Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीलंकेसाठी भारत बनला ‘संकटमोचक’! मध्यपूर्वेतील युद्धामुळे कोलमडलेल्या लंकेला 38,000 मेट्रिक टन इंधनाची ‘संजीवनी’

भारताने नेहमीप्रमाणे एका खऱ्या आणि विश्वासार्ह मित्राची भूमिका बजावत श्रीलंकेला मदतीचा हात दिला आहे. भारताने तातडीने 38,000 मेट्रिक टन पेट्रोलियम पदार्थांचा मोठा साठा कोलंबोमध्ये पोहोचवला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 29, 2026 | 06:36 PM
श्रीलंकेसाठी भारत बनला 'संकटमोचक'! (Photo Credit- AI)

श्रीलंकेसाठी भारत बनला 'संकटमोचक'! (Photo Credit- AI)

Follow Us
Close
Follow Us:

  • श्रीलंकेसाठी भारत बनला ‘संकटमोचक’!
  • मध्यपूर्वेतील युद्धामुळे कोलमडलेल्या लंकेला 38,000 मेट्रिक टन इंधनाची ‘संजीवनी’
  • राष्ट्रपती दिसानायके यांनी मानले पंतप्रधान मोदीचे आभार
Sri Lanka Fuel Shortage: मध्यपूर्वेतील (Middle East) वाढता तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या संकटामुळे शेजारील श्रीलंका (Sri Lanka) देश पुन्हा एकदा भीषण अंधकार आणि इंधन टंचाईच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. मात्र, अशा कठीण प्रसंगी भारताने नेहमीप्रमाणे एका खऱ्या आणि विश्वासार्ह मित्राची भूमिका बजावत श्रीलंकेला मदतीचा हात दिला आहे. भारताने तातडीने 38,000 मेट्रिक टन पेट्रोलियम पदार्थांचा मोठा साठा कोलंबोमध्ये पोहोचवला असून, यामुळे श्रीलंकेला मोठा दिलासा मिळाला आहे.

पंतप्रधान मोदींचा पुढाकार; ‘लंका IOC’ कडून इंधन रवाना

मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे आखाती देशांतून होणारा तेल पुरवठा जवळपास ठप्प झाला आहे. अनेक जागतिक पुरवठादारांनी श्रीलंकेला इंधन देण्यास असमर्थता दर्शवली होती. ही गंभीर परिस्थिती ओळखून २४ मार्च २०२६ रोजी श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरून सविस्तर चर्चा झाली. या चर्चेनंतर भारताने विलंब न लावता ‘लंका आयओसी’च्या (Indian Oil Corporation) माध्यमातून 20,000 मेट्रिक टन डिझेल आणि 18,000 मेट्रिक टन पेट्रोलचा साठा रवाना केला, जो 28 मार्च रोजी श्रीलंकेच्या तटावर सुखरूप पोहोचला आहे.

🚨 HUGE! India sends 38,000 metric tonnes of fuel to Sri Lanka after PM Modi’s phone call with Sri Lankan President 💥 Additionally, 5,000 tons of diesel reach Bangladesh, taking total Indian diesel supply to them to 15,000 tons recently. India has also proposed to supply… pic.twitter.com/lnAD0HZXqc — The Analyzer (News Updates🗞️) (@Indian_Analyzer) March 29, 2026

Petrol Diesel Price Today : पेट्रोल 5 रुपये तर डिझेल 3 रुपयांनी महागलं, ‘या’ पंपांवर द्यावी लागेल अधिक किंमत

