Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Forex Reserves Update: भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! परकीय चलन साठ्यात मोठी वाढ, सरकारी तिजोरी 674.19 अब्ज डॉलर्सवर

जागतिक स्तरावरील उलथापालथ दरम्यान भारतासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भारताच्या परकीय चलन साठ्यात मोठी वाढ झाली आहे. सरकारी तिजोरीत डॉलर्स आकडा ६७४.१९ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 11, 2026 | 03:43 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • भारतीय अर्थव्यवस्था सुसाट!
  • परकीय चलन साठ्यात मोठी वाढ
  • सरकारी तिजोरी 674.19 अब्ज डॉलर्सवर
जागतिक स्तरावरील उलथापालथ दरम्यान भारतासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताच्या परकीय चलन साठ्यात पुन्हा एकदा मोठी वाढ नोंदवली गेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, ३ जुलै २०२६ रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा ७.२६ अब्ज डॉलरने वाढून ६७४.१९ अब्ज डॉलर झाला आहे. मागील आठवड्यात हा साठा ५.६५४ अब्ज डॉलरने घटून ६६६.९३ अब्ज डॉलर झाला होता.

40 वर्षांची प्रतीक्षा संपली! भारत-न्यूझीलंडमध्ये मोठा करार, तब्बल 35000 कोटींचा होणार व्यापार, ‘या’ क्षेत्रांचं नशीब चमकणार

यावर्षी २७ फेब्रुवारी रोजी भारताचा परकीय चलन साठा ७२८.४९ अब्ज डॉलर्सच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता. पण, त्यानंतर मध्य पूर्वेतील भू-राजकीय तणाव आणि रुपयावरील दबावामुळे आरबीआयला परकीय चलन बाजारात हस्तक्षेप करण्यास भाग पडले, ज्यामुळे अनेक आठवडे साठ्यात बरेच चढ-उतार पाहायला मिळाले होते.

परकीय चलनात सर्वाधिक वाढ

RBI च्या मते, परकीय चलन साठ्याचा सर्वात मोठा घटक असलेली परकीय चलन मालमत्ता (FCA) ४.५१ अब्ज डॉलरने वाढून ५४५.५८ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. FCA मध्ये डॉलर व्यतिरिक्त युरो, पाउंड आणि जपानी येन यांसारख्या परकीय चलनांच्या मूल्यातील चढ-उतारांचा समावेश असतो. दरम्यान, देशाच्या सुवर्णसाठ्याचे मूल्य २.६६९ अब्ज डॉलरने वाढून १०५.२० अब्ज डॉलर झाले. याशिवाय, विशेष रेखांकन अधिकार (SDRs) १८.६२ अब्ज डॉलरवर पोहोचले आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मधील भारताची राखीव स्थिती ४.७८७ अब्ज डॉलरवर पोहोचली.

पश्चिम आशियातील तणावामुळे रुपयावर दबाव

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्यानंतर भारतीय रुपयावर मोठा दबाव निर्माण झाला होता. रुपयातील घसरण रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेला परकीय चलन बाजारात डॉलरची विक्री करून हस्तक्षेप करावा लागला. त्यामुळे सलग काही आठवड्यांत परकीय चलनसाठ्यात घट झाली होती. मात्र, आता त्यात वाढ होताना दिसत आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, ३ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनसाठ्याचा प्रमुख घटक असलेल्या परकीय चलन मालमत्तेत ४.५१ अब्ज डॉलरची वाढ झाली. त्यामुळे हा साठा ५४५.५७८ अब्ज डॉलरवर पोहोचला. डॉलरच्या तुलनेत मोजल्या जाणाऱ्या या मालमत्तेमध्ये युरो, पाउंड, येन यांसारख्या इतर प्रमुख चलनांच्या मूल्यातील चढ-उताराचाही परिणाम होत असतो.

आरबीआयचे मार्केटवर लक्ष

आरबीआयने म्हटले आहे की, ते परकीय चलन बाजारातील घडामोडींवर सतत लक्ष ठेवते आणि रुपयातील अत्यधिक चढउतार रोखण्यासाठी व बाजाराची स्थिरता राखण्यासाठी आवश्यकतेनुसार हस्तक्षेप करते. पण, मध्यवर्ती बँक निश्चित विनिमय दराच्या उद्दिष्टाने काम करत नाही. तज्ज्ञांच्या मते, मजबूत परकीय चलन साठा हे भारताच्या आर्थिक सामर्थ्याचे लक्षण आहे. यामुळे रुपयाला आधार मिळतो, आयातीचा दबाव कमी होण्यास मदत होते आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या काळात देशाची आर्थिक स्थिती मजबूत होते.

DA Hike News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! महागाई भत्ता 63% वर जाणार? नवीन आकडेवारीतून ‘इतक्या’ वाढीचे संकेत

Web Title: Indian economy rise in foreign exchange reserves government coffers reach 67419 billion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • bank RBI
  • Business News
  • Digital Gold
  • dollar
  • Gold
  • Marathi News
  • RBI
  • RBI news
  • RBI Rule

संबंधित बातम्या

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही
1

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही

Lifestyle News: सिगारेट ओढता? मग रक्तवाहिन्यांवरही होऊ शकतो ‘हा’ मोठा परिणाम; तज्ज्ञांचा इशारा
2

Lifestyle News: सिगारेट ओढता? मग रक्तवाहिन्यांवरही होऊ शकतो ‘हा’ मोठा परिणाम; तज्ज्ञांचा इशारा

Share Market: शेअर बाजारात चहूबाजूने हाहाःकार! तेलापासून RBI पर्यंत 5 मोठे आघात
3

Share Market: शेअर बाजारात चहूबाजूने हाहाःकार! तेलापासून RBI पर्यंत 5 मोठे आघात

Bajaj Finance : FD गुंतवणूकदारांसाठी Good News! बजाज फायनान्सने वाढवले व्याजदर, ज्येष्ठांना ‘इतक्या’पर्यंत परतावा
4

Bajaj Finance : FD गुंतवणूकदारांसाठी Good News! बजाज फायनान्सने वाढवले व्याजदर, ज्येष्ठांना ‘इतक्या’पर्यंत परतावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.