Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 मध्ये आता सौर ऊर्जेचा प्रकाश! ‘GREW Solar’ आता मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सचा अधिकृत पार्टनर

ग्रू सोलरने आगामी टी-२० क्रिकेट हंगामासाठी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्ससोबत भागीदारी जाहीर केली आहे. स्वच्छ ऊर्जेचा संदेश देण्यासाठी हा मोठा धोरणात्मक निर्णय आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 20, 2026 | 04:39 PM
IPL 2026 मध्ये आता सौर ऊर्जेचा प्रकाश! (Photo Credit- X)

IPL 2026 मध्ये आता सौर ऊर्जेचा प्रकाश! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • IPL 2026 मध्ये आता सौर ऊर्जेचा प्रकाश!
  • ‘GREW Solar’ आता मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सचा अधिकृत पार्टनर
अहमदाबाद / दिल्ली / मुंबई, 20 मार्च 2026: अहमदाबाद-आधारित चिरिपाल समूहाच्या पाठबळावर भारतातील सर्वात तरुण आणि वेगाने वाढणाऱ्या सौर उत्पादकांपैकी एक ग्रू सोलरने आगामी पुरुष टी२० क्रिकेट हंगामासाठी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्ससह अधिकृत सौर ऊर्जा भागीदार म्हणून आपली भागीदारी जाहीर केली. ही बहु-टीम भागीदारी ग्रू सोलरच्या महिला टी२०सहच्या यशस्वी सहकार्याचा पुढचा टप्पा आहे आणि क्रिकेटच्या जागतिक लोकप्रियतेच्या माध्यमातून स्वच्छ ऊर्जा स्वीकारण्याच्या कंपनीच्या धोरणात मोठ्या प्रमाणावर विस्तार दर्शवते.

गुजरात टायटन्सच्या हेल्मेट आणि टोपीवर, मैदानावरील एलईडी बोर्डांवर, बिग स्क्रीनवर तसेच दूरदर्शन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसारणादरम्यान ग्रू सोलरचा लोगो प्रमुखपणे दिसणार आहे. मुंबई इंडियन्सच्या माध्यमातून ब्रँड संपूर्ण भारतभर तसेच जागतिक स्तरावर क्रिकेटच्या सर्वात ओळखीच्या चाहते वर्गाशी संपर्क साधेल.या भागीदारीत डिजिटल कथा सांगणे, प्रभावशाली व्यक्तींसह सहयोग, प्रादेशिक उपक्रम आणि चाहते सहभाग यांचा समावेश असेल. तसेच ऑनलाइन स्पर्धा, सामने तिकीट, वस्त्रसामग्री आणि इतर आकर्षणे याद्वारे चाहत्यांपर्यंत संदेश पोहोचवला जाईल.

ग्रू सोलरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक विनय थडाणी म्हणाले, “गुजरात ही भारताची सौर राजधानी आहे, आणि गुजरात टायटन्ससह भागीदारी ही सहज सुसंगतीसारखी आहे; एक राज्य जे सौर क्षेत्रात आघाडीवर आहे आणि एक संघही आणि हा संघही त्याच नवोन्मेषी भावनेचे प्रतीक आहे.. मुंबई इंडियन्सची जोड ही राष्ट्रीय पातळीवरची भूमिका साकारते आणि आम्हाला भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी व प्रगत विचार करणाऱ्या प्रेक्षकांशी जोडते. क्रिकेट प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचतो, आणि आता सौर ऊर्जा देखील तशीच पोहोचायला हवी. हा एक धोरणात्मक निर्णय आहे, जो ग्रू सोलरचा स्वच्छ आणि परवडणारी ऊर्जा यांचा संदेश जगाच्या सर्वात मोठ्या मंचावर पोहोचवतो. आम्ही पुढच्या पिढीस ऊर्जा पुरवत आहोत.”

बॉक्स ऑफिसच नाही शेअर बाजारावरही धुरंदर – 2 ची जादू! PVR Inox झाले मालामाल

गुजरात टायटन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी कर्नल अरविंदर सिंह यांनी ग्रू सोलर सोबतच्या नव्या भागीदारीबाबत आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, नवकल्पना आणि जलद प्रगतीचा समान ध्यास असलेल्या ग्रू सोलर या ब्रँडसोबत हातमिळवणी करताना त्यांना आनंद होत आहे. २०२२ पासून गुजरात टायटन्स आणि ग्रू सोलर या दोन्ही संस्थांनी दमदार कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ही भागीदारी नेतृत्व आणि प्रेरणा देण्याच्या समान ध्येयाचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, चाहत्यांशी जोडणारी आणि शाश्वत प्रगतीच्या महत्त्वावर भर देणारी ही अर्थपूर्ण सहकार्याची नाळ अधिक दृढ करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मुंबई इंडियन्सच्या प्रवक्त्याने सांगितले, “स्वच्छ ऊर्जा अधिक सुलभ बनवण्याचा जी ग्रू सोलरचा दृष्टिकोन प्रगती आणि उत्कृष्टतेवरील आमच्या विश्वासाशी जुळतो. आम्ही या भागीदारीच्या विकासासाठी उत्साहित आहोत. हंगाम जसजसा पुढे सरकेल, तसतसे ग्रू सोलरची दुहेरी भागीदारी स्वच्छ आणि सुलभ ऊर्जा संदेश लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक सामर्थ्यशाली व्यासपीठ तयार करेल आणि भारताच्या शाश्वत भविष्यातील संक्रमणास वेग देईल.

अर्थव्यवस्थेवर दुहेरी संकट! इतिहासात पहिल्यांदाच एका डॉलरचे मूल्य 93 पार, भारतीय चलनाला मोठा फटका

Web Title: Grew solar is now the official partner of mumbai indians and gujarat titans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 04:39 PM

Topics:  

  • Gujarat Giants
  • IPL 2026
  • mumbai indians

संबंधित बातम्या

GT Vs SRH: हा तर फुसका बार! Rabada चा कहर अन् सनरायझर्स गारद; पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ
1

GT Vs SRH: हा तर फुसका बार! Rabada चा कहर अन् सनरायझर्स गारद; पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ

GT Vs SRH Live: वॉशिंग्टनची गुजरातसाठी ‘सुंदर’ खेळी; सनरायझर्सला ‘तब्बल’ इतक्या रन्सचे टार्गेट
2

GT Vs SRH Live: वॉशिंग्टनची गुजरातसाठी ‘सुंदर’ खेळी; सनरायझर्सला ‘तब्बल’ इतक्या रन्सचे टार्गेट

खेळ आकड्यांचा! गुजरातसह ‘हे’ संघ IPL 2026 Playoff मध्ये जाणार? मात्र दिल्लीचा संघ…
3

खेळ आकड्यांचा! गुजरातसह ‘हे’ संघ IPL 2026 Playoff मध्ये जाणार? मात्र दिल्लीचा संघ…

GT Vs SRH Live: अहमदाबादच्या स्टेडियमवर वादळ येणार; पॅट कमिन्सने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय
4

GT Vs SRH Live: अहमदाबादच्या स्टेडियमवर वादळ येणार; पॅट कमिन्सने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.