देशात ‘बत्ती गुल’; जनजीवन विस्कळीत

इंधन टंचाईचा श्रीलंकेतील सर्वसामान्यांच्या जीवनावर भीषण परिणाम झाला आहे. ऊर्जा बचतीसाठी सरकारने कडक पावले उचलली असून देशात आता ‘फोर डे वर्किंग वीक’ (चार दिवसांचा आठवडा) लागू करण्यात आला आहे. रेल्वे आणि बस स्थानकांवर प्रवाशांची वर्दळ कमी झाली असून रस्ते ओस पडले आहेत. खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन दिवस घरून काम (WFH) अनिवार्य केले आहे. सरकारी कार्यालयांमध्ये एसीचा वापर टाळून टेबल फॅन वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रस्त्यावरील दिवे बंद ठेवण्यात आले असून वीज वापर 25 टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. इलेक्ट्रिक वाहन मालकांना रात्रीच्या वेळी गाड्या चार्ज न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भारताच्या ‘नेबरहुड फर्स्ट’ धोरणाचे कौतुक

श्रीलंकेतील राजकीय नेत्यांनी भारताच्या ‘पड़ोसी प्रथम’ (Neighborhood First) धोरणाची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. खासदार नमल राजपक्षे यांनी श्रीलंकेला भारताचे ‘टॅक्स मॉडेल’ स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून संकटकाळात नागरिकांवरील कराचा बोजा कमी करून बाजारपेठ स्थिर ठेवता येईल. राष्ट्रपती दिसानायके यांनी या तत्पर मदतीबद्दल पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे आभार मानले आहेत.

रशियाकडून मदतीची अपेक्षा

इंधनाचे हे संकट कायमस्वरूपी सोडवण्यासाठी श्रीलंका आता रशियाकडे आशेने पाहत आहे. जागतिक बाजारपेठेतील तुटवडा लक्षात घेता, अमेरिकेने रशियन तेलवाहू जहाजांवरील निर्बंधांत काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. याचा फायदा घेत श्रीलंका सरकार आणि रशियाचे ऊर्जा उपमंत्री रोमन मार्शाविन यांच्यात दीर्घकालीन ऊर्जा कराराबाबत उच्चस्तरीय चर्चा सुरू झाली आहे. सध्या श्रीलंकेकडे मे महिन्याच्या मध्यापर्यंत पुरेल इतकाच डिझेलचा साठा शिल्लक असल्याने भारताची ही मदत खरोखरच ‘संजीवनी’ ठरली आहे.

LPG Cylinder Rate: सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री? घरगुती सिलिंडरच्या किमतीत वाढ; तुमच्या शहरातील दर काय?

Web Title: India srilanka fuel aid middle east crisis 38000 metric ton

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • Petrol and diesel
  • PM Narendra Modi
  • Sri Lanka
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

Sanjay Shirsat: “इंधन दरवाढीचा निवडणुकांशी काडीचाही संबंध नाही!” मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितले
1

Sanjay Shirsat: “इंधन दरवाढीचा निवडणुकांशी काडीचाही संबंध नाही!” मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितले

BRICS 2026: ‘आता अमेरिका दादागिरी करत आहे…’ भारत भूमीवर पोहोचताच इराणच्या संतापाचा स्फोट; अराघची यांनी व्यक्त केला रोष
2

BRICS 2026: ‘आता अमेरिका दादागिरी करत आहे…’ भारत भूमीवर पोहोचताच इराणच्या संतापाचा स्फोट; अराघची यांनी व्यक्त केला रोष

PM Modi: पंतप्रधान मोदींचे 5 दिवस, 5 देश अन् भारताचा ‘ऊर्जा’ विजय; UAEमध्ये होणार LPG साठी ‘हा’ ऐतिहासिक करार
3

PM Modi: पंतप्रधान मोदींचे 5 दिवस, 5 देश अन् भारताचा ‘ऊर्जा’ विजय; UAEमध्ये होणार LPG साठी ‘हा’ ऐतिहासिक करार

सर्वसामान्यांना फटका ! पेट्रोल-डिझेलच्या दरात एक-दोन नाहीतर ‘इतक्या’ रुपयांची झाली वाढ
4

सर्वसामान्यांना फटका ! पेट्रोल-डिझेलच्या दरात एक-दोन नाहीतर ‘इतक्या’ रुपयांची झाली वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.