Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

HDFC Bank चेअरमनच्या राजीनाम्याने शेअर बाजारात भूकंप, 4.66% शेअरमध्ये घसरण; कोण आहे अतनु चक्रवर्ती?

अध्यक्ष अतुन चक्रवर्ती यांच्या राजीनाम्यामुळे एचडीएफसी बँक चर्चेत आहे. बँकेने केकी मिस्त्री यांची अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. चक्रवर्ती यांच्या राजीनाम्यामुळे आज एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Mar 19, 2026 | 10:17 AM
HDFC बँकेच्या शेअर्समध्ये घसरण, कारण घ्या जाणून (फोटो सौजन्य - iStock)

HDFC बँकेच्या शेअर्समध्ये घसरण, कारण घ्या जाणून (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष अतनु चक्रवर्ती यांचा राजीनामा
  • कोण आहेत अतनु चक्रवर्ती 
  • एचडीएफसी बँक शेअर्समध्ये घसरण 
देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष अतनु चक्रवर्ती यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा १८ मार्चपासून तात्काळ प्रभावाने लागू झाला आहे. केकी मिस्त्री यांची १९ मार्चपासून पुढील तीन महिन्यांसाठी अंतरिम अर्धवेळ अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चक्रवर्ती यांच्या राजीनाम्याच्या बातमीमुळे आज बाजार उघडताच एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली, ते ४.६६% घसरून ₹८०३.८० वर आले. बँकेचे अमेरिकन शेअर्स (एडीआर) देखील बुधवारी जवळपास ७% नी घसरले.

अतनु चक्रवर्ती यांनी आपल्या राजीनाम्याचे कारण म्हणून “नैतिक मूल्ये” नमूद केली आहेत. त्यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांत त्यांनी बँकेमध्ये अशी काही वर्तणूक आणि कार्यपद्धती पाहिली, जी त्यांच्या वैयक्तिक आणि नैतिक मूल्यांशी विसंगत होती. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) एचडीएफसी बँकेची विनंती स्वीकारली असून केकी मिस्त्री यांची अंतरिम अर्धवेळ अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.

Swiggy-HDFC Partnership: Swiggy आणि HDFC बँकेची भागीदारी! रोजच्या खर्चावर मिळणार भरघोस रिवॉर्ड्स; ‘या’ कार्डसबद्दल जाणूया सविस्तर

काय सांगतात तज्ज्ञ

ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने एचडीएफसी बँकेच्या शेअर्सना ‘न्यूट्रल’ रेटिंग दिले असून ₹१,०९० चे लक्ष्य ठेवले आहे. ब्रोकरेजच्या मते, एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षांचा राजीनामा अशा वेळी आला आहे, जेव्हा बँक आधीच स्थूल-आर्थिक अनिश्चिततेचा सामना करत आहे. या राजीनाम्यामुळे नजीकच्या काळात स्टॉकवर दबाव येऊ शकतो. ब्रोकरेजच्या मते, चक्रवर्ती यांनी नमूद केलेल्या ‘मूल्ये आणि नैतिकतेमधील विसंगती’मुळे संचालक मंडळ आणि व्यवस्थापन यांच्यातील ताळमेळाबद्दल चिंता वाढली आहे. त्यांनी कोणत्याही गैरप्रकाराचा आरोप केला नसला तरी, परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत नकारात्मक भावना स्टॉकवर दबाव आणू शकते.

जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष शाह म्हणतात की, एचडीएफसी बँकेचे शेअर्स पुढील काही दिवसांत थोडे घसरू शकतात, परंतु ते दीर्घ मुदतीसाठी आकर्षक आहेत. बँक आधीच आपल्या उच्चांकी पातळीवरून लक्षणीयरीत्या खाली आली आहे, त्यामुळे या पातळीवर विक्री करणे निरर्थक आहे. बँकेचे मूलभूत घटक मजबूत आहेत. गुंतवणूकदार दीर्घकालीन दृष्टिकोनातून हा स्टॉक ठेवू शकतात.

एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष म्हणून अतनु चक्रवर्ती यांचा प्रवास

अतनु चक्रवर्ती यांनी एप्रिल २०२१ मध्ये एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या कार्यकाळात, बँकेने एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेच्या ४० अब्ज रुपयांच्या विलीनीकरणासह अनेक मोठे निर्णय घेतले. तथापि, गेल्या दोन वर्षांतील त्यांच्या कृतींबद्दल आता त्यांना नैतिक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे.

अतनु चक्रवर्ती यांच्याबद्दल तपशील

  • अतनु चक्रवर्ती हे गुजरात केडरचे १९८५ बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांनी अनेक वरिष्ठ पदांवर काम केले आहे
  • त्यांनी गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग आणि आर्थिक व्यवहार विभागातही काम केले आहे
  • त्यांनी आर्थिक धोरणकर्ते म्हणून अनेक मंत्रालये आणि विभागांमध्ये काम केले आहे
  • त्यांनी २००२ ते २००७ पर्यंत अर्थ मंत्रालयात काम केले, जिथे त्यांनी प्रथम संचालक आणि नंतर सहसचिव म्हणून जबाबदारी सांभाळली
  • अतनु चक्रवर्ती यांनी गुजरात सरकारच्या वित्त विभागाचे सचिव म्हणूनही काम केले आहे
एचडीएफसी बँकेचे नवीन अध्यक्ष कोण होणार?

एचडीएफसी बँकेने अतानु चक्रवर्ती यांचा राजीनामा स्वीकारल्याची घोषणा केली आहे. इतकेच नव्हे तर, बँकेचे माजी उपाध्यक्ष असलेल्या केकी मिस्री यांची बँकेचे अंतरिम अर्धवेळ अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाळ आज, १९ मार्चपासून सुरू होईल आणि तो पुढील तीन महिने चालेल.

Stock Market Today: 3 दिवसांच्या तेजीनंतर आज शेअर बाजारात मोठी घसरण! NIFTY 420 ने खाली, सेन्सेक्स 75,300 जवळ

Web Title: Hdfc bank chairman atanu chakraborty resigned on ethical grounds share dropped by 4 66 percent latest updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • Business News
  • HDFC Bank
  • HDFC Bank Share

संबंधित बातम्या

Bank of India चा नफा 10500 कोटींच्या पार! आर्थिक कामगिरीत वार्षिक 14.19 टक्क्यांची दमदार वाढ
1

Bank of India चा नफा 10500 कोटींच्या पार! आर्थिक कामगिरीत वार्षिक 14.19 टक्क्यांची दमदार वाढ

मोतीलाल ओसवाल AMC आता NPS क्षेत्रात! पेन्शन फंडाचा ‘स्पॉन्सर’ म्हणून काम करण्यासाठी PFRDA ची परवानगी
2

मोतीलाल ओसवाल AMC आता NPS क्षेत्रात! पेन्शन फंडाचा ‘स्पॉन्सर’ म्हणून काम करण्यासाठी PFRDA ची परवानगी

Boss असावा तर असा… Factory जळली तरीही दिला पगार, नंतर असं काही केलं की कर्मचारी झाले करोडपती
3

Boss असावा तर असा… Factory जळली तरीही दिला पगार, नंतर असं काही केलं की कर्मचारी झाले करोडपती

8th Pay Commission: महागाई भत्त्याबाबत 8 व्या वेतन आयोगाने विचारले प्रश्न… केंद्रीय कर्मचाऱ्यांकडे 31 मे पर्यंतचा वेळ
4

8th Pay Commission: महागाई भत्त्याबाबत 8 व्या वेतन आयोगाने विचारले प्रश्न… केंद्रीय कर्मचाऱ्यांकडे 31 मे पर्यंतचा वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.