"काहीही करा, पण... कांदा निर्यातबंदी करु नका!" अजित पवारांची केंद्रीय मंत्री गोयल यांच्याकडे मागणी!
गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात कांदा दरात मोठी घसरण झाली होती. राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा एक रुपया प्रति किलो दराने अर्थात १०० रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात होता. ज्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळणे मुश्कील झाले होते. परिणामी, लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मोठा फटका होता. राज्यात भाजपला दोन आकडी जागाही मिळवता आल्या नाही. याच पार्श्वभूमीवर आज अजित पवार यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष यांच्याकडे एक मागणी केली आहे.
काय म्हटलंय अजित पवार यांनी?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष यांच्या मागणी केली आहे की, “कांद्या निर्यात बंदीच मोठी किंमत मोजावी लागली, काहीही करा, पण पुन्हा कांदा निर्यात बंदी करु नका” देशात लोकसभा निवडणूक पार पडली. ज्यात भारतीय जनता पक्ष आणि अन्य साथीदार पक्षांना केंद्रात सरकार टिकवण्यात यश मिळाले. मात्र, महाराष्ट्रात भाजप आणि मित्र पक्षांची खूप पीछेहाट झाली. परिणामी, राज्यात अपेक्षित यश न मिळाल्यामुळे अजित पवार यांनी कांद्याच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना घरचा आहेर पाठवला आहे. तसेच पुन्हा कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊ नये, अशी मागणी केली आहे.
मुंबई षन्मुखानंद सभागृहात आज (ता.६) शासकीय योजना व त्यांच्या अंमलबजावणी संदर्भात राज्यस्तरीय महायुती पदाधिकारी बैठक पार पडली. यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. दरम्यान, केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आधी कांदा दर नियंत्रणात आणण्यासाठी ८ डिसेंबर २०२४ रोजी निर्यातबंदीची घोषणा केली होती.
कांदा निर्यातबंदीच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. त्याबाबत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मतदानाच्या स्वरूपात रोष व्यक्त करत, सत्ताधारी भाजपाला राज्यात मोठा दणका दिला. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणूक पाहता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धडकी भरल्याचे पाहायला मिळत असून, त्यांनी केंद्रीय मंत्री पियुष यांच्याकडे जाहीर भाषणातून पुन्हा कांदा निर्यात बंदी न करण्याची मागणी केली आहे.