Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MUFG बँकेकडून श्रीराम फायनान्समध्ये 47,11,21,055 Equity Shares ची गुंतवणूक

श्रीराम फायनान्सच्या संचालक मंडळाने आज झालेल्या बैठकीत प्रेफरेंशियल इश्यूद्वारे MUFG बँकेला इक्विटी शेअर्सचे वाटप करण्यास मंजुरी दिल्यानंतर ही गुंतवणूक साकार झाली.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 08, 2026 | 06:01 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • MUFG बँकेकडून श्रीराम फायनान्समध्ये Equity Shares ची गुंतवणूक
  • MUFG सोबतच्या दीर्घकालीन धोरणात्मक सहकार्याची सुरुवात
  • भारतातील शाश्वत विकास आणि आर्थिक समावेशनाला चालना
MUFG Bank Investment in Shriram Finance : मित्सुबिशी UFJ फायनान्शिअल ग्रुप, Inc. ची उपकंपनी असलेल्या MUFG बँक लिमिटेड (“MUFG बँक”) ने भारतातील अग्रगण्य नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी एक असलेल्या श्रीराम फायनान्स लिमिटेडमध्ये आपली धोरणात्मक गुंतवणूक यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. श्रीराम फायनान्सच्या संचालक मंडळाने आज झालेल्या बैठकीत प्रेफरेंशियल इश्यूद्वारे MUFG बँकेला इक्विटी शेअर्सचे वाटप करण्यास मंजुरी दिल्यानंतर ही गुंतवणूक साकार झाली. MUFG बँकेने प्रति शेअर ₹८४०.९३ या दराने ४७,११,२१,०५५ इक्विटी शेअर्स खरेदी केले असून, एकूण गुंतवणूक अंदाजे ₹३९,६१८ कोटी इतकी आहे. भारतीय स्पर्धा आयोगासह (CCI) सर्व आवश्यक नियामक आणि वैधानिक मंजुऱ्या प्राप्त झाल्यानंतर हा व्यवहार पूर्ण करण्यात आला आहे.

25 हजार तरुणांना मिळणार रोजगार! महाराष्ट्रात गुंतवणुकीचा धमाका, व्हिएतनामच्या ‘विन ग्रुप’चा 8.5 अब्ज डॉलर्सचा करार

भारतातील शाश्वत विकास आणि आर्थिक समावेशनाला चालना

या शेअर्सच्या वाटपानंतर, पूर्णतः सौम्य (fully diluted) आधारावर श्रीराम फायनान्समध्ये MUFG बँकेचा सुमारे २०% इक्विटी हिस्सा असेल. हा व्यवहार भारताच्या वित्तीय सेवा क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा सीमापार (cross-border) गुंतवणूक व्यवहार मानला जातो. या गुंतवणुकीमुळे MUFG ची भारतातील उपस्थिती अधिक मजबूत होणार असून, श्रीराम फायनान्सला MUFG च्या जागतिक कौशल्य, नेटवर्क आणि क्षमतांचा लाभ घेत आपल्या दीर्घकालीन वाढीच्या धोरणाला गती देता येईल. हा व्यवहार MUFG आणि SFL या दोन्ही संस्थांसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला असून, त्यांच्या दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारीला अधिक बळकटी देणारा आहे. तसेच, भारतातील शाश्वत विकास आणि आर्थिक समावेशनाला चालना देण्याच्या त्यांच्या सामायिक वचनबद्धतेलाही यामुळे बळ मिळेल.

MUFG सोबतच्या दीर्घकालीन धोरणात्मक सहकार्याची सुरुवात

“हा व्यवहार केवळ एक ऐतिहासिक टप्पा नाही, तर MUFG सोबतच्या दीर्घकालीन धोरणात्मक सहकार्याची सुरुवात आहे. या भागीदारीमुळे नवनिर्मितीच्या नव्या संधी उपलब्ध होतील, विविध आणि किफायतशीर निधी मिळेल, तसेच जोखीम व्यवस्थापन आणि प्रशासनातील जागतिक सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यास मदत होईल. या गुंतवणुकीमुळे आमचा भांडवली पाया अधिक मजबूत झाला असून, आम्हाला आमच्या प्रमुख व्यवसाय क्षेत्रांमध्ये वेगाने विस्तार करता येईल. पुढे जाताना, सातत्यपूर्ण आणि जबाबदार वाढ साध्य करत सर्व भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्यावर आमचा भर राहील, असं मत SFL चे कार्यकारी उपाध्यक्ष उमेश रेवणकर यांनी मांडलं.

SFL ही भारतातील एक सक्षम आणि विश्वासार्ह वित्तीय संस्था

“श्रीराम फायनान्ससोबत आमचे धोरणात्मक सहकार्य सुरू करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. SFL ही भारतातील एक सक्षम आणि विश्वासार्ह वित्तीय संस्था असून, MSME आणि रिटेल क्षेत्रात मोठ्या वाढीची क्षमता तिच्याकडे आहे. ही गुंतवणूक भारताच्या बाजारपेठेबाबत MUFG च्या दीर्घकालीन वचनबद्धतेचे प्रतीक आहे. आम्हाला विश्वास आहे की या सहकार्यामुळे भारताच्या शाश्वत आर्थिक विकासात आणि आर्थिक समावेशनाच्या प्रक्रियेत सकारात्मक योगदान मिळेल. भविष्यात, आमच्या जागतिक अनुभव, नेटवर्क आणि व्यवस्थापन कौशल्यांचा उपयोग करून आम्ही SFL च्या शाश्वत वाढीस सक्रिय पाठबळ देऊ.”, असं मत ग्रुप CEO, आणि अध्यक्ष जुनिची हान्झावा यांनी मांडलं आहे.

Gold Silver Price Hike : चांदी 13000 रुपयांनी महागली, तर सोन्याने ओलांडला नवा टप्पा, का वाढले एकाएकी दर?

Web Title: Investment of 471121055 equity shares by mufg bank in shriram finance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 06:01 PM

Topics:  

  • Business News
  • Iran Israel Conflict
  • Marathi News
  • share
  • share market

संबंधित बातम्या

Share Market Today: हिरव्या रंगात उघडणार बाजार! कोणते स्टॉक्स देणार कमाईची संधी? तज्ज्ञांनी दिले संकेत
1

Share Market Today: हिरव्या रंगात उघडणार बाजार! कोणते स्टॉक्स देणार कमाईची संधी? तज्ज्ञांनी दिले संकेत

Twisha Sharma Death मिस पुणे ते मृत्यूचं रहस्य! ट्विशा-दीपिका मृत्यूंचं गूढ अधिक गडद!
2

Twisha Sharma Death मिस पुणे ते मृत्यूचं रहस्य! ट्विशा-दीपिका मृत्यूंचं गूढ अधिक गडद!

Parbhani : परभणी-हिंगोली विधान परिषद जागा शिवसेनेचीच
3

Parbhani : परभणी-हिंगोली विधान परिषद जागा शिवसेनेचीच

Karjat News : ग्रामीण भागात सरकारी रुग्णवाहिकेची गैरसोय; विषबाधेमुळे रुग्णाला ॲम्बुलन्स मिळता मिळेना
4

Karjat News : ग्रामीण भागात सरकारी रुग्णवाहिकेची गैरसोय; विषबाधेमुळे रुग्णाला ॲम्बुलन्स मिळता मिळेना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.