
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
सरकार आता E10 पेट्रोलचा विचार करत आहे. जुन्या वाहनांच्या मालकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी, सरकार १० टक्के इथेनॉल मिश्रणासह E10 पेट्रोल आणण्याच्या पर्यायाचा विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी, प्रीमियम पेट्रोलचे E10 मध्ये रूपांतर करण्याची योजना आखली जात आहे. अलीकडेच BPCL च्या CMD नी स्वतः या माहितीबाबत खुलासा केला आहे.
सरकार E 10 पेट्रोल पुन्हा आणण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे, पण यावर अजून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर झालेल्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत BPCL च्या CMD यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या मते,E 10 पेट्रोल विकण्यासाठी कोणत्याही नवीन पायाभूत सुविधांची आवश्यकता गरजेची नाही. तेल कंपन्यांना सध्या सध्या पुरवठ्याबाबतही कोणत्या मोठ्या संकटांचा सामना करवा लागत नाही आहे.
सध्या, या प्रकरणी सरकार आणि तेल कंपन्यांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे अजून अंतिम निर्णयाबाबत चित्र स्पष्ट झालेलं नाही. जुलैमध्ये पेट्रोलियम मंत्रालयाने संसदेत सांगितल्या प्रणाणे E0 आणि E10 पेट्रोल परत आणण्याची कोणतीही योजना नाही. त्यामुळे आता ऑगस्टमध्ये सुरु झालेल्या या चर्चा प्रश्न निर्माण करतात. सरकार आणि उद्योग यांच्यात प्राथमिक चर्चा झाल्याचे वृत्त समोर आले आणि मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनीही जुन्या वाहनांसाठी E10 चा पर्याय उपलब्ध करून देण्याबद्दल सांगितलं त्यामुळे या सगळ्या परिस्थितीबाबत सशंका वाढत आहे.
देशभरातील पेट्रोल पंपांवर आता 20% इथेनॉल असलेले E20 पेट्रोल वापरले जात आहे. जुन्या वाहनांच्या मालकांनी E20 चा इंजिनवर होणारा परिणाम आणि कमी मायलेज यामुळे वाहनांवर होणारा परिणाम त्यामुळे सरकारचा विश्वास आहे की E10 पेट्रोलचा पर्याय दिला तर हे प्रश्न सोडवले जाऊ शकतात. पण, E10 पेट्रोल 95-ऑक्टेन पेट्रोल म्हणून जास्त किमतीत दिले जाईल की ग्राहकांना स्वस्त किमतीत पेट्रोल मिळेल हे अजून काहीच स्पष्ट नाही.