(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेतला जातो. यावेळी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि इतर व्यावसायिक घटकांचा विचार करून, १९ किलोच्या सिलेंडरची किंमत २०० रुपयांपेक्षा जास्त कमी करण्यात आली आहे. मात्र, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत मात्र कायम आहे.
व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत घट झाली आहे. पण अद्याप १ ऑगस्ट रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत कोणताही बदल झालेला नाही. देशभरातील सरकारी तेल कंपन्यांनी जुनेच दर कायम ठेवले आहेत. याचा अर्थ, वाहनचालकांना सध्या तरी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही दिलासा मिळालेला नाही.
नोएडा – ₹१०१.८९ प्रति लिटर
नवी दिल्ली – ₹१०२.१२ प्रति लिटर
मुंबई – ₹१११.२१ प्रति लिटर
कोलकाता – ₹११३.५१ प्रति लिटर
चेन्नई – ₹१०७.८७ प्रति लिटर
पुणे – ₹११२.०१ प्रति लिटर
आग्रा – ₹१०१.५४ प्रति लिटर
गाझियाबाद – ₹१०२.१२ प्रति लिटर
गुरुग्राम – ₹१०२.९७ प्रति लिटर
नोएडा – ₹९५.३७ प्रति लिटर
नवी दिल्ली – ₹९५.२० प्रति लिटर
मुंबई – ₹९७.८३ प्रति लिटर
कोलकाता – ₹९९.८२ प्रति लिटर
चेन्नई – ₹९९.६५ प्रति लिटर
पाटणा – ₹१००.६१ प्रति लिटर
गुरुग्राम – ₹९५.६४ प्रति लिटर
बंगळूर – ₹९९.५६ प्रति लिटर
चंदीगड – ₹८९.४७ प्रति लिटर
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार होत आहे, परंतु भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात कोणतीही नवीन कपात झालेली नाही. त्यामुळे, वाहन मालकांना सध्या तरी पेट्रोल आणि डिझेल जुन्याच दराने खरेदी करावे लागेल. जर तेल कंपन्यांनी दरात आणखी बदल केले, तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये फरक दिसून येईल.






