पुण्यातील तापमानात घट कायम (फोटो- सोशल मीडिया)
Unseasonal Rain: अवकाळीमुळे ‘राजा’ संकटात; शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा
छत्रपती संभाजीनगर शहराच्या कमालसोबतच किमान तापमानात सातत्याने वाढची नोंद होत आहे. रविवारी कमाल तापमानाने ३४ अंश पार केला आहे तर किमान तापमानातदेखील आठवडाभरात तब्बल साडेचार अंशाची वाढ झाली आहे. कमाल ३४. ६ आणि किमान तापमान २१. ४ अंश सेल्शियसची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. ऐन फेब्रुवारीत हिवाळा संपत असताना शहरात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावरच सूर्य तळपू लागल्याने तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी नागरिकांना उष्णतेचा त्रास जाणवू लागला आहे. साधारणपणे फेब्रुवारीत वातावरण आल्हाददायक असते. मात्र यंदा कमाल तापमान ३४ अंशांच्या पुढे गेल्याने दुपारच्या वेळेत उन्हाचा तीव्र चटका जाणवत आहे. सकाळी आणि रात्री गारवा जाणवत असला, तरी दुपारनंतर शहरातील रस्ते, बाजारपेठा आणि वर्दळीच्या भागांत उष्णतेची तीव्रता वाढलेली दिसून येत आहे.






