Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केमिकल उद्योगासाठी महाराष्ट्र सरकारचा मास्टरप्लॅन, ऑक्टोबरअखेर रासायनिक क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण; १,००० कोटींचा नवोपक्रम निधी

Maharashtra Chemical Park Rs 1000 Crore Fund: महाराष्ट्र सरकार ऑक्टोबरअखेर स्वतंत्र रासायनिक क्षेत्र धोरण लागू करण्याच्या तयारीत असून, पालघर, रायगड आणि रत्नागिरी येथे २,५०० ते ५,००० एकरांचे केमिकल पार्क विकसित करण्याची चाचपणी सुरू आहे. संशोधन, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाला चालना देण्यासाठी ₹१,००० कोटींच्या महाराष्ट्र उद्योग व गुंतव

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 09, 2026 | 06:23 PM
Maharashtra Chemical Park

Maharashtra Chemical Park

Follow Us
Follow Us:
  • रासायनिक क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण
  • ऑक्टोबरअखेर मोठी घोषणा
  • ५ हजार एकरांच्या केमिकल पार्कची तयारी
मुंबई: मुंबईत आयोजित ‘महाकेम २०२६’ मध्ये राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र ऑक्टोबरअखेर समर्पित रासायनिक क्षेत्र धोरण (केमिकल सेक्टर पॉलिसी) लागू करण्यास सज्ज आहे. तसेच पालघर, रायगड आणि रत्नागिरी येथे २५०० ते ५००० एकरांचे केमिकल पार्क विकसित चाचपणी केली जात असून, संशोधन आणि विकास, तंत्रज्ञान सज्जता आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी १,००० कोटी रुपयांच्या ‘महाराष्ट्र उद्योग व गुंतवणूक निधी’चे नियोजन केले जात आहे.

खूशखबर… IT क्षेत्रात गुंतवणुकीची मोठी संधी! Mirae Asset चा नवा IT Index Fund बाजारात, ‘ही’ खास वैशिष्ट्ये

आगामी धोरणामुळे महाराष्ट्राच्या मजबूत रासायनिक उत्पादन आधाराला अधिक बळकटी मिळेल आणि या क्षेत्रासाठी जागतिक केंद्र (ग्लोबल हब) म्हणून राज्याचे स्थान भक्कम होईल. यातून स्पेशॅलिटी केमिकल्स, प्रगत साहित्य, बॅटरी मटेरियल्स, इलेक्ट्रॉनिक केमिकल्स, प्रगत पॉलिमर्स, बायोप्लास्टिक्स आणि इतर उच्च-मूल्य असणाऱ्या विभागांमध्ये गुंतवणुकीच्या नवीन संधी उपलब्ध होतील.महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, गुंतवणूक व सेवा विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन (आयएएस) यांनी ‘ॲसोचॅम महाकेम २०२६’ मध्ये बोलताना सांगितले की, राज्य सरकार स्वतंत्र धोरण, नवीन केमिकल पार्क्स आणि नवोपक्रम व तंत्रज्ञान-आधारित वाढीला पाठबळ देणाऱ्या उपायांच्या माध्यमातून रासायनिक क्षेत्रासाठी अधिक मजबूत परिसंस्था (इकोसिस्टम) तयार करत आहे.

“महाराष्ट्र स्वतंत्र रासायनिक क्षेत्र धोरणावर काम करत असून, ऑक्टोबरअखेर ते लागू होईल अशी आमची अपेक्षा आहे. हे धोरण या क्षेत्राच्या विशिष्ट गरजा पूर्ण करेल आणि बायोप्लास्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी, बायोमॅन्युफॅक्चरिंग व इतर नवीन क्षेत्रांमध्ये राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांना पूरक ठरेल,” असे डॉ. अनबलगन यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, राज्य सरकार पालघर, रायगड आणि रत्नागिरी यांसारख्या ठिकाणी २,५०० ते ५,० हजार एकरच्या केमिकल पार्क्ससाठी जागेची पाहणी करत आहे. यासोबतच जलद मंजुरी आणि ‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस’ (व्यवसाय सुलभता) या गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य असेल. प्रस्तावित ₹१,००० कोटींचा महाराष्ट्र उद्योग व गुंतवणूक निधी संशोधन, तांत्रिक सज्जता आणि नवोपक्रमाला मदत करेल, ज्यामुळे नवीन तंत्रज्ञान आणि व्यवसायांसाठी वित्तीय परिसंस्था मजबूत होईल.

