Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GST E-Way Bill Rules : व्यापाऱ्यांना मोठा दिलासा! 1 ऑगस्टपासून लागू होणारे ई-वे बिलचे नवीन नियम तूर्तास टळले

GST E-Way Bill Rules : देशातील व्यापारी, वाहतूकदार आणि उद्योजकांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. १ ऑगस्टपासून लागू होणारे ई-वे बिलचे नवीन नियम सरकारने तूर्तास पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 01, 2026 | 04:18 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • व्यापाऱ्यांना दिलासा!
  • ई-वे बिल तूर्तास टळले
  • सरकारचा मोठा निर्णय
GST E-Way Bill Rules : वस्तू आणि सेवा कर नेटवर्कने (जीएसटीएन) ई-वे बिल ( GST E-Way Bill Rules ) प्रणालीतील दोन प्रस्तावित बदलांची अंमलबजावणी तात्पुरती थांबवली आहे. उद्योगाकडून आलेल्या सूचना आणि आक्षेपांनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. हे बदल १ ऑगस्ट २०२६ पासून लागू होणार होते. पहिला बदल म्हणजे ‘बिल-टू-शिप-टू’ व्यवहारात माल स्वीकारणाऱ्याचा (कन्साईनीचा) शिप-टू जीएसटीआयएन क्रमांक नमूद करणे अनिवार्य करणे, म्हणजेच ज्या नावाने माल पाठवला जाईल ते नाव. याचा उद्देश मालाच्या खऱ्या प्राप्तकर्त्याला अधिक चांगल्या प्रकारे ओळखणे आणि मालाच्या हालचालींचा मागोवा घेणारी प्रणाली अधिक मजबूत करणे हा आहे.

GST Collection Record: केंद्र सरकारची तिजोरी भरली! जीएसटी संकलनाने मोडले सर्व रेकॉर्ड्स; पाहा सरकारला किती झाला फायदा?

दुसरा बदल म्हणजे व्हॉलंटरी क्लोजर सुविधा सुरू करणे, ज्यामुळे करदात्यांना, जेव्हा मालाची वाहतूक करणे शक्य होणार नाही, तेव्हा सक्रिय ई-वे बिले बंद करण्याची परवानगी मिळेल. या बदलांमध्ये ईआरपी (एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग) साठी अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस आणि ई-इनव्हॉइस इंटिग्रेशनमध्ये सुधारणांचा समावेश करण्याचाही प्रस्ताव होता. जीएसटीएनने म्हटले आहे की, ९ जून आणि १७ जून रोजी जारी करण्यात आलेली त्यांची सल्लामसलत पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

तूर्त व्यवसायांत व्यत्यय नाही

अग्रवाल यांनी कंपन्यांना सल्ला दिला की, आतापर्यंत केलेले चाचणीचे काम जपून ठेवावे, कारण मालाच्या वाहतुकीवर देखरेख सुधारण्याचे उद्दिष्ट सुधारित स्वरूपात सुरू ठेवता येऊ शकते. एएमआरजी ग्लोबलचे व्यवस्थापकीय भागीदार रजत मोहन म्हणाले की, जरी जीएसटीपनने स्थगितीचे कारण स्पष्ट केले नसले तरी, विविध भागधारकांना तयारीसाठी अधिक वेळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असावा, असे मानले जाते. त्यांनी पुढे सांगितले की, सध्या हे बदल थांबवल्याने व्यवसायांमध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही आणि सुधारित अंमलबजावणी योजना जाहीर होईपर्यंत सध्याची ई-वे बिल प्रणाली सुरू राहील.

ई-वे बिल सोबत बाळगणे अनिवार्य

वस्तू आणि सेवा कर (GST) प्रणालीअंतर्गत, ५० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तूची वाहतूक करणाऱ्या प्रत्येकासाठी ई-वे बिल सोबत बाळगणे अनिवार्य आहे. वस्तूंची वाहतूक सुरू करण्यापूर्वी, जीएसटी-नोंदणीकृत व्यक्ती किंवा वाहतूकदाराने जीएसटी पोर्टलवर हा दस्तऐवज तयार करणे आवश्यक आहे. १ जुलै २०१७ रोजी जीएसटी लागू झाल्याने, राज्यांच्या सीमांवरील तपासणी नाके रद्द करण्यात आले. त्यानंतर ई-वे बिल प्रणाली एक डिजिटल पर्याय म्हणून उदयास आली. यामुळे वस्तूचा ऑनलाइन मागोवा घेणे शक्य झाले आणि राज्यांच्या सीमांवर पुन्हा भौतिक अडथळे न उभारता कर प्रशासनाची उद्दिष्टे साध्य करण्यास मदत झाली.

आजपासून होणार होते लागू

या सल्लामसलतीमध्ये १ ऑगस्ट २०२६ पासून हे बदल लागू करण्याचा प्रस्ताव होता. ईवाय इंडियाचे टॅक्स पार्टनर सौरभअग्रवाल म्हणाले की, चाचणीदरम्यान अनेक कंपन्यांना असे आढळून आले की, प्रस्तावित ‘शिप-टू जीएसटीआयएन’ची अट आणि ई-वे बिलांसाठीची ऐच्छिकरित्या बंद करण्याची सुविधा, सध्याच्या ई-इनव्हॉइसिंग आणि आयआरएन-आधारित ई-वे बिल प्रणालीसोबत लागू करणे कठीण होते, विशेषतः ऑटो पार्ट्स, ईपीसी आणि ई-कॉमर्स सारख्या गुंतागुंतीच्या पुरवठा साखळ्या असलेल्या क्षेत्रांमध्ये. ते म्हणाले, ‘केवळ मुदतवाढ देण्याऐवजी जीएसटीएनने सल्लामसलत आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न मागे घेणे, हे दर्शवते की सरकार उद्योगाकडून मिळालेला अभिप्राय आणि व्यावहारिक आव्हाने लक्षात घेऊन या बदलांच्या स्वरूपावर पुनर्विचार करत आहे.’

Rate 1 August: LPG सिलेंडर झाला स्वस्त! 1 ऑगस्टला पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्येही दिलासा? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Web Title: Gst e way bill rules august 1 postponed big relief traders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 04:18 PM

Topics:  

  • Business News
  • Commerce
  • GST
  • GST Council
  • GST Rates
  • Marathi News
  • new rules

संबंधित बातम्या

Promptची गरज नाही! अवघ्या 1 मिनिटात बनवा 80s रेट्रो लूकमधला बाप्पांसोबतचा फोटो; फक्त 4 स्टेप्स फॉलो करा
1

Promptची गरज नाही! अवघ्या 1 मिनिटात बनवा 80s रेट्रो लूकमधला बाप्पांसोबतचा फोटो; फक्त 4 स्टेप्स फॉलो करा

Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा ‘हा’ श्लोक; जाणून घ्या धार्मिक महत्त्व
2

Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा ‘हा’ श्लोक; जाणून घ्या धार्मिक महत्त्व

मार्केट हादरणार! NSE चा बहुप्रतिक्षित IPO ‘या’ दिवशी येणार; गुंतवणूकदारांची दिवाळी आधीच साजरी होणार?
3

मार्केट हादरणार! NSE चा बहुप्रतिक्षित IPO ‘या’ दिवशी येणार; गुंतवणूकदारांची दिवाळी आधीच साजरी होणार?

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा
4

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.