देऊ शकत नाही.

Hybrid Home Loan : होम लोनचा हप्ता वाढण्याची भीती? हायब्रिड होम लोनचा पर्याय ठरेल फायदेशीर; वाचतील लाखो रुपये

Web Title: Destroyed cash termites eat 5 lakh rupee cash hidden by farmer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • Business News
  • currency
  • Indian currency
  • Marathi News
  • RBI
  • RBI Action
  • RBI news
  • RBI Rule
  • SBI
  • SBI Bank

संबंधित बातम्या

 Yemen Crisis : हुथींनी इराणी हवाई संरक्षण शस्त्रांचे क्रूझ क्षेपणास्त्रांत रूपांतर केल्याचा आरोप
1

 Yemen Crisis : हुथींनी इराणी हवाई संरक्षण शस्त्रांचे क्रूझ क्षेपणास्त्रांत रूपांतर केल्याचा आरोप

Breaking News :ऐतिहासिक क्षण ;२३ वर्षानंतर अमेरिकेची इराक मधून पूर्ण माघार
2

Breaking News :ऐतिहासिक क्षण ;२३ वर्षानंतर अमेरिकेची इराक मधून पूर्ण माघार

Israel-Gaza : ‘आणखी मदत नाही’; अमेरिकन डेमोक्रॅटिक उमेदवारांचा इस्रायलविरोधात कठोर पवित्रा
3

Israel-Gaza : ‘आणखी मदत नाही’; अमेरिकन डेमोक्रॅटिक उमेदवारांचा इस्रायलविरोधात कठोर पवित्रा

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू
4

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.