Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food Safety Action : चिकन खाणं पडलं महागात, कॅफेच्या निष्काळजीपणामुळे महिला आजारी! कोर्टाने ठोठावला मोठा दंड

Food Safety Action : बाहेर कॅफे किंवा रेस्टॉरंटमध्ये चिकनचे पदार्थ खाणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एका कॅफेमध्ये दूषित चिकन खाल्ल्यानंतर महिला गंभीर आजारी पडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा आणि ग्राहक न्यायालयाने रेस्टॉरंटच्या निष्काळजीपणावर कडक ओढत संबंधित कॅफेला मोठा दंड ठोठावला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 26, 2026 | 04:38 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • चिकन खाणं पडलं महागात
  • कॅफेच्या निष्काळजीपणामुळे महिला आजारी!
  • कोर्टाने ठोठावला मोठा दंड
Food Safety Action : आजकाल घरी जेवणाचा कंटाळा आला की आपण सहज हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कॅफेमध्ये जातो. बाहेर खाणंपिणं सध्या खूप नॉर्मल झालं आहे. पण आपण जिथे जेवतो तिथलं जेवण सुरक्षित आहे का? ही मोठा प्रश्न आहे. कारण स्वच्छतेच्या समस्यांबाबतच्या तक्रारीही सातत्याने समोर येत आहेत. असाच काहीसा प्रकार नुकताच केरळमध्ये घडला. जिथे एक महिला चिकन खाण्यासाठी एका कॅफेमध्ये गेली होती. ते खाल्ल्यानंतर तिला चांगलाच दणका बसला ती आजारी पडली. पण त्यानंतर तिने यासगळ्याची तक्रार ग्राहक मंचावर केली आहे. कोर्टाने त्या कॅफेला दणदणीत फाईन लावत मोठा दणका दिला. नेमका काय घडला प्रकार? ( Food Safety Action ) 

Best FD Interest Rates : काय सांगताय? सरकारी बँकांपेक्षाही जास्त रिटर्न, ‘या’ बँका FD वर देताहेत 8.5% पर्यंत व्याज

नेमकं प्रकरण काय?

केरळमधील पथानामथिट्टा जिल्ह्यात हा प्रकार घडला. एका महिलेने कॅफेमध्ये ग्रिल्ड चिकन खाल्लं आणि त्यानंतर ती आजारी पडली. ही घटना २१ ऑक्टोबर, २०२५ रोजीची आहे. जेव्हा एक महिला तिच्या बहिणीसोबत एका कॅफेमध्ये गेली होती. त्या कॅफेमध्ये जाऊन दोघींनी अल्फाम खाल्ले. चिकनची चव विचित्र असल्याचं तिला जाणवलं. आणि त्यानंतर ते चिकन तिला चांगलंच महागात पडलं. तिला उलट्या, पोटदुखी आणि इतर त्रास जाणवू लागला. तिने सुरुवातीला डॉक्टरांचा सल्ला घेतला. पण तिची प्रकृती अधिकच खालावत गेली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. डॉक्टरांनी तिला साल्मोनेला संसर्ग झाल्याचं सांगितलं.

महिलेने उपचारांवर ₹३६,३९३ खर्च केले. तिने आरोप केला की तिच्या मुलाने कॅफे मालकांना उपचारांचे पैसे देण्यास सांगितले, परंतु त्यांनी तिची थट्टा केली. या सगळ्या परिस्थितीची तिने ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. आयोगाचे अध्यक्ष जॉर्ज बेबी आणि सदस्य निषाद थंकप्पा यांनी कॅफेच्या मालकाला आणि व्यवस्थापकाला त्या महिलेला ९६,३९३ रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

कॅफेकडून नेमक काय आलं स्पष्टीकरण?

कॅफे मालकाने महिलेचे आरोप फेटाळून लावले. त्याने सांगितले की प्रत्येक ग्राहकाला उच्च दर्जाचे चिकन दिले गेले जाते. तसेच त्या महिलेलाही चांगलेच चिकन दिले होते. त्याने असेही सांगितले की त्या दिवशी १०० हून अधिक लोकांनी तेच अन्न खाल्ले होते, परंतु इतर कोणालाही आरोग्याच्या कोणत्याही समस्येची तक्रार नव्हती. जरी वैद्यकीय अहवाल नंतर या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरला असला तरी, ग्राहक आयोगाने महिलेच्या रुग्णालयातून डिस्चार्जच्या महत्त्वाचा पुरावा मानले, ज्यात तिला साल्मोनेला संसर्ग झाल्याचे नमूद केले होते.

३० दिवसांच्या आत नुकसान भरपाई

कोर्टाने आपला निर्णय देताना, कॅफेला ३० दिवसांच्या आत ₹९६,३९३,००० भरण्याचा आदेश दिले. जर कॅफेने निर्धारित वेळेत रक्कम भरली नाही, तर त्यांना या रकमेवर १० टक्के वार्षिक व्याज देखील द्यावा लागणार असल्याचं स्पष्ट केलं.

Anil Agarwal Success Story : 16 लाख उधार घेत सुरु केला व्यवसाय, आज 3600000000000 चे मालक! अनिल अग्रवाल यांनी कसा बदलला गेम?

Web Title: Food safety action woman falls sick after eating chicken at cafe fined heavily

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • Bad Quality Food
  • chicken
  • Court
  • Food Issue
  • FSSAI
  • infections

संबंधित बातम्या

Kolhapur Crime: भरदिवसा गोळ्या झाडल्या, १३ वर्षांनी लागला हिशेब; हेमंत गायकवाड हत्या प्रकरणात पिता-पुत्रांना जन्मठेप
1

Kolhapur Crime: भरदिवसा गोळ्या झाडल्या, १३ वर्षांनी लागला हिशेब; हेमंत गायकवाड हत्या प्रकरणात पिता-पुत्रांना जन्मठेप

New Mumbai : नवी मुंबई विमानतळावरील ‘या’ सुविधेत वाढ, प्रवाशांना होणार फायदा
2

New Mumbai : नवी मुंबई विमानतळावरील ‘या’ सुविधेत वाढ, प्रवाशांना होणार फायदा

जिरे पूड वापरणाऱ्यांनी सावध व्हा! FSSAIची मोठी कारवाई; ‘या’ बॅचमध्ये MRLपेक्षा जास्त कीटकनाशक अवशेष
3

जिरे पूड वापरणाऱ्यांनी सावध व्हा! FSSAIची मोठी कारवाई; ‘या’ बॅचमध्ये MRLपेक्षा जास्त कीटकनाशक अवशेष

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल 2020 प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; SIT चौकशीसह सर्व याचिका फेटाळल्या
4

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल 2020 प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; SIT चौकशीसह सर्व याचिका फेटाळल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.