Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Crime: भरदिवसा गोळ्या झाडल्या, १३ वर्षांनी लागला हिशेब; हेमंत गायकवाड हत्या प्रकरणात पिता-पुत्रांना जन्मठेप

भरदिवसा पोस्ट कार्यालय चौकात गोळ्यांचा आवाज घुमला आणि २९ वर्षीय हेमंत गायकवाड यांचा जीव गेला. एक गोळी डोक्यात घुसली, दुसरी हुकली आणि तिसरीने आणखी एक जण जखमी झाला; त्यानंतर आरोपी पसार झाले. तब्बल १३ वर्षांनी बॅलेस्टिक रिपोर्ट, तांत्रिक पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांवर शिक्कामोर्तब करत न्यायालयाने पिता-पुत्रांना जन्मठेप सुनावली

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 06, 2026 | 04:41 PM
Kolhapur Crime: भरदिवसा गोळ्या झाडल्या, १३ वर्षांनी लागला हिशेब; हेमंत गायकवाड हत्या प्रकरणात पिता-पुत्रांना जन्मठेप

Kolhapur Crime: भरदिवसा गोळ्या झाडल्या, १३ वर्षांनी लागला हिशेब; हेमंत गायकवाड हत्या प्रकरणात पिता-पुत्रांना जन्मठेप

Follow Us
Follow Us:
  • १३ वर्षांनी हेमंत गायकवाड हत्या प्रकरणाचा निकाल
  • पिता आणि दोन मुलांना जन्मठेप
  • बॅलेस्टिक रिपोर्ट व ११ साक्षीदारांचे जबाब ठरले निर्णायक
 

कोल्हापूर : रमणमळा पोस्ट कार्यालय चौकात भरदिवसा गोळीबार करून २०१३ मध्ये केलेल्या हेमंत बाबासो गायकवाड (वय २९) यांच्या हत्येप्रकरणी तब्बल १३ वर्षांनी न्यायालयाने निकाल दिला आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी राजेंद्र आनंदा सावंत (६३), अभिजित राजेंद्र सावंत (३२) आणि धैर्यशील राजेंद्र सावंत (३६) या पिता-पुत्रांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याप्रकरणातील अन्य आरोपी संतोष इंगवले यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

वादाचे पर्यवसान भरदिवसा गोळीबारात

रमणमळा परिसरात हेमंत गायकवाड आणि सावंत कुटुंबातील तरुणांमध्ये वर्चस्ववाद आणि पूर्वीच्या वादातून खटके उडत होते. २४ मे २०१३ रोजी रमणमळा येथील पोस्ट कार्यालय चौकात पुन्हा वाद झाला. त्यानंतर राजेंद्र सावंत, अभिजित आणि धैर्यशील यांनी हेमंत गायकवाड यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप होता. या वेळी राजेंद्र सावंत यांनी रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. हेमंत यांच्या डोक्यात गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर शशिकांत गायकवाड जखमी झाले. गोळीबारानंतर तिघेही मोटारीतून पसार झाले होते.

हेही वाचा: Accident News: कंटेनरच्या चाकात अडकली दुचाकी; ३ किमी फरफटत गेली, आईसह दोन चिमुकल्यांचा करुण अंत

तीन राऊंड फायर; एक गोळी ठरली जीवघेणी

या प्रकरणात पोलिसांनी चार पिस्तुल जप्त करून फॉरेन्सिक तपासासाठी पाठविली होती. त्यापैकी खासगी ९ एमएम पिस्तुलमधून गोळीबार झाल्याचे बॅलेस्टिक व फॉरेन्सिक तपासातून स्पष्ट झाले. एकूण तीन राऊंड झाडण्यात आले होते. त्यातील एक गोळी हेमंत यांच्या डोक्यात लागली, दुसऱ्या गोळीचा नेम चुकला, तर तिसरी गोळी शशिकांत यांना घासून गेल्याने ते जखमी झाले.

फरार आरोपीला लॉकडाऊन काळात अटक

गोळीबारानंतर पोलिसांनी अभिजित आणि धैर्यशील सावंत यांना अटक केली होती. मात्र, राजेंद्र सावंत हे फरार झाले होते. त्यांना लॉकडाऊनच्या काळात अटक करण्यात आली. त्यानंतर तिघांविरोधात जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. राजेंद्र सावंत यांनी वैद्यकीय कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयातून अंतरिम जामीनही मिळवला होता.

हेही वाचा: Accident News: अलंग शिपब्रेकिंग यार्डकडे कामावर जात असताना काळाचा घाला; सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू, एक गंभीर

११ साक्षीदार, तांत्रिक पुरावे ठरले महत्त्वाचे

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. पाटील यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाने विविध पुरावे सादर केले. सरकारी वकील सुजाता इंगळे यांचा युक्तिवाद, बॅलेस्टिक रिपोर्ट, तांत्रिक पुरावे तसेच ११ साक्षीदारांचे जबाब न्यायालयाने ग्राह्य धरले. या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने तिघांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी होता राजेंद्र सावंत

राजेंद्र सावंत हे १९८८ मध्ये उत्पादन शुल्क विभागात अनुकंपा तत्त्वावर कॉन्स्टेबल म्हणून सेवेत दाखल झाले होते. २००१ मध्ये त्यांना उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली. त्यानंतर त्यांनी शिरोली, रंकाळावेस आणि ओरोस (सिंधुदुर्ग) येथे सेवा बजावली. घटना घडली तेव्हा ते सिंधुदुर्ग येथे कार्यरत होते आणि कोल्हापूरचा अतिरिक्त पदभारही त्यांच्याकडे होता. १३ वर्षांपूर्वी भरदिवसा घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेत अखेर न्यायालयाचा निकाल लागला असून, हेमंत गायकवाड हत्याप्रकरणी पिता आणि दोन मुलांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे.

Web Title: Kolhapur ramanmala hemant gaikwad murder case life imprisonment sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • Court
  • Kolhapur Crime
  • murder case news

संबंधित बातम्या

Crime News: नशेत वाद अन् मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू; रक्ताचे कपडे बदलले अन् पोलिसांसमोर  म्हणाला …
1

Crime News: नशेत वाद अन् मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू; रक्ताचे कपडे बदलले अन् पोलिसांसमोर म्हणाला …

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल 2020 प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; SIT चौकशीसह सर्व याचिका फेटाळल्या
2

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल 2020 प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; SIT चौकशीसह सर्व याचिका फेटाळल्या

धक्कादायक प्रकार; भररस्त्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची गोळ्या झाडून हत्या; हत्येची जबाबदारी घेणारी पोस्ट व्हायरल
3

धक्कादायक प्रकार; भररस्त्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची गोळ्या झाडून हत्या; हत्येची जबाबदारी घेणारी पोस्ट व्हायरल

Crime News: पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव; तपासातच उलगडली ३ खुनांची थरारक कहाणी
4

Crime News: पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव; तपासातच उलगडली ३ खुनांची थरारक कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.