सूरजकुंड मेळ्यात भीषण दुर्घटना! फिरता पाळणा अचानक कोसळला (Photo Credit- X)
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात शनिवारी संध्याकाळी ६:१५ वाजताच्या सुमारास घडला. पाळणा कोसळल्याने समजताच मदतकार्यासाठी धावलेले पलवल येथे तैनात असलेले पोलीस निरीक्षक जगदीश प्रसाद यांचा बचावकार्यादरम्यान गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला. या अपघातात अन्य अर्धा डझन लोकही जखमी झाले असून त्यात काही पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याची शक्यता आहे.
फरीदाबाद सूरजकुंड मेले में हुआ हादसा अत्यंत दुखद है। विश्वस्तरीय आयोजन में सरकार की तरफ़ से ऐसी घोर लापरवाही अक्षम्य है। हादसे में कई लोगों के घायल होने व पुलिसकर्मी की मृत्यु की दुखद सूचना मिल रही है। भगवान से घायलों के स्वास्थ्य लाभ के लिए प्रार्थना और मृतक के परिवार के… pic.twitter.com/s89AGRmh2t — Anurag Dhanda (@anuragdhanda) February 7, 2026
फरीदाबाद के सूरजकुंड में मेला चल रहा था। जिसमें ये झूला लगा था झूले में 18 लोग सवार थे। ऊपर जाकर झूला फंस गया। कुछ लोगों को नीचे उतारा गया। उसी वक्त झूला नीचे गिर गया। इंस्पेक्टर जगदीश की मौत हुई है, 13 लोग घायल हैं।#faridabad pic.twitter.com/KhoFr4qgoy — Parikshit Singh Adv (@iParikshitRana) February 7, 2026
जिल्हा उपायुक्त (DC) आयुष सिंह यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, “या दुर्घटनेत एकूण १३ लोक जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे.” घटनेनंतर जिल्हा उपायुक्त, पर्यटन विभागाचे एमडी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या संपूर्ण परिसराची बॅरिकेडिंग करण्यात आली आहे.
शनिवारी सूरजकुंड मेळ्यात एकामागून एक दोन अपघात घडले, ज्यामुळे आयोजकांच्या नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे: पहिली घटना फूड कोर्टमध्ये जोराच्या वाऱ्यामुळे मुख्य गेट कोसळले, ज्यात दोन जण जखमी झाले. तर, दुसरी घटना: ‘सुनामी’ पाळणा कोसळला, ज्याने संपूर्ण मेळा हादरवून टाकला.
ज्यावेळी हा अपघात घडला, तेव्हा मेळ्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होते. पाळणा कोसळताच परिसरात प्रचंड अफरातफर माजली आणि लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले. ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने तातडीने बचाव पथके तैनात केली आहेत.
पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मेळा समिती आणि झुल्यांच्या संचालकांनी सुरक्षेचे नियम पाळले होते की नाही, याची तपासणी केली जात आहे. “या दुर्घटनेत जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, “फरिदाबादमधील सूरजकुंड मेळ्यादरम्यान झालेल्या अपघातामुळे मला खूप दुःख झाले आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. जखमींवर योग्य आणि तात्काळ उपचार करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. जखमींना आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी हरियाणा सरकार पूर्ण तत्परतेने आणि संवेदनशीलतेने काम करत आहे.”






