शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे याकरिता केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या पीएम किसान सन्मान निधीबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. सरकारकडून नवरात्रीमध्ये देशभरातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये हस्तांतरित केले जाणार आहेत. सरकारने पीएम किसान निधीच्या 18 व्या हप्त्याच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे.
पीएम किसान सन्मान निधीच्या वेबसाइटनुसार, केंद्र सरकार 5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांसाठी योजनेचा 18 वा हप्ता जारी करणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांसाठी नवरात्रीमध्ये सरकारकडून भेट दिली जाणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशातील गरीब शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकारकडून केली जाते. मदतीची रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात डीबीटीद्वारे ट्रान्सफर केली जाते. प्रत्येक हप्त्यात 2 हजार अशी वर्षाला तीन हप्त्यांमध्ये ही मदत सरकारकडून करण्यात येते.
पीएम किसान सन्मान निधी योजना ( PM kisan Samman Yojana)
2019 मध्ये केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेंतर्गत मिळणारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात. या योजनेच्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी eKYC ( Electronic Know Your Customer) करून घेणे आवश्यक आहे. ई-केवायसीद्वारे तुम्ही ओळख पुष्टी झाल्यानंतरच पैसे त्यांच्या खात्यात जमा होतात. तुम्ही OTP द्वारे किंवा तुमच्या फिंगरप्रिंटद्वारे किंवा चेहऱ्याच्या प्रमाणीकरणाद्वारे कोणत्याही कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) केंद्राला भेट देऊन स्वतःला ऑनलाइन ओळखू शकता.
ई-केवायसी झाली नसल्यास येऊ शकते समस्या
ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसानचे ई-केवायसी केली नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्डद्वारे OTP च्या मदतीने PM किसान पोर्टलवर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. तसेच तुम्ही जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देऊन देखील ई-केवायसी पूर्ण करू शकता.
पंतप्रधान किसान निधी योजनेची संपूर्ण यंत्रणा सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये आहे. योजनेचा निधी थेट शेतकऱ्यांच्या बॅंके खात्यात जमा होत असल्याने भ्रष्टाचाराल आळा बसण्यास मदत होते. यापूर्वी या योजनेचा 17 वा हप्ता सरकारने जुलै महिन्यात जारी केला होता.
जाणून घ्या ई-केवायसी कशी करावी?