Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SBI चा ग्राहकांना Alert! तुमचा Bank Balance होऊ शकतो झिरो; YONO App वापरत असाल तर वेळीच सावध व्हा

तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक आहात? सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका संदेशामुळे लाखो खातेधारकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. अशा मॅसेजपासून सावध व्हा. नेमकं काय आहे या मागे सत्य सविस्तर जाणूया

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 06, 2026 | 06:27 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • SBI चा लाखो ग्राहकांसाठी एक महत्त्वपूर्ण अलर्ट
  • सायबर गुन्हेगारांनी रचलेला सापळा
  • ग्राहकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही
SBI Scam Warning : आजकाल डिजिटल बँकिंगमुळे आपले जीवन अत्यंत सोयीचे झालं आहे. पण असं असलं तरीही कुठेना कुठे ग्रहण लागतं त्याप्रमाणे फसवणूक करणाऱ्यांचा धोका तितकाच वाढत आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या (SBI) लाखो ग्राहकांसाठी एक महत्त्वपूर्ण अलर्ट जारी केला आहे. विशेषतः, सोशल मीडियावर सध्या एक संदेश वेगाने व्हायरल होत आहे; या संदेशात SBI ग्राहकांना इशारा देऊन घाबरवले जात आहे की, जर त्यांनी आपले Aadhaar details त्वरित अपडेट केले नाही, तर त्यांचे ‘YONO’ ॲप काम करणे बंद करेल. असा संदेश पाहिल्यावर कोणत्याही सामान्य व्यक्तीला आपली बँकिंग सेवा कदाचित स्थगित होईल या भीतीने घबराट वाटू शकते; मात्र, नेमक्या अशाच वेळी तुम्ही शांत डोक्याने विचार करणे अत्यंत गरजेचे असते. कदाचित हा तुमच्यासाठी सापळा असू शकतो. नेमकं काय आहे सत्य जाणून घेऊयात.

Inflation Update : किचनचं Budget कोलमडलं! Iran Israel तणावामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कडाडल्या

‘APK’ फाईलची लिंक

या व्हायरल संदेशासोबत अनेकदा एका ‘APK’ फाईलची लिंक जोडलेली असते; ही फाईल केवळ इन्स्टॉल केल्याने तुम्ही तुमच्या आधार details अपडेट होऊ शकतात असा दावा त्यामध्ये केला जातो. ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय, ग्राहकांना ॲपद्वारे त्यांच्या बँक खात्यांमध्ये प्रवेश करता येणार नाही, असे सांगत त्यांच्या मनात भीती निर्माण केली जात आहे. जेव्हा ही बाब ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’च्या निदर्शनास आली, तेव्हा त्यांनी तात्काळ यासंदर्भात fact check केला. आणि त्यांनी हे स्पष्ट केलं की या व्हायरल बातमीमध्ये कोणतंही तथ्य नाही; तसेच, सरकारकडून किंवा SBI कडून अशा प्रकारचा कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नाही.

सायबर गुन्हेगारांनी रचलेला सापळा

वस्तुस्थिती अशी आहे की, हा संपूर्ण प्रकार म्हणजे सायबर गुन्हेगारांनी रचलेले एक सुनियोजित सापळा आहे, ज्याचा उद्देश भीती दाखवून तुमची वैयक्तिक माहिती चोरणे हा आहे. SBI ने देखील हे स्पष्टपणे नमूद केले आहे की, बँक आपल्या ग्राहकांना फोनवर किंवा WhatsApp द्वारे कोणत्याही अनोळखी फाईल्स डाउनलोड करण्यास कधीही सांगत नाही. बँकेच्या नियमांनुसार, बँक तुमच्याकडून अत्यंत गोपनीय माहितीची जसे की तुमचा आधार क्रमांक, बँकिंग पासवर्ड किंवा OTP कधीही मागणी करणार नाही. जर कोणी तुमच्याकडे अशा प्रकारच्या तपशीलांची मागणी केली, तर तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की, समोरची व्यक्ती ही बँकेचा अधिकारी नसून, एक ठग आहे.

ग्राहकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही

अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, अशा फसवणुकीच्या संदेशांमुळे ग्राहकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही; कारण हे संदेश पूर्णपणे बनावट आणि फसवणूक करणारे असतात. अज्ञात लिंक्सवर क्लिक करणे हे तुमच्या मोबाईलच्या सुरक्षेसाठी एक गंभीर धोका ठरू शकते. सायबर चोरांनी पाठवलेल्या फाइल्स केवळ तुमच्या फोनमधील डेटाच चोरू शकत नाहीत, तर त्यांना तुमच्या बँक खात्याचा संपूर्ण ताबा घेण्याची क्षमताही असते. एकदा का तुमचा फोन हॅक झाला, की तुमची गोपनीयता आणि तुमचे आर्थिक व्यवहार दोन्हीही धोक्यात येतात.

मोहात पाडणाऱ्या ऑफर्सपासून दूर राहा

हे नेहमी लक्षात ठेवा की, SBI सारख्या मोठ्या संस्था आपल्या ग्राहकांच्या गोपनीयतेचा पूर्ण आदर करतात. त्या तुम्हाला कधीही अनौपचारिक किंवा असुरक्षित माध्यमांतून तुमची माहिती विचारणार नाहीत.जर तुम्हाला तुमचे पैसे आणि तुमची ओळख सुरक्षित ठेवायची असेल, तर अनोळखी व्यक्तींकडून येणारे संदेश आणि मोहात पाडणाऱ्या ऑफर्सपासून दूर राहा. या डिजिटल युगात, तुमची स्वतःची जागृती हीच तुमच्या आर्थिक सुरक्षेची खरी ढाल ठरते; त्यामुळे, सदैव सावध राहा आणि सुरक्षित बँकिंग पद्धतींचा अवलंब करा.

Todays Gold-Silver Price: सोने खरेदीदारांसाठी खुशखबर! 24 कॅरेटच्या दरात पुन्हा घसरण, चांदीचे भाव स्थिर

Web Title: Latest state bank of india yono app blocking scam warning fake aadhaar update request marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • aadhaar card
  • Business News
  • cyber
  • Cyber Attack
  • Cyber Fraud
  • cyber scam
  • Marathi News
  • otp
  • SBI

संबंधित बातम्या

Jailer 2 Box Office Collection: रजनीकांतचा पुन्हा धमाका! दोन दिवसांत जगभरातून कमावले ‘इतके’ कोटी
1

Jailer 2 Box Office Collection: रजनीकांतचा पुन्हा धमाका! दोन दिवसांत जगभरातून कमावले ‘इतके’ कोटी

‘बँका केवळ कर्ज देणाऱ्या संस्था नाहीत’, राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचं मोठं विधान
2

‘बँका केवळ कर्ज देणाऱ्या संस्था नाहीत’, राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचं मोठं विधान

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात
3

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी
4

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.