TVS Raider 125
तरुण वर्गाचं पहिलं प्रेम काय तर ती म्हणजे बाईक. अशाच बाईक प्रेमींसाठी एक चांगला पर्याय म्हणजे TVS Raider 125 .या बाईकची लोकप्रियता तरुणांमध्ये खूप जास्त आहे. याचं वैशिष्ट्यं म्हणजे 124.8cc इंजिनमुळे स्मूथ आणि पॉवरफुल परफॉर्मन्स मिळतो. यामध्ये फुल डिजिटल स्पीडोमीटर, आकर्षक LED हेडलाईट आणि मॉडर्न डिझाईन आहे.मायलेज सुमारे 60 km/l पर्यंत मिळू शकते, त्यामुळे रोजच्या वापरासाठी ही बाईक उत्तम पर्याय आहे. कमी किमतीत प्रिमियर फील देणारी ही बाईक कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय साजेशी अशी आहे. या बाईकची किंमता कमीत कमी 97, हजारांपासून सुरु आहे.
Hero Xtreme 125R
याचपाठोपाठ येते ती, Hero Xtreme 125R. स्टायलिश आणि सेफ्टीचा उत्तम समीकरण या बाईकमध्य़े पाहायला मिळतं. Hero Xtreme 125R ही स्पोर्टी लुकसाठी ओळखली जाते. शार्प आणि मस्क्युलर डिझाईनमुळे ड्राईव्ह कराताना बाईकचा लुक कमाल वाटतो. 125cc इंजिन चांगला पिकअप देते. यामध्ये सिंगल चॅनल ABS असल्याने ब्रेकिंग सेफ्टी चांगली मिळते. याचं मायलेजही समाधानकारक आहे. जर तुम्हाला स्टाईल आणि सेफ्टी असं दोन्ही महत्वाचं वाटत असेल तर तर हा उत्तम पर्याय ठरतो. ही बाईक तुम्हाला लाखापर्यंत मिळू शकते.
Honda Hornet 2.0 – प्रिमियम लुक आणि जास्त पॉवर
जर तुम्हाला थोडी जास्त पॉवर आणि प्रिमियम फील हवी असेल तर Honda Hornet 2.0 योग्य पर्याय आहे. 184cc इंजिन दमदार परफॉर्मन्स देते. गोल्डन USD फ्रंट फोर्क आणि अॅग्रेसिव्ह डिझाईनमुळे ही बाईक खूप प्रिमियम दिसते.फुल डिजिटल मीटर आणि चांगल्या बिल्ड कॉलिटीमुळे किंमत थोडी जास्त असली तरी लुक आणि पॉवर दोन्हीमध्ये या बाईकला बाजारात मोठी नागणी आहे. याची किंमत साधारण दीड लाखाच्या आसपास आहे.
Bajaj Pulsar N160 रॉयल आणि अॅग्रेसिव्ह स्टाई
Pulsar N160 ही पल्सर सीरिजमधील टॉप क्लास बाईक आहे. 164.82cc इंजिन आणि ड्युअल चॅनल ABSमुळे सेफ्टी आणि पॉवर दोन्ही मिळतात.
मस्क्युलर डिझाईन आणि अॅग्रेसिव्ह लुकमुळे ही बाईकचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. मायलेजही चांगले असल्याने परफॉर्मन्स आणि स्टाईलचा उत्तम बॅलन्स मिळतो. त्य़ामुळे जर तुम्ही रॉयल आणि अॅग्रेसिव्ह स्टाईलच्या शोधात असाल तर Bajaj Pulsar N160 तुमच्य़ासाठी चांगला पर्याय आहे. बाजारात ही बाईक तुम्हाला दीड लाखाच्या आसपास मिळू शकते.






