
Jailer 2 Box Office Collection: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
पहिल्याच दिवशी सगळे शो हाऊसफुल होते, अॅडव्हान्स बुकिंगचेच कोटींचे आकडे होते.2023 मध्ये आलेल्या जेलरने सगळे रेकॉर्ड मोडले होते, त्यामुळे त्याच्या दुसऱ्या भागाची सगळेच वाट बघत होते. नेल्सन दिलीपकुमार यांनी निराश केले नाही. रजनीकांत पुन्हा एकदा टायगर मुथुवेल पांडियनच्या भूमिकेत आले आहेत, तोच रिटायर्ड जेलरचा रुबाब, तीच स्टाईल. Jailer 2 Box Office Collection:
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार आकडे बघून डोळे फिरतील.पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी सिनेमाने भारतात 59.70 कोटी रुपये कमावले. हा आकडा ऐकूनच समजते की क्रेझ किती आहे. लोकांनी सुट्टी टाकून पहिला शो बघितला.
दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पण कमाई कमी झाली नाही. वर्कंकिंग डे असून सुद्धा चित्रपटाने 35.60 कोटींचा गल्ला जमवला. याच अर्थ फक्त दोन दिवसात भारतात 95.30 कोटी. आजा वीकेंट असल्याने प्रेक्षक चित्रपटगृहात तूफान गर्दी पाहायला मिळेल. त्यामुळे 100 कोटीचा टप्पा पार करायला काहीही अशक्य राहणार नाही. तसेच नुसते भारतामध्ये नाहीतर, संपूर्ण जगभरात रजनीकांतची क्रेझ पाहायला मिळत आहे.
परदेशात पण लोक आवडीने बघत आहेत. जगभरात दोन दिवसात 209.10 कोटींची कमाई केली आहे. दोन दिवसात 200 कोटी पार करणे म्हणजे सोपी गोष्ट नाही, फक्त थलायवाच हे करू शकतो.
या सिनेमाचे दिग्दर्शन नेल्सन दिलीपकुमारनेच केले आहे. पहिला भाग त्यांनीच आणला होता. रजनीकांत तर आहेतच, पण सोबत राम्या कृष्णन, योगी बाबू, मिर्ना मेनन, विद्या बालन आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या पण महत्वाच्या भूमिका आहेत. या सगळ्यांनीच सिनेमा धरून ठेवला आहे.सगळ्यात मोठा सरप्राईज म्हणजे या सिनेमात दोन मोठे कॅमिओ आहेत. मल्याळम सुपरस्टार मोहनलाल आणि आपला हृतिक रोशन. त्यांची एंट्री झाली की थिएटरमध्ये शिट्ट्या वाजत आहेत असे प्रेक्षक सांगत आहेत.
एकंदरीत जेलर 2 हा फुल मसाला एंटरटेनर आहे. रजनीकांतची स्टाईल, अॅक्शन, कॉमेडी आणि इमोशन सगळे आहे. पहिला भाग बघितला असेल तर दुसरा भाग तर नक्कीच बघायला पाहिजे. वीकेंडला तर हा सिनेमा सगळे रेकॉर्ड मोडेल असे वाटते आहे. रजनीकांतने पुन्हा एकदा सिद्ध केले की वय झाले तरी बॉक्स ऑफिसचा बाप तोच आहे..
Ans: दिलेल्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने भारतात ९५.३० कोटी रुपये कमावले.
Ans: दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाची दोन दिवसांची जगभरातील कमाई २०९.१० कोटी रुपये आहे.
Ans: नेल्सन दिलीपकुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.