मा. मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार आणि ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रवीण परदेशी (आयएएस) यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात रासायनिक आणि फार्मास्युटिकल क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे ठरेल. या क्षेत्राची स्पर्धात्मकता ही मूलभूत सुविधा, ऊर्जा व पाण्याची उपलब्धता आणि सहाय्यक धोरणात्मक सुधारणांवर अवलंबून असेल. “हे साध्य करण्यासाठी जलद विकास आणि अधिक खाजगी गुंतवणूक आकर्षित करणारी परिसंस्था आवश्यक आहे. रसायने आणि औषधनिर्मितीसारख्या धोरणात्मक क्षेत्रांसाठी परवडणारा वीज-पाणी पुरवठा, लवचिक ऊर्जा उपलब्धता, शाश्वत जल व्यवस्थापन आणि पूरक धोरणात्मक सुधारणा महाराष्ट्राची औद्योगिक स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील.”

महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ॲसोचॅमद्वारे संदेश दिला की, राज्य सरकार या क्षेत्रात नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि ‘मैत्री’ सिंगल-विंडो प्लॅटफॉर्म, जलद मंजुरी व धोरणात्मक प्रोत्साहनांच्या माध्यमातून व्यावसायिक वातावरण अधिक सुलभ करण्यासाठी कटिबद्ध आहे. “आम्ही उद्योजकांना त्यांच्या पुढील मोठ्या प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचे आवाहन करतो. सिंगल-विंडो ‘मैत्री’ प्लॅटफॉर्म, जलद परवानग्या आणि मजबूत धोरणात्मक प्रोत्साहनांच्या माध्यमातून व्यवसाय-स्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे. लवकरच या क्षेत्रासाठी विशेष धोरण घोषित केले जाईल, ज्यामुळे गुंतवणूक आकर्षित करण्यास आणि विकासाला गती देण्यास मदत होईल.”

केमिकल आणि पेट्रोकेमिकल क्षेत्र हे महाराष्ट्राच्या १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या ध्येयाचे मुख्य इंजिन असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, नवोपक्रम-संचालित आणि शाश्वत औद्योगिक भविष्य घडवण्यासाठी सरकार आर्थिक, लॉजिस्टिक आणि प्रशासकीय पाठबळ देत राहील.

महाराष्ट्रासाठी २२ अब्ज डॉलरच्या रासायनिक संधी

‘महाकेम २०२६’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘महाराष्ट्र: फ्युएलिंग इंडियाज ट्रिलियन-डॉलर केमिकल व्हिजन’ या ॲसोचॅम-ईवाय अहवालानुसार, महाराष्ट्रातील रासायनिक क्षेत्राचे मूल्य सुमारे २२ अब्ज डॉलर असून, त्यात ३,६०० हून अधिक कारखाने आणि १३ घोषित केमिकल झोन आहेत. हे क्षेत्र भारताच्या एकूण केमिकल जीव्हीएमध्ये सुमारे १९ टक्के आणि देशाच्या केमिकल निर्यातीत १७ टक्के योगदान देते. तसेच महाराष्ट्राच्या एकूण औद्योगिक उत्पादनात याचा वाटा १३.५ टक्के असून यामुळे सुमारे ३ लाख लोकांना रोजगार मिळाला आहे.

या अहवालात महाराष्ट्रासाठी व्हॅल्यू चेनमध्ये पुढे जाण्याच्या आणि स्पेशॅलिटी केमिकल्स, बॅटरी मटेरियल्स, इलेक्ट्रॉनिक केमिकल्स, प्रगत पॉलिमर्स, स्पेशॅलिटी कोटिंग्स, फार्मा व ॲग्रोकेमिकल मध्यस्थ उत्पादने (इंटरमीडिएट), बायोप्लास्टिक्स आणि इतर उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये मोठ्या संधी अधोरेखित करण्यात आल्या आहेत.ॲसोचॅम महाराष्ट्र स्टेट कौन्सिलचे अध्यक्ष श्री. मिलिंद हार्दीकर म्हणाले की, हे क्षेत्र एका निर्णायक वळणावर असून, विकासाच्या पुढील टप्प्यात केवळ उत्पादन क्षमता वाढवण्यापलीकडे जाऊन स्पेशॅलिटी केमिकल्स, उच्च-मूल्य डेरिव्हेटिव्ह्ज आणि शाश्वत ग्रीन केमिस्ट्रीकडे वळावे लागेल.

“हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. आता मुद्दा फक्त क्षमता विस्ताराचा नाही, तर स्पेशॅलिटी केमिकल्स, उच्च-मूल्य डेरिव्हेटिव्ह्ज आणि शाश्वत ग्रीन केमिस्ट्रीकडे होणाऱ्या रचनात्मक बदलाचा आहे. आपल्याला पुरवठा साखळीची मजबूती, कच्च्या मालाची सुरक्षितता आणि शाश्वत उत्पादन यांच्यासह विकासाचा समतोल साधावा लागेल आणि यासाठी उद्योग व सरकारने एकत्र काम करणे आवश्यक आहे.”

ॲसोचॅमद्वारे आयोजित ‘महाकेम २०२६ – 3आय(i)

कॅटॅलायझिंग इन्व्हेस्टमेंट्स, इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर’ या परिषदेत धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील दिग्गज, गुंतवणूकदार, संशोधक आणि स्टार्टअप्स यांनी एकत्र येत महाराष्ट्राच्या रासायनिक क्षेत्राच्या पुढील टप्प्यावर चर्चा केली. यामध्ये गुंतवणुकीच्या संधी, नवोपक्रम आणि शाश्वत उत्पादन, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्स, मानकीकरण आणि प्रमाणीकरण, तसेच नवीन केमिकल तंत्रज्ञान संकल्पनेपासून बाजारपेठेपर्यंत आणणे या विषयांवर सखोल विचारमंथन झाले.

महाराष्ट्राला पुढील पिढीच्या रासायनिक उत्पादनासाठी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी धोरण, पायाभूत सुविधा, गुंतवणूक, संशोधन आणि उद्योग यांच्यात अधिक समन्वय असण्याची गरज या परिषदेत व्यक्त करण्यात आली.

बांधकाम आणि इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी मोठी बातमी! गंज लागण्याची चिंता मिटणार; AM/NS ने लाँच केला Pelican ब्रँड

Web Title: Maharashtra chemical policy 2026 5000 acre chemical park 1000 crore fund

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 06:23 PM

Topics:  

  • Business News
  • chemical
  • CM Devedra Fadnavis
  • Maharashtra Govenment

संबंधित बातम्या

बांधकाम आणि इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी मोठी बातमी! गंज लागण्याची चिंता मिटणार; AM/NS ने लाँच केला Pelican ब्रँड
1

बांधकाम आणि इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी मोठी बातमी! गंज लागण्याची चिंता मिटणार; AM/NS ने लाँच केला Pelican ब्रँड

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी देशव्यापी मोहीम! Vedanta कडून ‘संपूर्ण पोषण’ अभियानाचा प्रारंभ; 18 राज्यांतील बालकांना मिळणार फायदा
2

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी देशव्यापी मोहीम! Vedanta कडून ‘संपूर्ण पोषण’ अभियानाचा प्रारंभ; 18 राज्यांतील बालकांना मिळणार फायदा

SPJIMR FT MiM Ranking : जगभरातील टॉप 50 बिझनेस स्कूल्समध्ये भारतीय संस्थांचा डंका! SPJIMR ने मिळवले 26 वे स्थान; पाहा काय आहे खास?
3

SPJIMR FT MiM Ranking : जगभरातील टॉप 50 बिझनेस स्कूल्समध्ये भारतीय संस्थांचा डंका! SPJIMR ने मिळवले 26 वे स्थान; पाहा काय आहे खास?

भारतात AI चा तुफान वापर ! कंपन्यांचा मोठा विश्वास… 2027 पर्यंत IT बजेटचा 20% हिस्सा AI कडे जाणार; सर्व्हिसनाऊच्या अहवालात काय?
4

भारतात AI चा तुफान वापर ! कंपन्यांचा मोठा विश्वास… 2027 पर्यंत IT बजेटचा 20% हिस्सा AI कडे जाणार; सर्व्हिसनाऊच्या अहवालात काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.