तब्बल 18 लाख भारतीयांनी सोडले देशाचे नागरिकत्त्व; स्थलांतराचा मुद्दा बनतोय गंभीर...(फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : गेल्या ११ वर्षांच्या कालावधीत सुमारे १६ लाख भारतीय नागरिकांनी भारतीय नागरिकत्व सोडून परदेशात कायमचे वास्तव्य स्वीकारल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे. परराष्ट्र उत्तरातून ही बाब समोर आली असून, हा मंत्रालयाने राज्यसभेत दिलेल्या लेखी आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने देशातील स्थलांतराचा गंभीर प्रश्न पुन्हा समोर आला आहे.
अलीकडच्या काळात देशपातळीवर आणि राज्य पातळीवर सामाजिक व राजकीय अस्थिरता वाढल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. सातत्याने बदलणारी धोरणे, राजकीय संघर्ष आदींमुळे तरुणांमध्ये असुरक्षितता वाढताना आहे. शिक्षणाचा दर्जा घसरत चालल्याची, सरकारी आरोग्य व्यवस्था अपुरी पडत असल्याची आणि रोजगाराच्या संधी कमी होत असल्याची तक्रारही वाढत आहे. खासगीकरणामुळे शिक्षण व आरोग्य सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याची भावना असून, तरुण वर्ग अधिक संधी, स्थैर्य आणि गुणवत्तापूर्ण आयुष्यासाठी परदेशाचा मार्ग निवडत आहे.
हेदेखील वाचा : Supreme Court : “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
नागरिकत्व सोडण्यामागची अनेक प्रमुख कारणे आहेत. त्यामध्ये अधिक पगार आणि रोजगारातील स्थैर्य, उच्च शिक्षण व संशोधनाच्या संधी, दर्जेदार आरोग्य सुविधा आणि सामाजिक सुरक्षितता, कुटुंब आधीच परदेशात स्थायिक असणे, शिक्षणाचा दर्जा घसरणे यांसारख्या कारणांमुळे अनेक भारतीय देशातून बाहेर जाताना दिसत आहेत.
भारत सोडून इथे होत आहेत स्थायिक…
बहुतेक नागरिक अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम या देशांचे नागरिकत्व स्वीकारत असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
डोमिनिकात ७६ लाखांत नागरिकत्त्व
तुम्ही किमान ७६ लाख रुपयात नागरिकत्व मिळवू शकता. तुम्हाला फक्त ३ ते ६ महिन्यांत नागरिकत्व मिळेल. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जावे लागणार नाही. तुम्ही घर घेतले नाही तरीही तुम्हाला नागरिकत्व मिळेल. येथे कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही आणि भाषेचा कोणताही अडथळा नाही. त्यानंतर तुम्ही १४५ देशांमध्ये व्हिसाशिवाय जाऊ शकता.
हेदेखील वाचा : ‘हे’ ९ देश, जिथे भारतातील नागरिक नागरिकत्व खरेदी करू शकतात, किंमत १ कोटी रुपयांपेक्षा कमी !






