Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Govt Scheme: एकही रुपया जमा न करता सरकार देत आहे 25000 रुपये? कोणाला मिळणार फायदा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Govt Scheme: सोशल मीडिया आणि इंटरनेटवर सध्या एका योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की केंद्र किंवा राज्य सरकार एका रुपयाचीही गुंतवणूक न करता पात्र नागरिकांना २५,००० रुपयांची आर्थिक मदत देत आहे. पण या दाव्यात नक्की किती सत्यता आहे?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 01, 2026 | 03:45 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • 1 ही रुपया जमा न करता सरकार देत आहे 25000 रुपये?
  • कोणाला मिळणार फायदा?
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
Govt Scheme: शासन वेळोवेळी जनतेच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतं. आता ही सरकारने अशी योजना ( Govt Scheme ) राबवली आहे ज्यामध्ये तुम्हाला एकही रुपया भरण्याची गरज भासणार नाही आणि तुमच्या खात्यात 25000 रुपये येतील. पण या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार आहे? या योजनेसाठी कोण पात्र ठरतं? सगळं सविस्तर जाणून घेऊयात.

GST Collection Record: केंद्र सरकारची तिजोरी भरली! जीएसटी संकलनाने मोडले सर्व रेकॉर्ड्स; पाहा सरकारला किती झाला फायदा?

मुलींचे शिक्षण आणि उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करण्यासाठी सरकार विविध योजना राबवते. मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना ही त्यापैकीच एक योजना आहे. या योजनेअंतर्गत, मुलीच्या जन्मापासून ते तिच्या उच्च शिक्षणापर्यंत विविध टप्प्यांवर ₹25,000 ची आर्थिक मदत दिली जाते. पूर्वी ही रक्कम ₹15,000 होती, पण आर्थिक वर्ष 2024-25 पासून ती वाढवून ₹25,000 करण्यात आली आहे.

जर तुम्हाला मुलगी असेल तर तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यापूर्वी या योजनेसाठी पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया समजून घेणे महत्त्वाचे आहे. वेळेवर अर्ज केल्यावर, सरकारची आर्थिक मदत थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते.

मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना काय आहे?

मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना ही योजना ऑक्टोबर २०१९ मध्ये सुरू केली. मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे, त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यास मदत करणे आणि बालविवाहासारख्या सामाजिक समस्या कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत रक्कम एकाच वेळी दिली जात नाही, तर मुलीचे वय आणि शिक्षणाचे विविध टप्पे यानुसार सहा हप्त्यांमध्ये बँक खात्यात हस्तांतरित केली जाते.

कधी मिळते आर्थिक मदत?

या योजनेअंतर्गत, एकूण ₹25,000 सहा टप्प्यांमध्ये वितरित केले जातात.
मुलगी झाल्यावर ₹5,000
एक वर्षाचे सर्व आवश्यक लसीकरण झाल्यावर ₹2,000
इयत्ता पहिलीत प्रवेश घेतल्यावर ₹3,000
इयत्ता सहावीत प्रवेश घेतल्यावर ₹3,000
इयत्ता नववीत प्रवेश घेतल्यावर ₹5,000
इयत्ता बारावी उत्तीर्ण झाल्यावर किमान दोन वर्षांच्या कॉलेज, पदवी किंवा डिप्लोमा अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यावर ₹7,000
अशा पद्धतीमध्ये रकमेचं वितरण केलं जातं.

कोण घेऊ शकतं योजनेचा लाभ?

योजना फक्त उत्तर प्रदेशचे कायमचे रहिवासी असलेल्या कुटुंबांसाठीच उपलब्ध आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹३ लाख किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. साधारणपणे, प्रत्येक कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो. ही रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. दुसऱ्या प्रसूतीत जुळी मुले झाल्यास, तिन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो. याशिवाय, जर एखाद्या कुटुंबाने कायदेशीररित्या अनाथ मुलीला दत्तक घेतले असेल, तर दत्तक मुलगी आणि अनाथ मुलगी मिळून जास्तीत जास्त दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो.

कोणती कागदपत्रे आवश्यक?

अर्ज करताना कुटुंबाचे रेशन कार्ड, कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला, मुलगी आणि पालकांचे आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स आणि मुलीचा पासपोर्ट आकाराचा फोटो यांचा समावेश आहे. जर मुलगी दत्तक असेल, तर त्यासंबंधीचे कायदेशीर प्रमाणपत्र देखील सादर करावे लागेल. संबंधित टप्प्यानुसार, अर्ज करताना इतर कागदपत्रांची देखील मागणी केली जाऊ शकते.

ऑनलाइन अर्ज कसा करावा?

मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेसाठीचा अर्ज पूर्णपणे ऑनलाइन आहे. महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकृत पोर्टलला भेट देऊन नागरिक सेवा पोर्टलद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करताना, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती प्रविष्ट करावी लागेल. ओटीपी पडताळणीनंतर एक युझर आयडी तयार केला जातो. यानंतर, लॉग इन करून मुलीची नोंदणी करता येते आणि संबंधित टप्प्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करता येतात. अर्ज मंजूर झाल्यावर, पात्रतेनुसार सहाय्याची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात हप्त्यांमध्ये हस्तांतरित केली जाते.

Rate 1 August: LPG सिलेंडर झाला स्वस्त! 1 ऑगस्टला पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्येही दिलासा? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Web Title: Govt scheme offering 25000 rupees without investment check details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • british government
  • Business News
  • Marathi News
  • online

संबंधित बातम्या

IT Sector Layoffs : 5 मिनिटांची गुगल मीट आणि 80 भारतीयांची नोकरी गेली; अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई!
1

IT Sector Layoffs : 5 मिनिटांची गुगल मीट आणि 80 भारतीयांची नोकरी गेली; अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई!

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
2

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
3

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
4

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.