Khamenei Death : मोसादाच डेथ ट्रॅप! २० वर्षांचा पाठलाग अन् CIA च्या मदतीने रचलं चक्रव्यूह; 'असा' केला खामेनेईंचा गेम!
इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद त्याच्या अचूक टार्गेट किलींगसाठी ओळखली जाते. मीडिया रिपोर्टनुसार, मोसादने गेल्या दोन दशकांपासून खामेनेईंच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवली होती. त्यांच्या दिनचर्यापासून ते त्यांच्या संरक्षण त्रुटींपर्यंतची माहिती मोसादकडे होती. मोसादने इराणमध्ये मोठे जाळे विणले होते. इराणमधील सत्ताविरोधी लोकांच्या मदतीने खामेनेईंचा डेथ ट्रॅप तयार करण्यात आला होता.
या मोहिमेत मोसादला अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA ने मोठी मदत केली होती. CIA खामेनेईंच्या गुप्त ठिकाणाची मिळवून मोसादला दिली. यानंतर ही माहिती तातडीने इस्रायली सैन्यापर्यंत पोहोचवण्यात आली. माहिती मिळताच इस्रायलने शनिवारी, २८ फेब्रुवारी २०२६ च्या पहाटे इराणवर हल्ला केला. इस्रायलला वेळत माहिती मिळाल्याने युद्धाचा आराखडा आखण्यात आला आणि थेट राजधानी तेहरामधील सरकारी कार्यालयांवर, देशातील प्रमुख शहरांवर आणि अणु केंद्रांवर ड्रोन वर्षाव सुरु केला. याच हल्ल्यात खामेनेईंचा अंत झाला.
अहवालांनुसार असेही सांगितले जाते की, इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादला इराणच्या सरकारमधूनच खामेनेई यांच्या गुप्त ठिकाणाची माहिती मिळाली होती. खामेनेई यांची सुरक्षेत अत्यंत कडक बंदोबस्त करण्यात आला होता. त्यांना इस्रायली हल्ल्यानंतर तातडीने गुप्त ठिकाणी हलवण्यात आले होते. त्यांच्या गुप्त ठिकाणाची माहिती काही वरिष्ठ सल्लागारांना देण्यात आली होती. परंतु याच सल्लागारांमधील एका अधिकाऱ्याने अचून माहिती इस्रायलच्या मोसादला दिली मात्र अद्याप अधिकाऱ्याचे नाव स्पष्ट झालेले नसून इराण सरकारडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.






