Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पर्सनल लोन की गोल्ड लोन? आर्थिक संकटात कोणता पर्याय ठरेल ‘स्मार्ट’ निवड?

आजच्या घडीला कर्ज घेण्याचे दोन प्रमुख मार्ग म्हणजे वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन) आणि सोने तारण कर्ज (गोल्ड लोन). मात्र, यातील कोणता पर्याय निवडावा, हे ठरवताना त्यातील बारकावे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 07, 2026 | 03:59 PM
(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:
  • आपत्कालीन निधी नसेल, तर कर्ज घेणे हाच एकमेव मार्ग उरतो
  • ‘गोल्ड लोन’ हा एक वरदान ठरणारा पर्याय
  • गोल्ड लोनचा व्याजदर पर्सनल लोनच्या तुलनेत कमी 
Gold Loan vs Personal Loan : आयुष्य अनिश्चिततेने भरलेले असते. अनेकदा आपण आर्थिक नियोजनाचा गांभीर्याने विचार करत नाही आणि अचानक उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्या किंवा इतर तातडीच्या गरजांसाठी पैशांची कमतरता भासू लागते. अशा वेळी जर आपल्याकडे पुरेसा आपत्कालीन निधी किंवा बचत नसेल, तर कर्ज घेणे हाच एकमेव मार्ग उरतो. आजच्या घडीला कर्ज घेण्याचे दोन प्रमुख मार्ग म्हणजे वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन) आणि सोने तारण कर्ज (गोल्ड लोन). मात्र, यातील कोणता पर्याय निवडावा, हे ठरवताना त्यातील बारकावे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांचं स्वप्नातलं घर आता पूर्ण  होणार! ५% व्याजावर मिळणार ७५ लाखांचे कर्ज?

 ‘गोल्ड लोन’ हा एक वरदान ठरणारा पर्याय

जेव्हा एखादी व्यक्ती वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करते, तेव्हा बँक तिचे उत्पन्न, नोकरीचे स्वरूप आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘क्रेडिट स्कोअर’ तपासते. जर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब असेल, तर बँका एकतर कर्ज नाकारतात किंवा खूप जास्त व्याजदर आकारतात. अशा वेळी ‘गोल्ड लोन’ हा एक वरदान ठरणारा पर्याय ठरतो. सोन्याच्या कर्जात कर्ज देणारी संस्था तुमच्या सोन्याला तारण म्हणून गहाण ठेवते, त्यामुळे बँकेसाठी ही एक सुरक्षित प्रक्रिया असते. परिणामी, त्यांना तुमच्या सिबिल स्कोअरची चिंता नसते. जर तुमचा सिबिल स्कोअर कमी असेल, तरीही तुम्हाला सोन्याच्या बदल्यात सहज कर्ज मिळू शकते.

गोल्ड लोनचा व्याजदर पर्सनल लोनच्या तुलनेत कमी

याव्यतिरिक्त कर्जाच्या कालावधीचा विचार करणेही गरजेचे आहे. वैयक्तिक कर्ज हे सहसा दीर्घकालीन आर्थिक गरजांसाठी योग्य मानले जाते, तर सोन्याचे कर्ज हे अल्पकालीन गरजांसाठी उत्तम असते. तुम्हाला  ते ६ महिन्यांच्या कालावधीसाठी पैशांची गरज असेल, तर गोल्ड लोनचा व्याजदर पर्सनल लोनच्या तुलनेत कमी पडतो आणि आर्थिक भारही कमी होतो. प्रक्रियेच्या दृष्टीने विचार केल्यास, वैयक्तिक कर्ज मंजूर व्हायला अनेकदा काही दिवस लागतात, कारण त्यात कागदपत्रांची पडताळणी, क्रेडिट तपासणी आणि इतर तांत्रिक बाबींचा समावेश असतो. याउलट, गोल्ड लोनची प्रक्रिया अत्यंत जलद असते. तुम्ही बँकेत सोने घेऊन गेलात की, काही तासांतच तुमच्या खात्यात रक्कम जमा केली जाते.

थोडक्यात सांगायचे तर, तातडीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गोल्ड लोन हा एक जलद, सोपा आणि कमी किचकट पर्याय आहे. मात्र, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, सोन्याच्या कर्जात तुम्ही तुमचे दागिने गहाण ठेवलेले असतात. त्यामुळे, वेळेवर कर्जाची परतफेड न केल्यास तुमच्या मौल्यवान सोन्यावर गदा येऊ शकते. त्यामुळे आर्थिक निर्णय घेताना आपल्या परतफेडीच्या क्षमतेचा विचार करूनच पाऊल उचलणे नेहमीच हिताचे ठरते.

US Iran war Impact: केळी, द्राक्षे, डाळिंब, भाज्या… दुबईत 1000 कंटेनर अडकले, भारताचं कोट्यवधींचं नुकसान!

Web Title: Gold loan vs personal loan which is better emergency loan option low credit score gold loan benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 03:59 PM

Topics:  

  • Business News
  • Loan

संबंधित बातम्या

Gold-Silver Rate Today : सणासुदीत सोने झाले स्वस्त! पण चांदीचे भाव वाढले की कमी झाले? पाहा सोने-चांदीचे आजचे ताजे दर!
1

Gold-Silver Rate Today : सणासुदीत सोने झाले स्वस्त! पण चांदीचे भाव वाढले की कमी झाले? पाहा सोने-चांदीचे आजचे ताजे दर!

Bank of Baroda 400 Days FD: पैसे 400 दिवसांसाठी FDमध्ये ठेवले तर किती परतावा मिळेल? Bank of Baroda चे व्याज गणित पाहा
2

Bank of Baroda 400 Days FD: पैसे 400 दिवसांसाठी FDमध्ये ठेवले तर किती परतावा मिळेल? Bank of Baroda चे व्याज गणित पाहा

मार्केट हादरणार! NSE चा बहुप्रतिक्षित IPO ‘या’ दिवशी येणार; गुंतवणूकदारांची दिवाळी आधीच साजरी होणार?
3

मार्केट हादरणार! NSE चा बहुप्रतिक्षित IPO ‘या’ दिवशी येणार; गुंतवणूकदारांची दिवाळी आधीच साजरी होणार?

पशुपालनातून कमाईची मोठी संधी! ‘Mukhyamantri Gramin Pashudhan Udyojakta Yojana ’ नेमकी काय? अर्ज, कागदपत्रे आणि फायदे जाणून घ्या
4

पशुपालनातून कमाईची मोठी संधी! ‘Mukhyamantri Gramin Pashudhan Udyojakta Yojana ’ नेमकी काय? अर्ज, कागदपत्रे आणि फायदे जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.