Swiggy-HDFC Partnership: Swiggy आणि HDFC बँकेची भागीदारी! रोजच्या खर्चावर मिळणार भरघोस रिवॉर्ड्स; 'या' कार्डसबद्दल जाणूया सविस्तर
Swiggy-HDFC Card Launch: स्विगी, जी भारतातील एक अग्रेसर डिलीव्हरी सेवा आहे, आणि HDFC बँक, जी भारतातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक आहे, यांनी आज त्यांच्या एकत्रित क्रेडिट कार्ड पोर्टफोलिओच्या विस्ताराची घोषणा केली आहे, ज्यात स्विगी BLCK एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड आणि स्वॅगी Ornge HDFC बँक क्रेडिट कार्ड असे २ प्रकार आहेत. कार्ड धारकांना स्विगी आणि त्यांच्या प्रमुख भागीदार प्लॅटफॉर्मवर श्रेणीतील सर्वोत्तम कॅशबॅक मिळेल, तसेच क्लिअरट्रिप आणि नायका वर खास त्वरित सवलतींचा आनंद घेता येईल. या विस्तारलेल्या पोर्टफोलिओमुळे वार्षिक ४८ हजारांपर्यंत बचत होऊ शकते, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या रोजच्या खर्चात अधिक फायदे मिळतील.
ग्राहकांच्या रोजच्या वारंवार होणाऱ्या खर्चावर हे कार्ड उत्तम आणि जास्तीत जास्त रीवार्ड्स मिळवून देणारे कार्ड होईल. स्विगी HDFC बँक क्रेडिट कार्डचे सध्याचे वापरकर्ते स्विगी आणि क्लिअरट्रिप, नायका, पेटीएम ट्रॅव्हल, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि मिंत्रा यांसारख्या ३० हून अधिक जास्त आघाडीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर भरघोस कॅशबॅकचे फायदे घेत राहतील. २०२३ मधील पहिल्या यशस्वी प्रस्तुतीचा पाया पुढे नेत, आता नवीन आणि जुन्या अशा दोन्ही कार्ड धारकांना अधिक प्रगत जीवनशैली फायद्यांचा लाभ घेता येईल.
यामध्ये आघाडीच्या भागीदार प्लॅटफॉर्मवर तात्काळ सवलत आणि अतिरिक्त कॅशबॅकचा समावेश आहे. जसे की, क्लिअरट्रिप या प्लॅटफॉर्मवर हॉटेल बुकिंगसाठी फ्लॅट १९ % सूट + ५ % कॅशबॅक, विमान तिकिटांसाठी सरळ ६ % सूट + ५ % कॅशबॅक, आणि सर्व नायका ॲप्सवर सरळ ५ % सूट + ५ % कॅशबॅक असं मिळेल. तसेच, स्विगी BLCK HDFC बँक क्रेडिट कार्ड हे स्विगी वर १० % कॅशबॅक, मनोरंजन, प्रवास आणि e-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ५ % पर्यंत कॅशबॅक, इतर व्यवहारांवर १ % कॅशबॅक आणि ३ महिन्यांची मोफत स्विगी वन BLCK मेंबरशिप मिळते.
तर स्विगी Ornge HDFC बँक क्रेडिट कार्ड हे प्रवासापासून ते स्थानिक कॅबपर्यंतच्या विविध आवश्यक ऑनलाइन कॅटेगरीवर ५ % कॅशबॅक देते. तसेच इतर व्यवहारांवर १ % कॅशबॅक आणि १२ महिन्यांची स्विगी वन मेंबरशिप मिळते. जर ग्राहकांना स्विगी BLCK आणि Ornge क्रेडिट कार्डे हवी असतील तर HDFC बँक क्रेडिट कार्डे टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देतील. इच्छुक ग्राहक स्विगी ॲपवरून किंवा HDFC बँकेच्या डिजीटल चॅनेलवरून सहजपणे अर्ज करू शकतात. ग्राहकाच्या पात्रतेनुसार योग्य ते कार्ड दिले जाईल.
स्विगीचे मुख्य विकास अधिकारी आणि सह-संस्थापक, फनी किशन अडेपल्ली म्हणाले, “स्विगी HDFC बँक क्रेडिट कार्ड २ वर्षांपूर्वी प्रस्तुत करण्यात आले होते, जेणेकरून रोजचा खर्च अधिक फायदेशीर आणि सोयीस्कर व्हावा. ग्राहक आता जीवनशैलीच्या विविध श्रेणींमध्ये अधिक खर्च करत असल्याने, त्यांना अशा पेमेंट पर्यायांची गरज आहे. व्यवहार अधिक सुलभ आणि सहज बनवण्यासाठी हे कार्ड योग्य आहेत. तसेच, वापरकर्त्यांना स्विगी इकोसिस्टम, शॉपिंग, प्रवास आणि त्यापलीकडेही मोठे रिवार्ड्स मिळवण्यास मदत करेल.”
तसेच, HDFC बँकेचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स प्रॉडक्ट अँड पोर्टफोलियोचे हेड, विद्या प्रदीप म्हणाल्या, “स्विगी सोबतची ही विस्तारित भागीदारी आमचा वेगळ्या आणि श्रेणी-आधारित प्रस्तावांवर भर असतो हे दर्शवते. दोन वेगळे प्रकार सादर करून, आम्ही ग्राहकांना अधिक सुविधा, सखोल रिवार्ड्स आणि वारंवार होणाऱ्या तसेच प्रीमियम खर्चाच्या श्रेणींमध्ये मोलाचा फायदा मिळवून देत आहोत.”
टीप: नियम आणि अटी लागू, कार्ड देण्याचा निर्णय HDFC बँकेच्या अंतर्गत क्रेडिट आणि पात्रतेच्या नियमांवर आधारित असेल.






