Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ताबा मिळून 6 वर्षे झाली तरी क्लबहाऊसचं बांधकाम पूर्ण नाहीच! MahaRERA चा बिल्डरला मोठा दणका, पैसे रिफंड करण्याचे आदेश

फ्लॅटचा ताबा मिळून तब्बल ६ वर्षे उलटूनही आश्वासन दिलेले क्लबहाऊस न बांधल्याबद्दल महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने मुंबईतील बिल्डरला चांगलाच दणका दिला आहे. या प्रकरणात महारेराने फ्लॅटधारकाकडून क्लबहाऊस सदस्यत्वाच्या नावाखाली वसूल केलेले ५ लाख रुपये ६० दिवसांच्या आत परत करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 24, 2026 | 06:05 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ताबा मिळून 6 वर्षे झाली तरी क्लबहाऊस बांधकाम पूर्ण नाहीच!
  • MahaRERA चा बिल्डरला मोठा दणका
  • पैसे रिफंड करण्याचे आदेश
MahaRERA Verdict: महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी MahaRERA ने घरखरेदीदारांच्या हक्कांचे संरक्षण करणारा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. जर डेव्हलपरने प्रस्तावित क्लबहाऊससाठी ग्राहकाकडून पैसे गोळा केले असतील आणि ती सुविधा वाजवी कालावधीत उभारली गेली नाही, तर घरखरेदीदार त्या पैशांच्या रिफंडची मागणी करू शकतो, असा स्पष्ट निर्णय ‘महा-रेरा’ने दिला आहे. नेमकं काय घडलं? काय प्रकरण आहे समजून घेऊयात.

ITR Rules: कमी इनकम असलेल्यांनाही बसणार दंड? वर्षाला 4 लाख कमाईवालेही ‘या’ लिस्टमध्ये, नेमका नियम काय?

या प्रकरणी नियामकाने मुंबईतील एका बिल्डरला घरखरेदीदाराकडून क्लबहाऊसच्या सदस्यत्वासाठी वसूल केलेले ५ लाख रुपये परत करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित खरेदीदाराने ऑक्टोबर २०१९ मध्ये अपार्टमेंटचा ताबा घेतला होता. मात्र, ताबा मिळून ६ वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही विकासकाने वचन दिलेले क्लबहाऊस न बांधल्याने किंवा ते वापरासाठी उपलब्ध न केल्याने संतप्त ग्राहकाने ‘महा-रेरा’कडे धाव घेऊन व्याजासह परताव्याची मागणी केली होती.

बिल्डरचा बचाव काय होता?

या तक्रारीवर उत्तर देताना विकासकाने असा युक्तिवाद केला की, हा प्रकल्प एका मोठ्या Integrated Redevelopment Scheme भाग आहे. क्लबहाऊस हे संपूर्ण लेआउटसाठी सामायिक सुविधा म्हणून प्रस्तावित आहे. ‘BEST बस डेपोचे स्थलांतर आणि विविध प्राधिकरणांकडून मंजुरी मिळण्यास झालेला उशीर यांमुळे विलंब झाला आहे. क्लबहाऊसचे काम रद्द झालेले नाही आणि कराराच्या अटींनुसारच हे शुल्क आकारले गेले होते, असा दावा विकासकाने केला.

महारेराने काय निर्णय दिला?

‘महा-रेरा’ने विकासकाचा हा युक्तिवाद फेटाळून लावला. ताबा दिल्यानंतरही अनेक वर्षे उलटून वाजवी कालावधीत आवश्यक सुविधा न पुरवणे अयोग्य आहे. त्यामुळे ग्राहकाला क्लबहाऊसचे भरलेले शुल्क परत मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे स्पष्ट करत ‘महा-रेरा’ने बिल्डरला ५ लाख रुपये परत करण्याचा आदेश दिला. या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्रातील बिल्डरलांच्या आश्वासनांना चाप बसणार असून, ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Used Oil Scam: तुमच्या ताटात ‘विष’? मोठा स्कॅम उघड… वापरलेल्या खाद्यतेलाचा काळाबाजार; तब्बल 46 लाख लीटर जुनं तेल जप्त

Web Title: Maharera orders developer to refund clubhouse charges to homebuyer see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • Business News
  • Development Plan
  • Home loan
  • maharashtra
  • Marathi News

संबंधित बातम्या

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा
1

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा
2

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
3

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय
4

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.