फोटो सौजन्य - pinterest
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. गेल्या महीन्यात शेअर बाजारासबंधित अशा अनेक बातम्या येत होत्या ज्या राजकारणात चर्चेचा विषय बनला होत्या. इंडेक्स वर जाण्याचा अनुमान लावला गेला होता परंतू तसं न घडता इडेक्स खाली पडला. यात अनेक निवेश धारकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाल्याचे दिसून आले. पण त्यातल्या त्यात ज्या गुंतवणूकदारांनी मझगांव डॉक शिपबिल्डर्स, कोचीन शिपयार्ड आणि रेल विकास निगम लिमिटेड (RVNL)सारख्या PSU स्टॉकमध्ये गुंतवणूक केली होती त्यांची चांदी होताना दिसून येत आहे. कारण असं काही रिर्टन्स या कंपनीने त्यांच्या गुंतवणूकदारांना दिले आहे. BSE PSU निर्देशांक झपाट्याने वाढला आहे. केवळ एका वर्षात हा निर्देशांक जवळपास 100% वाढला आहे. काही PSU कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत झपाट्याने झालेली वाढ हे त्याचे कारण आहे.
गेल्या काही दिवसांत मझगांव डॉक शिपबिल्डर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. या शेअर्सची किंमत ही जून २०२४ पर्यंत वाढून ती ३,९६८.२५ रुपयांवर आली आहे. शेअर्समध्ये १,५९०% टक्क्यांची वाढ होताना दिसत आहे. याचबरोबर कोचीन शिपयार्ड आणि रेल विकास निगम लिमिटेड (RVNL)ने देखील 1,000% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर जर एखाद्या गुंतवणूकदाराने दोन वर्षापुर्वी या तिन्ही शेअर्सपैकी एका शेअर्समध्ये एक लाखाची गुंतवणूक केली असती तर त्या गुंतवणूकदाराकडे आता दहा लाख असते.
क्वालिटी इंफ्रास्ट्रक्चर आणि सरकारी खर्चातील वाढीमुळे अनेक PSU शेअर्सच्या किंमतीत ५००% ते ९५०% टक्क्यांची वाढ झालेली आहे. फर्टिलाइजर्स एंड केमिकल्स ट्रावनकोर, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपन्यांचे शेअर्समध्येही लक्षणीय वाढ दिसून येत आहे .मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचा विश्वास आहे की पब्लिक सेक्टर कंपन्यांचा (पीएसयू) नफा आगामी काळात वाढणार आहे. भारत सरकार मॅन्यूफॅक्चरींगवर जास्त भर देत असल्याने याचा खूप मोठा फायदा शेअर बाजारात पाहायला मिळणार असल्याचा अनुमान अनेक बाजार विश्लेषकांनी लावला आहे.