मानवतेचे अनोखे दर्शन! मुस्लीम विद्यार्थी नमाज पडत असताना हिंदू मित्रांनी बनवले 'मानवी सुरक्षा कवच'
मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ विद्यापीठ प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव ऐतिहासिक लाल बारादरी इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार आणि त्यातील मशीद सील केली. मशिदीच्या बाजूने मोठे बॅरिकेड्सही उभारण्यात आले. या अचानक कारवाईमुळे विद्यार्थी संतप्त झाले, लाल बारादरीसमोर मोठ्या संख्येने जमलेले विद्यार्थी घोषणाबाजी करू लागले. प्रशासनाने हे प्राचीन धार्मिक स्थळ आणि वारसा स्थळ कोणतीही पूर्वसूचना किंवा सल्लामसलत न करता बंद केल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. निषेधाच्या वेळी, संतप्त विद्यार्थ्यांनी प्रशासनाने उभारलेले बॅरिकेड्स फाडून टाकले आणि मशिदीच्या बाहेर उघड्यावर नमाज पठण करण्याचा निर्णय घेतला.
निदर्शनादरम्यान, विद्यापीठ कॅम्पसमध्ये एक घटना घडली ज्याने केवळ प्रशासनाचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. मशिदीचे गेट बंद असल्याने मुस्लिम विद्यार्थी जमिनीवर प्रार्थना करू लागले. त्यावेळी त्याठिकाणी त्यांचे हिंदू वर्गमिंत्रांनी एक मानवी सुरक्षा कडे तयार करत त्यांना सुरक्षा दिली. हिंदू -मुस्लिम विद्यार्थी आपले मतभेद विसरून एकमेकांचे हात घट्ट धरून, हिंदू विद्यार्थ्यांनी प्रार्थना करणाऱ्या विद्यार्थ्यांभोवती एक संरक्षक घेरा किंवा ‘मानवी साखळी’ तयार केली. या घटनेचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विद्यार्थी धार्मिक अडथळे तोडून देशात एकता आणि बंधुत्वाचा संदेश दिल्याचे दिसून येत आहे.
लखनऊमधीस वादग्रस्त लाल बारादरी ही केवळ एक सामान्य इमारत नाही तर लखनौच्या नवाबी संस्कृतीचे आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. ही ऐतिहासिक रचना सुमारे २०० वर्षांपूर्वी, १८०० मध्ये, नवाब नसिरुद्दीन हैदर यांनी बांधली होती. ही इमारत इतकी प्राचीन आहे की ती लखनऊ विद्यापीठ अस्तित्वात येण्याच्या खूप आधीपासून स्थापित झाली होती. सध्या, ही भव्य इमारत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) द्वारे संरक्षित स्मारक म्हणून सूचीबद्ध आहे आणि तिच्या स्थापत्य उत्कृष्टतेसाठी प्रसिद्ध आहे.
विद्यापीठ प्रशासनाने केवळ सुरक्षेच्या कारणास्तव कठोर कारवाई केली आहे. विद्यापीठाच्या रजिस्ट्रारच्या मते, लाल बारादरी इमारत आता पूर्णपणे जीर्ण झाली आहे. मशिदीची इमारत जीर्ण झाल्यामुळे मोठी दुर्घटना किंवा कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव, केवळ मशीदच नाही तर इमारतीच्या परिघातील बँका, क्लब आणि कॅन्टीन देखील रिकामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांनी ASI ला दुरुस्तीची विनंती करण्यासाठी अनेक अधिकृत पत्रे लिहिली होती, परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येऊ नये म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले.
India Rain Alert: तुम्ही ‘या’ राज्यांमध्ये राहताय? मग जरा जपूनच; वरुणराजा असा कोसळणार की…
विद्यापीठाच्या गेटवर सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मात्र, इतक्या कडक पहऱ्यातही विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. जोपर्यंत विद्यापीठाचे गेट उघडले जात नाही आणि प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे. कॅम्पसमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असून, कोणत्याही क्षणी आंदोलनाला पुन्हा धार चढण्याची शक्यता नाकारता येत नाही.






