
9 हजारांच्या पगारावरुन 8 कोटींचं साम्राज्य उभारलं ( सौजन्य - Chatgpt )
३४ वर्षीय शशी धरन कोईम्बतूरचे रहिवासी. २०२० मध्ये १,००० चौरस फुटांच्या लहानशा तळघरातून सुरुवात केली. पण आता शशी यांच्या ‘कोवाई किऑस्क’ या कंपनीने तब्बल ८ कोटी रुपयांची म्हणजेच अंदाजे १.८ अब्ज डॉलर्सची उलाढाल गाठतात. ही कंपनी लहान खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, मोठ्या व्यावसायिक इमारती, स्वयंपाकघरातील उपकरणे आणि आधुनिक कॅप्सूल घरे तयार करते. शशी धरन यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. ‘द वीकेंड लीडर’नुसार, त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केवळ ९,००० रुपयांच्या पगारावर केली होती. पण हळूहळू, अनुभव वाढत गेल्याने त्यांचा पगार ६०,००० रुपयांपर्यंत वाढला. पण असं असलं तरीही ते थांबले नाहीत त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा होता.
शशीने आपल्या बचतीतून २ लाख रुपये जमा केलेले गुंतवले. या सगळ्या प्रवासात त्यांना सरकारच्या योजनेची बरीच मदत झाली. त्यांनी PMEGP योजनेतून ४ लाख रुपयांचे कर्ज घेतले. पहिले दीड वर्ष, शशीची पत्नी धनू, जी एका आयटी कंपनीत काम करत होती. तिने स्वतःच्या पगारातून कंपनीचा खर्च आणि कर्मचाऱ्यांचे पगार सांभाळले. या दोघांनी एकमेकांची साथ देत कंपनीचा पाया घातला.
सुरुवातीला, शशी फक्त रेस्टॉरंट आणि हॉटेल्ससाठी स्वयंपाकघरातील उपकरणे बनवत होते. पण २०२२ मध्ये, एका ग्राहकाने त्याला १.८ लाख रुपये किमतीचा फिश फ्रायचा स्टॉल बनवण्याची ऑर्डर दिली. हे उत्पादन इतके लोकप्रिय झाले की त्याला अशा अनेक ऑर्डर्स येऊ लागल्या आणि या ऑर्डरनं त्यांचं नशीब पुर्ण पालटलं. अलीकडेच, त्याच्या कंपनीने ६० लाख रुपये किमतीचा एक मोठा किऑस्क प्रकल्प पूर्ण केला आहे.
ज्या व्यवसायात सुरुवातीला फक्त दोन लोक काम करत होते, तिथे आता १०० लोक काम करतात. घराच्या तळघरात सुरू झालेला हा व्यवसाय आता ८०,००० चौरस फुटांच्या मोठ्या कारखान्यात विस्तारला आहे. कोवाई किऑस्क आता पोर्टेबल कॅप्सूल हाऊसेसचे म्हणजेच वाहून नेता येण्यासारख्या घरांचेही उत्पादन करतात. ही घरे सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतात. रिसॉर्ट्स आणि गार्डन्ससाठी हा एक नवीन ट्रेंड बनत आहे.
आज, कंपनीचा ६०% महसूल किऑस्कमधून, २०% किचनवेअरमधून आणि २०% कॅप्सूल हाऊसेसमधून येतो. वोंड्रेला, जेएसडब्ल्यू स्टील आणि एचसीएल यांसारख्या मोठ्या कंपन्याही ग्राहक आहेत. शशी धरन यांचा विश्वास आहे की व्यवसायातील यश एका रात्रीत मिळत नाही. पण मेहनत केली तर ते एक ना एक दिवस नक्की मिळतं. नवीन उद्योजकांना सल्ला देतात की त्यांनी पहिली ५-६ वर्षे कठोर परिश्रम आणि संघर्षासाठी तयार राहा. संघर्ष कधीच संपत नाही; फक्त पद्धत बदलते. म्हणून संयम ठेवा आणि काम करत राहा. यश तुमचंच आहे.