कर्ज घेण्याचा विचार करताय? थांबा... जुलै महिन्यात 'या' पाच बँकांनी वाढवले कर्जावरील व्याजदर!
आजकाल सर्वांचाच बँकेशी थेट संबंध येतो. विशेष म्हणजे अनेक कुटुंब गृहकर्ज, कार लोन किंवा मग अन्य बाबींसाठी बँकांकडून कर्ज घेत असतात. मात्र, आता चालू जुलै महिन्यात एखाद्या महत्वाच्या कारणास्तव आपले खाते असलेल्या बँकेकडून कर्ज घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशातील आघाडीच्या पाच बँकांनी जुलै महिन्यात कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. प्रामुख्याने बँकांच्या एमसीएलआर वाढल्यामुळे जवळपास सर्व प्रकारची कर्जे महाग झाली आहेत. त्यामुळे कर्जाचा ईएमआयही वाढतो. त्यामुळे कर्ज घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा…
१. एचडीएफसी बँक : देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने ओवरनाईट कालावधीसाठी कर्जाचा दर 8.95 टक्क्यांववरून 9.05 टक्क्यांपर्यंत 10 बीपीएसने कमी केला आहे. एका महिन्यासाठी तो 9 टक्क्यांवरून 9.10 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तीन महिन्यांच्या कालावधीसाठी बँकेने व्याज दर 9.15 टक्क्यांवरून 9.20 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. सहा महिन्यांचा कालावधीसाठी 9.30 टक्क्यांवरून 9.35 टक्के करण्यात आला आहे. तर एका वर्षासाठी 9.30 टक्क्यांवरून 9.40 टक्के झाला आहे. बदलानंतर दोन वर्षे आणि तीन वर्षांसाठी व्याज दर 9.40 टक्के करण्यात आला आहे.
२. येस बँक : येस बँकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार ओव्हरनाईट दर 9.10 टक्के आहे. एका महिन्यासाठी एमसीएलआरआधारित कर्ज दर 9.45 टक्के आहे. तीन महिन्यांचा दर 10.10 टक्के आहे. तर सहा महिन्यांचा दर 10.35 टक्के आहे. एक वर्षाचा दर 10.50 टक्के आहे.
३. कॅनरा बँक : कॅनरा बँकेचा ओव्हरनाईट दर 8.20 टक्के आहे. एका महिन्याचा दर 8.30 टक्के आहे. तीन महिन्यांचा दर 8.40 टक्के आहे. सहा महिन्यांचा दर 8.75 टक्के आहे. एक वर्षाचा दर 8.95 टक्के आहे. दोन वर्षांचा दर 9.25 टक्के आहे. तीन वर्षांचा दर 9.35 टक्के आहे.
४. बँक ऑफ बडोदा : बँक ऑफ बडोदाचा ओव्हरनाईट दर 8.15 टक्के आहे. एका महिन्याचा दर 8.35 टक्के आहे. तीन महिन्यांचा दर 8.45 टक्के आहे. सहा महिन्यांचा दर 8.70 टक्के आहे. एक वर्षाचा दर 8.90 टक्के आहे.
५. पंजाब नॅशनल बँक : पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार, ओव्हरनाईट दर 8.25 टक्के आहे. एका महिन्यासाठी एमसीएलआरआधारित कर्जाचा दर 8.30 टक्के आहे. तीन महिन्यांचा दर 8.50 टक्के आहे. एक वर्षाचा दर 8.85 टक्के आहे आणि तीन वर्षांच्या कालावधीसाठी दर 9.15 टक्के आहे.