Beed Crime News: 'धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तर खेळ खल्लास..'; सुरेश धस, जरांगेंना कुणी दिली धमकी
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्या समर्थकाने प्रक्षोभक वक्तव्य करत ही धमकी दिली आहे. यामध्ये आमदार सुरेश धस यांच्यावर टीका करतानाच मनोज जरांगे पाटील यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे मुंडे आणि जरांगे पाटील यांच्यातील सुप्त संघर्ष आता उघडपणे समोर येण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचे समर्थक गोविंद फड यांनी भाजप (BJP) आमदार सुरेश धस आणि मराठा आरक्षणाचे नेते मनोज तरंगे यांना फेसबुकवरून धमकी दिली आहे. ” धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला तर मनोज जरांगे आणि सुरेश धस यांचा खेळ खल्लास,” असं फड यांनी म्हटलं आहे. फड यांच्या या सोशल मीडियावरील धमकीमुळे बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे की नाही, असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान, आज सकाळी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोप वाल्मिक कराडच्या मुलाची सोशल मीडिया पोस्टदेखील चांगलीच व्हायरल होत आहे. एकीकडे वाल्मीक कराडच्या मुलाची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत असताना फड यांनी धमकीची पोस्ट केली आहे.
यामध्ये त्यांनी म्हटले आहे की धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला तर मनोज जरांगे आणि आमदार सुरेश धस यांचा खेळ खल्लास, भंडारा लावून बोलतोय.”अशा आशेची पोस्ट केली आहे. या फेसबुक पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गोविंद फड यांनी फेसबुकवर केल्याने बीडसह राज्यभरात राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. (Beed Crime)
गोविंद फड यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये थेट नावे घेत मनोज जरांगे पाटील आणि आमदार सुरेश धस यांना इशारा दिला आहे. या पोस्टमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेमुळे आणि थेट इशाऱ्यामुळे मराठा आरक्षण समर्थक आणि सुरेश धस यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या एका पोस्टमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आणि सामाजिक सलोखा बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.






