Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Cylinder Rate: सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री? घरगुती सिलिंडरच्या किमतीत वाढ; तुमच्या शहरातील दर काय?

सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे, भारताला LPG आयात करण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारत आपल्या LPG पैकी ६० टक्के साठा हा आखाती देशांकडून आयात केला जातो.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 28, 2026 | 12:40 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • भारत LPG पैकी ६० टक्के साठा हा आखाती देशांकडून आयात
  • LPG सिलिंडरच्या दरांमध्ये काही बदल झालेत का?
  • देशाकडे ६० दिवसांचा साठा उपलब्ध
LPG Cylinder Rate: आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या जगाचा बॅलन्स बिघडला आहे. सगळ्या देशातील आयात निर्यातीचं गणित तर पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम देशातील इतर गोष्टींसोबतच जीवनावश्यक गोष्टींवरही होताना दिसत आहे. त्यातली अत्यंत महत्त्वाची गोष्टी म्हणजे रोजच्या वापरातील LPG गॅस सिलेंडर. सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे, भारताला LPG आयात करण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारत आपल्या LPG पैकी ६० टक्के साठा हा आखाती देशांकडून आयात केला जातो. मात्र, युद्धामुळे या पुरवठा मार्गांमध्ये व्यत्यय आला आहे. त्याचा परिणामी, देशाला आता एका नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे. सध्याच्या परिस्थितीत LPG सिलिंडरच्या दरांमध्ये काही बदल झाले आहेत का आणि तुमच्या शहरात सध्याचे दर काय आहेत, हे आपण जाणून घेऊया.

कोरोनापेक्षाही भयानक हाल! बाजारातून रू. 1,00,00,00,00,000 गायब, कोणी काढले इतके पैसे?

LPG सिलिंडरच्या दरांमध्ये काही बदल झालेत का?

नवी दिल्ली – ₹९१३
मुंबई – ₹९१२.५०
कोलकाता – ₹९३९
चेन्नई – ₹९२८.५०
हैदराबाद – ₹९६५
लखनौ – ₹९५०.५०
बंगळुरू – ₹९१५.५०
पाटणा – ₹१,००२.५०

व्यावसायिक LPG सिलिंडरचे सध्याचे दर काय?

दिल्ली – ₹१,८८४.५०
मुंबई – ₹१,८३६
कोलकाता – ₹१,९८८.५०
चेन्नई – ₹२,०४३.५०
हैदराबाद – ₹२,००७
बंगळुरू – ₹१,९५८
पाटणा – ₹२,१३३.५०

देशाकडे ६० दिवसांचा साठा उपलब्ध

केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, त्यांच्याकडे सध्या पेट्रोल आणि डिझेलचा ६० दिवसांचा राखीव साठा उपलब्ध आहे. सरकारने असेही नमूद केले आहे की, सध्याच्या घडीला देशांतर्गत पेट्रोल, डिझेल किंवा LPG ची कोणतीही कमतरता नाही. त्यामुळे, घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. सरकारने Oil Marketing Companies LPG चे उत्पादन वाढवण्याचे निर्देशही दिले आहेत. अलीकडेच, राज्यांना वाटप करण्यात आलेला कोटा पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. तो २० टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत नेण्यात आला आहे. केंद्र सरकार पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

या महिन्याच्या सुरुवातीलाच दरांमध्ये वाढ

LPG सिलिंडरच्या दरांमध्ये याच महिन्याच्या सुरुवातीला वाढ करण्यात आली होती. त्यावेळी, १४.२ किलोग्राम वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ₹६० ची वाढ करण्यात आली होती. त्याच वेळी, व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत ₹१४४ ने वाढवण्यात आली होती. तेव्हापासून, आजतागायत किमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. गॅसची उपलब्धता किंवा त्यात लागणारा खर्च या सगळ्यावरुन भविष्यात ही वाढ कधी करायची हे ठरवण्यात येईल.

घाबरून केल्या जाणाऱ्या बुकिंगमध्ये घट

गेल्या काही दिवसांत, एलपीजी सिलिंडर्ससाठी घाबरून केल्या जाणाऱ्या बुकिंगमध्येही घट झाली आहे. सिलेंडरची कमतरता आहे हे कळताच मोठी अंधाधुंद माजली होती. पण परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आता गॅस एजन्सींमध्ये आता गर्दी कमी दिसून येत आहे.

कच्च्या तेलाचा दर 2022 प्रमाणे, मग भारताला का द्यावे लागत आहे 24% जास्त पैसे; समजून घ्या गणित

Web Title: Lpg cylinder rates another blow to the common mans pocket prices of domestic cylinders hiked what are the rates in your city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 12:38 PM

Topics:  

  • Business News
  • LPG Crisis
  • lpg cylinder
  • lpg cylinder shortage
  • LPG gas cylinder
  • LPG Shortage

संबंधित बातम्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
1

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा
2

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ
3

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा
4

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.