वडापाव विकून महिन्याला कमावतोय 2 लाख रुपये, ...दिवसभर लागते ग्राहकांची रांग!
“कोई धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा धर्म कोई नहीं होता…” अभिनेता शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटातील हा डायलॉग मुंबईत रस्त्यावर वडा पाव विकणाऱ्या एका विक्रेत्याला एकदम लागू पडतो. ही व्यक्ती वडा पाव विकून एका महिन्यात भरघोस उत्पन्न मिळवत आहे. एवढी कमाई की कॉर्पोरेट जॉबमध्ये काम करणाऱ्या अनेकांना, तो महिन्याकाठी करत असलेली कमाई पाहून हेवा वाटेल. याच पार्श्वभुमीवर आज आपण त्यांची वडापाव व्यवसायातील यशस्वी यशोगाथा पाहणार आहोत…
नोकरदारापेक्षा अधिकचे उत्पन्न
सोशल मीडिया इंफ्लुएंसर सार्थक सचदेवने या व्यक्तीने या वडापाव विक्रेत्याचा व्हिडिओ आपल्आ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. सार्थकने या व्यक्तीच्या दुकानात एक संपूर्ण दिवस घालवला. यानंतर, कॉर्पोरेट नोकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या चांगल्या लोकांनाही त्या विक्रेत्याच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न जाणून घेतल्यास आपल्या शैक्षणिक पात्रतेची लाज वाटेल. अशी ही व्यक्ती आपल्या छोट्याशा स्टॉलमधून महिन्याला लाखो रुपये कमावते आहे, असे त्याने म्हटले आहे. कारण त्याच्या या व्यवसायाची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
किती कमावतो हा वडापाव विक्रेता?
हा व्यक्ती मुंबईत एका गाडीवर वडापाव विकतो. सार्थकने आपला संपूर्ण दिवस या विक्रेत्याच्या गाडीवर घालवला. सकाळी स्टॉल सुरू केल्यानंतर काही वेळातच सुमारे 200 वडापावची विक्री झाली. दिवसअखेर त्याने 622 वडापाव विकले होते. एका वडापावची किंमत १५ रुपये आहे. या स्थितीत त्याने दिवसभरात 9330 रुपयांची कमाई केली. विशेष म्हणजे त्याला केवळ एक गाडी आणि साहित्य वगळता अन्य कोणताही खर्च करावा लागला नाही.
किती होतीये त्याला महिना कमाई
सोशल मीडिया इंफ्लुएंसर सार्थकच्या म्हणण्यानुसार, मुंबईत एका गाडीवर वडापाव विकणारा हा व्यक्ती एका महिन्यात सुमारे 2.80 लाख रुपयांचा व्यवसाय करतो. दरम्यान,सार्थकने काढलेल्या व्हिडिओमध्ये विक्रेता सांगतो की, मासिक खर्च केवळ 80 हजार रुपये आहे. म्हणजेच एका महिन्यात तो 2 लाख रुपये निव्वळ नफा कमावतो. ही कमाई कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारापेक्षा अधिक आहे.
समाजमाध्यमांवर व्हिडीओ व्हायरल
इंस्टाग्रामवर सार्थकच्या या व्हिडीओवर लोकांच्या जबरदस्त प्रतिक्रिया येत आहेत. त्याच्या या व्हिडिओला आतापर्यंत 26 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. यावर 10 हजारांहून अधिक लोकांनी कमेंट केल्या आहेत. कमेंट सेक्शनमध्ये एका यूजरने लिहिले आहे की, त्यालाही इतका पगार मिळावा, अशी इच्छा आहे. तर एकाने ते एक परिपूर्ण स्थान म्हणून वर्णन केले आहे. एका व्यक्तीने गमतीने लिहिले आहे, आजपासून अभ्यास करणे थांबवले आहे.